Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • अन्य
    • मनोरंजन
    • लाइफ स्टाइल
    • धर्म
    • व्हायरल
    • व्हिडिओ
    • वेब स्टोरीज़
    • फोटो
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

FY27 मध्ये दोन नवीन SUV मॉडेल्स लॉन्च करणार! नव्या उत्पादनाधारित रणनीतीवर भर देण्यास सुरुवात

FY26 मध्ये भारतीय पॅसेंजर वाहन बाजारात चौथ्या स्थानावर घसरलेल्या Hyundai Motor India ने आता नव्या उत्पादनाधारित रणनीतीवर भर देण्यास सुरुवात केली आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: May 09, 2026 | 08:24 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:

भारतातील पॅसेंजर वाहन बाजारात FY26 मध्ये दुसऱ्या क्रमांकावरून घसरलेल्या Hyundai Motor India ने आता उत्पादनाधारित नव्या रणनीतीवर भर देण्यास सुरुवात केली आहे. देशांतर्गत बाजारात Tata Motors आणि Mahindra & Mahindra यांनी मोठी आघाडी घेतल्यानंतर कंपनीने FY27 मध्ये दोन नवीन आणि उच्च विक्रीक्षम SUV मॉडेल्स लॉन्च करण्याची घोषणा केली आहे. कंपनीचे एमडी आणि सीईओ Tarun Garg यांनी Q4 earnings call दरम्यान सांगितले की, या आर्थिक वर्षात Hyundai दोन पूर्णपणे नवीन नेमप्लेट्स सादर करणार आहे. यामध्ये एक स्थानिक पातळीवर विकसित करण्यात आलेली compact SUV segment मधील dedicated EV असेल, तर दुसरी mid-size ICE SUV असेल.

EV Scooter vs EV Bike : इलेक्ट्रीक स्कुटर की बाईक? कोणती टु व्हीलर वाचवते सर्वात जास्त पैसे

कंपनीला विश्वास आहे की या दोन नव्या SUV मॉडेल्समुळे विक्रीला मोठी चालना मिळेल. एप्रिल २०२६ मध्ये Hyundai च्या विक्रीत १७ टक्क्यांची वाढ होऊन ५१,९०२ युनिट्सची नोंद झाली होती. कंपनीच्या मते, compact SUV आणि mid-size SUV हे भारतीय बाजारातील सर्वाधिक मागणी असलेले segments आहेत आणि या दोन्ही नव्या मॉडेल्समुळे FY27 मध्ये देशांतर्गत विक्रीत ८ ते १० टक्क्यांची वाढ साध्य करता येईल.

माध्यमांतील वृत्तांनुसार, Hyundai यावर्षी entry-level Hyundai Inster EV आणि i20 आधारित Hyundai Bayon भारतात आणू शकते. Inster EV ही गाडी Tata Punch EV ला टक्कर देऊ शकते, तर Bayon crossover ची स्पर्धा Maruti Suzuki Fronx सोबत होण्याची शक्यता आहे. FY26 मध्ये Hyundai ने ५,८४,९०६ वाहनांची विक्री केली, जी FY25 च्या तुलनेत २.२९ टक्क्यांनी कमी होती. दुसरीकडे Mahindra & Mahindra ने ६,६०,२७६ वाहनांसह दुसरे स्थान पटकावले, तर Tata Motors ६,५१,२६१ वाहनांसह तिसऱ्या क्रमांकावर राहिली. परिणामी Hyundai चौथ्या स्थानावर घसरली.

कंपनीने FY27 साठी तब्बल ₹७,५०० कोटींच्या भांडवली गुंतवणुकीची योजना आखली आहे. यापैकी जवळपास ४५ ते ५० टक्के रक्कम नवीन उत्पादनांवर खर्च केली जाणार आहे. तसेच ३० टक्के गुंतवणूक उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी वापरली जाईल. यामध्ये पुणे प्लांटच्या Phase-2 विस्तारासह Sriperumbudur येथील Chennai facility मध्येही सुधारणा करण्यात येणार आहेत. Hyundai च्या Chennai प्लांटमध्ये वार्षिक सुमारे ८.२४ लाख वाहनांची क्षमता असून, नवीन SUV मॉडेल्सचे उत्पादन इथेच होणार आहे. कंपनीला २०३० पर्यंत पुणे प्लांटसह एकूण उत्पादन क्षमता ११ लाख युनिट्सपेक्षा अधिक करण्याचा विश्वास आहे.

Car Buying Tips: सेकंड हँड कार घेताना ‘ही’ चूक ठरू शकते महागात; अपघातग्रस्त गाडी ओळखण्याचे सोपे मार्ग

देशांतर्गत विक्रीबरोबरच Hyundai निर्यात वाढीवरही भर देत आहे. नवीन SUV मॉडेल्स परदेशातही निर्यात केली जाणार असून FY27 मध्ये ८ ते १० टक्के निर्यात वाढीचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. कंपनीच्या मते, भारत हा नवीन second-generation Hyundai Venue साठी जागतिक उत्पादन केंद्र म्हणून काम करणार आहे. तसेच Hyundai Verna आणि Hyundai Exter यांचीही परदेशी बाजारपेठांमध्ये निर्यात वाढवण्याची योजना आखण्यात आली आहे.

Web Title: Two new suv models to be launched in fy27

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 09, 2026 | 08:24 PM

Topics:  

  • Hyundai
  • hyundai Motors

संबंधित बातम्या

अरे वा मस्तच! एक EV तर दुसरी पेट्रोल-डिझेल…; Hyundai च्या दोन दमदार नव्या कार्स यंदा होणार लॉन्च; मारुती-टाटासाठी वाढणार स्पर्धा
1

अरे वा मस्तच! एक EV तर दुसरी पेट्रोल-डिझेल…; Hyundai च्या दोन दमदार नव्या कार्स यंदा होणार लॉन्च; मारुती-टाटासाठी वाढणार स्पर्धा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.