
मारुती सुझुकी फ्रॉन्क्स फेसलिफ्ट
फ्रॉन्क्सच्या नव्या मॉडेलमध्ये डिझाइनसोबत फीचर्समध्येही बदल अपेक्षित आहेत. यात Level 2 ADAS, Autonomous Emergency Braking, Lane Keep Assist, Adaptive Cruise Control आणि Forward Collision Warning मिळू शकते. 360-डिग्री कॅमेरा कायम राहण्याची शक्यता आहे. इंजिनमध्ये 1.2-लिटर, 3-सिलेंडर Z-Series पेट्रोल इंजिन मिळू शकते. हे इंजिन 83 bhp आणि 112 Nm टॉर्क देते. CNG पर्यायासोबत Series-Hybrid तंत्रज्ञानही येण्याची चर्चा आहे.
New Maruti Baleno vs Hyundai i20 vs TATA Altroz; तुमच्यासाठी कोणती हॅचबॅक कार ठरेल बेस्ट? जाणून घ्या
ग्रँड विटारा फेसलिफ्ट
ग्रँड विटाराला 2026 च्या सणासुदीच्या काळात किंवा 2027 च्या सुरुवातीला अपडेट मिळण्याची शक्यता आहे. नवीन ग्रिल, बंपर, LED हेडलॅम्प आणि 17-इंच अलॉय व्हील्स मिळू शकतात. केबिनमध्ये 10.1-इंच टचस्क्रीन, 10.25-इंच डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले, प्रीमियम ऑडिओ आणि पॉवर्ड टेलगेट यांसारखी फीचर्स मिळण्याची शक्यता आहे. Level 2 ADAS हेही मोठे आकर्षण ठरू शकते.
एर्टिगा फेसलिफ्ट
एर्टिगाच्या फेसलिफ्टमध्ये मोठ्या यांत्रिक बदलांपेक्षा डिझाइन आणि फीचर्सवर भर दिला जाऊ शकतो. नवीन टचस्क्रीन, 360-डिग्री कॅमेरा आणि अपडेटेड एक्स्टिरियर मिळण्याची शक्यता आहे. पेट्रोल, CNG आणि मॅन्युअल-ऑटोमॅटिक ऑप्शन पुढेही कायम राहू शकतात.
वॅगनआर फेसलिफ्ट
टेस्टिंगदरम्यान दिसलेल्या वॅगनआरमुळे नव्या अपडेटची चर्चा सुरू झाली आहे. हेडलॅम्प, ग्रिल, बंपर आणि टेललॅम्पमध्ये बदल अपेक्षित आहेत. 1.2-लिटर Z12E पेट्रोल इंजिन हे यातील मोठे अपडेट ठरू शकते. CNG ऑप्शनही कायम राहण्याची शक्यता आहे.
मारुती इन्विक्टो फेसलिफ्ट
प्रीमियम MPV इन्विक्टोलाही 2027 मध्ये फेसलिफ्ट मिळू शकते. नवीन ग्रिल, 19-इंच अलॉय व्हील्स आणि नवीन रंगांसोबत मोठी टचस्क्रीन, 360-डिग्री कॅमेरा, Level 2 ADAS, JBL ऑडिओ, व्हेंटिलेटेड सीट्स आणि वायरलेस चार्जिंग यांसारखी फीचर्स मिळण्याची शक्यता आहे. सध्याचे 2.0-लिटर पेट्रोल-हायब्रिड पॉवरट्रेन कायम राहण्याची अपेक्षा आहे.