Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 15 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

नोव्हेंबरमध्ये Hyundai कार्सवर मोठ्या डिस्काउंटचा पाऊस! ग्राहकांना मिळणार 1.2 लाखांपर्यंत सूट

नोव्हेंबरमध्ये ह्युंदाईची कार खरेदी करण्याची संधी चालून आली आहे! क्रेटा एन लाइनवर तब्बल 1.20 लाख रुपयांपर्यंत सूट मिळत असताना व्हर्ना आणि अल्काझारवरही मोठ्या ऑफर्स आहेत. पण याच कंपनीच्या काही एसयूव्हीवर फक्त 5,000 रुपयांचा फायदा का मिळतोय?

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Nov 15, 2026 | 03:33 PM
Hyundai Cars Get Huge Discounts In November 2026 (फोटो सौजन्य-AI एआय)

Hyundai Cars Get Huge Discounts In November 2026 (फोटो सौजन्य-AI एआय)

Follow Us
Follow Us:
  • ह्युंदाई क्रेटा एन लाइनवर नोव्हेंबरमध्ये 1.20 लाख रुपयांपर्यंत डिस्काउंट मिळत आहे.
  • व्हर्नाच्या जुन्या सीव्हीटी स्टॉकवर कॅश आणि एक्सचेंजसह 1.05 लाख रुपयांपर्यंत फायदा मिळणार आहे.
  • ग्रँड आय10 निओस, आय20 आणि अल्काझारवरही व्हेरिएंटनुसार आकर्षक डिस्काउंट ऑफर्स जाहीर करण्यात आल्या आहेत.

नोव्हेंबर 2026 मध्ये अनेक ऑफर्सचा फायदा कस्टमरना घेता येणार आहे. ह्युंदाई मोटर इंडियाने आपल्या विविध कार्सवर 1.20 लाख रुपयांपर्यंत डिस्काउंट जाहीर केला आहे. यामध्ये क्रेटा एन लाइन, क्रेटा पेट्रोल, व्हर्ना, अल्काझार, क्रेटा इलेक्ट्रिकसह ग्रँड आय10 निओस आणि आय20 सारख्या कार्सचा समावेश आहे.

या महिन्यात सर्वात जास्त फायदा ह्युंदाई क्रेटा एन लाइनवर मिळत आहे. या कारवर 1.20 लाख रुपयांपर्यंत सूट दिली जात आहे. तर क्रेटा पेट्रोल व्हेरिएंटवर 1.10 लाख रुपये आणि पेट्रोल सीव्हीटी व्हेरिएंटवर 1 लाख रुपयांपर्यंत डिस्काउंट मिळत आहे. क्रेटा ई पेट्रोलवर 95,000 रुपयांपर्यंत फायदा मिळू शकतो. पण क्रेटा डिझेलवर केवळ 5,000 रुपयांचा स्क्रॅपेज बेनिफिट दिला जात आहे.

Hyundai Sales October 2026: क्रेटा, व्हेन्यू आणि एक्स्टरची विक्री वाढली; कोणत्या कारला बसला फटका?

व्हर्ना आणि अल्काझारवरही मोठ्या ऑफर्स

ह्युंदाई व्हर्नाच्या जुन्या सीव्हीटी स्टॉकवर कॅश, फेस्टिव्हल, एक्सचेंज, स्क्रॅपेज, अपग्रेड आणि कॉर्पोरेट ऑफर्स मिळून 1.05 लाख रुपयांपर्यंत फायदा मिळत आहे. व्हर्ना एचएक्स8 डीसीटीवर 85,000 रुपये, तर इतर नवीन व्हेरिएंटवर 75,000 रुपयांपर्यंत सूट आहे. अल्काझार पेट्रोलवर 90,000 रुपये आणि डिझेलवर 45,000 रुपयांपर्यंत बेनिफिट मिळत आहे.

इलेक्ट्रिक कार खरेदी करण्याचा विचार करणाऱ्यांसाठी क्रेटा इलेक्ट्रिकच्या स्मार्ट (O) LR HC आणि एक्सलन्स LR HC व्हेरिएंटवर 80,000 रुपयांपर्यंत ऑफर आहे. इतर व्हेरिएंटवर 50,000 रुपयांपर्यंत फायदा मिळू शकतो.

नवीन ह्युंदाई क्रेटा टेस्टिंगदरम्यान दिसली; बॉक्सी डिझाइन, ADAS आणि हायब्रिड इंजिनची मिळणार साथ!

हॅचबॅक आणि एसयूव्हीवर किती सूट?

ह्युंदाई ग्रँड आय10 निओस पेट्रोलवर 73,000 रुपये, तर सीएनजी व्हेरिएंटवर 68,000 रुपयांपर्यंत सूट आहे. आय20 आणि आय20 एन लाइनवर 63,000 रुपयांपर्यंत डिस्काउंट मिळत आहे. एक्सटरच्या जुन्या स्टॉकवर 53,000 रुपये आणि नवीन व्हेरिएंटवर 45,000 रुपयांपर्यंत फायदा आहे. ऑरा सीएनजीवर 35,000 रुपये, तर पेट्रोलवर 20,000 रुपयांपर्यंत सूट मिळत आहे.

दुसरीकडे, ह्युंदाई व्हेन्यू, व्हेन्यू एन लाइन आणि बायॉनवर प्रत्येकी 5,000 रुपयांचा स्क्रॅपेज बेनिफिट दिला जात आहे.

डीलरशिपनुसार बदलू शकतात ऑफर्स

या Hyundai November 2026 Offers चा फायदा घेताना काही गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहे. डिस्काउंटची रक्कम कारचे व्हेरिएंट, डीलरकडील स्टॉक, एक्सचेंज आणि स्क्रॅपेजच्या अटींवर अवलंबून असेल. कॉर्पोरेट आणि अपग्रेड ऑफर्ससाठीही काही अटी लागू आहेत. त्यामुळे कार खरेदी करण्यापूर्वी जवळच्या ह्युंदाई डीलरशी संपर्क साधून आपल्या पसंतीच्या व्हेरिएंटवर मिळणाऱ्या ऑफर्सची माहिती घेणे फायदेशीर ठरेल.

💡

Frequently Asked Questions

  • Que: नोव्हेंबर 2026 मध्ये ह्युंदाईच्या कोणत्या कारवर सर्वात जास्त डिस्काउंट आहे?

    Ans: ह्युंदाई क्रेटा एन लाइनवर सर्वात जास्त म्हणजेच 1.20 लाख रुपयांपर्यंत डिस्काउंट मिळत आहे.

  • Que: ह्युंदाई क्रेटा पेट्रोल आणि डिझेलवर किती सूट मिळत आहे?

    Ans: क्रेटा पेट्रोलवर 1.10 लाख रुपये, पेट्रोल सीव्हीटीवर 1 लाख रुपये, तर डिझेल व्हेरिएंटवर 5,000 रुपयांचा स्क्रॅपेज बेनिफिट मिळत आहे.

  • Que: ह्युंदाईच्या डिस्काउंट ऑफर्स सर्व डीलरशिपवर सारख्याच आहेत का?

    Ans: नाही. या ऑफर्स डीलरशिप, व्हेरिएंट, उपलब्ध स्टॉक आणि एक्सचेंज किंवा स्क्रॅपेजच्या पात्रतेनुसार बदलू शकतात. त्यामुळे खरेदीपूर्वी डीलरशी संपर्क साधणे योग्य ठरेल.

Web Title: Hyundai cars discounts november 2026 creta verna auto news marathi ar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 15, 2026 | 03:33 PM

Topics:  

  • automobile
  • cars
  • Hyundai

संबंधित बातम्या

Kia India ची ₹18,000 कोटींची मोठी गुंतवणूक! आंध्र प्रदेशात नवीन प्लांट, प्रोडक्शन कॅपसिटी वाढणार
1

Kia India ची ₹18,000 कोटींची मोठी गुंतवणूक! आंध्र प्रदेशात नवीन प्लांट, प्रोडक्शन कॅपसिटी वाढणार

JSW Motors ची AWS सोबत मोठी पार्टनरशिप! Connected Car Data आता भारतातच सुरक्षित राहणार
2

JSW Motors ची AWS सोबत मोठी पार्टनरशिप! Connected Car Data आता भारतातच सुरक्षित राहणार

भारतात येणार 5 नवीन Adventure Bikes! Royal Enfield, Hero आणि Bajaj च्या बाइक्सची तयारी सुरू
3

भारतात येणार 5 नवीन Adventure Bikes! Royal Enfield, Hero आणि Bajaj च्या बाइक्सची तयारी सुरू

Denza D9 and Z9 GT: भारतात डेंझा D9 आणि Z9 GT इलेक्ट्रिक कार लाँच! किंमत 90 लाखांपासून सुरु, 1,140 hp पॉवरची कारही दाखल
4

Denza D9 and Z9 GT: भारतात डेंझा D9 आणि Z9 GT इलेक्ट्रिक कार लाँच! किंमत 90 लाखांपासून सुरु, 1,140 hp पॉवरची कारही दाखल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.