दुचाकी आणि तीनचाकी विभागातील जागतिक आघाडीची कंपनी आणि टीव्हीएसचा भाग असलेल्या टीव्हीएस मोटर कंपनीने, जगभरात 70 लाख ग्राहकांचा टप्पा आज साजरा केला. तसेच ‘तू रेस लगा’ या आपल्या ब्रँडच्या नवीन मोहिमेच्या जाहिरातीचे अनावरण करत, टीव्हीएस अपाचे ब्रँडने एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे.
2005 मध्ये स्थापनेपासून, प्रत्येक टीव्हीएस अपाचे ट्रॅक टू रोड या तत्त्वज्ञानावर तयार करण्यात आली आहे, जी टीव्हीएस रेसिंगच्या चॅम्पियनशिप-विजेत्या कौशल्याला दैनंदिन कामगिरीमध्ये रूपांतरित करते. चार दशकांहून अधिक काळाच्या रेसिंग परंपरेचा आधार असलेली टीव्हीएस अपाचे, रेसचे तंत्रज्ञान, अचूक अभियांत्रिकी आणि चालक-केंद्रित नावीन्य यांचा मिलाफ साधून प्रत्येक प्रवासात एक अतुलनीय कामगिरीचा अनुभव देते.
‘टीव्हीएस एनटॉर्क १२५’ आपल्या नवीन रंगांसह लॉन्च; एका क्लिकवर पाहा किंमत आणि वैशिष्ट्ये
केवळ मोटारसायकलींपलीकडे जाऊन, टीव्हीएस अपाचेने देशातील सर्वात उत्साही रायडिंग समुदाय निर्माण केला आहे. 5,00,000 हून अधिक नोंदणीकृत सदस्य असलेला हा समुदाय कामगिरी, साहस आणि परस्पर सौहार्दाच्या सामाईक आवडीमुळे एकत्र आला आहे. राईड्स, ट्रॅकवरील अनुभव आणि ब्रँडशी साधलेला थेट संवाद यातून, टीव्हीएस अपाचे केवळ मालकीहक्काच्या पलीकडे जाऊन अर्थपूर्ण नातेसंबंध निर्माण करत आहे.
गेल्या काही वर्षात, टीव्हीएस अपाचेने या श्रेणीतील अनेक नावीन्यपूर्ण गोष्टी सातत्याने सर्वप्रथम सादर केल्या आहेत –
रोटो-पेटल डिस्क ब्रेक्स, फ्युएल इंजेक्शन, ड्युअल-चॅनेल ABS, विविध राईड मोड्स, टीव्हीएस स्मार्ट कनेक्ट™, ग्लाईड थ्रू टेक्नॉलॉजी (GTT), बिल्ट-टू-ऑर्डर प्लॅटफॉर्मद्वारे फॅक्टरी कस्टमायझेशन, की-लेस राईड सिस्टम आणि ट्रॅक्शन कंट्रोल तसेच डायनॅमिक स्टॅबिलिटी सिस्टम्ससारखी प्रगत रायडरसाठी योग्य वैशिष्ट्ये. 90 देशांमधील 70 लाखांहून (7 दशलक्ष) अधिक ग्राहकांच्या समुदायासह, टीव्हीएस अपाचे जगातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या परफॉर्मन्स मोटारसायकल ब्रँड्सपैकी एक म्हणून आपली ओळख टिकवून आहे.
TVS Motor Company : 8% वाढ! दुचाकी विक्री 4.55 लाख युनिट्सवर… इतकी झाली एकूण वाहनांची विक्री
जगभरातील 70 लाख ग्राहकांचा टप्पा साजरा करण्यासाठी आणि त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी, ब्रँडने आपली नवीन जाहिरात, ‘तू रेस लगा’ सादर केली आहे. प्रख्यात भारतीय चित्रपट निर्माते आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेते श्री. राम माधवानी यांनी ती दिग्दर्शित केली आहे. टीव्हीएस अपाचेच्या ‘ट्रॅक टू रोड’ या तत्त्वज्ञानावर आधारित, ही जाहिरात रेसट्रॅकवरील रोमांच, नियंत्रण आणि थरार ही ब्रँडची ओळख दर्शवते.
ग्राहकांचे आभार मानताना, टीव्हीएस मोटर कंपनीचे इंडिया टू-व्हीलर बिझनेसचे अध्यक्ष गौरव गुप्ता म्हणाले, “दोन दशकांपासून दाखवलेला विश्वास आणि पॅशन याबद्दल आम्ही 70 लाख टीव्हीएस अपाचे रायडर्सचे आभार मानतो. रेसिंगमधील सुरुवात ते जागतिक स्तरावरील परफॉर्मन्स ब्रँड बनण्यापर्यंतचा हा टप्पा टीव्हीएस मोटरच्या संपूर्ण परिसंस्थेची (इकोसिस्टमची) निष्ठा दर्शवतो. अर्थपूर्ण नावीन्य, जागतिक विस्तार आणि रायडर्सचा मजबूत समुदाय यांच्या माध्यमातून आम्ही परफॉर्मन्स मोटरसायकलिंगच्या क्षेत्रातील नवनवीन टप्पे गाठणे सुरूच ठेवू.”
या महत्त्वपूर्ण टप्प्यावर भाष्य करताना, टीव्हीएस मोटर कंपनीचे हेड बिझनेस – प्रीमियम, विमल सुंबली म्हणाले, “रेसट्रॅकवरील रोमांच, नियंत्रण आणि रेसिंगमधील उत्कृष्ट क्षमता सामान्य रायडर्सपर्यंत पोहोचवण्याच्या एका विशिष्ट उद्देशाने वीस वर्षांपूर्वी, ट्रॅक टू रोड (Track to Road) या तत्त्वज्ञानाद्वारे टीव्हीएस अपाचेची निर्मिती झाली. आज, जागतिक स्तरावर 70 लाख (7 दशलक्ष) ग्राहकांचा टप्पा गाठत असताना, जगातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या प्रीमियम मोटरसायकल ब्रँड्सपैकी एक म्हणून झालेला टीव्हीएस अपाचेचा विकास आणि रायडिंगच्या समान आवडीने एकत्र आलेला एक समृद्ध समुदाय पाहून आम्हाला अभिमान वाटतो. ‘तू रेस लगा’ या मोहिमेचे उद्घाटन म्हणजे या प्रवासाला आणि अशा प्रत्येक रायडरला दिलेली मानवंदना आहे, जो स्वतःच्या मर्यादांना आव्हान देतो, प्रगतीचा स्वीकार करतो आणि रेसिंगची ती जिद्द आपल्या दैनंदिन जीवनातही जपतो. भविष्याकडे पाहताना, सततची नवनिर्मिती, रेसिंगमधील प्रगत तंत्रज्ञान आणि जगभरातील रायडर्सना प्रेरणा देणारे अनुभव यांच्या माध्यमातून मोटरसायकलिंगचे स्वरूप नव्याने घडवण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत.”
टीव्हीएस अपाचे रेंज
टीव्हीएस अपाचे स्ट्रीट/नेकेड, सुपरस्पोर्ट आणि ॲडव्हेंचर रॅली टूरर मोटरसायकल सेगमेंटमध्ये उपलब्ध असून, यामध्ये 160 सीसी ते 310 सीसी पर्यंतची इंजिन क्षमता आहे:
• स्ट्रीट/नेकेड: RTR 160, RTR 160 4V, RTR 180, RTR 200 4V, RTR 310
• सुपरस्पोर्ट: RR 310
• ॲडव्हेंचर रॅली टूरर: RTX






