
उत्तराखंडमधील अल्मोडा येथे राहणाऱ्या एका तरुणाने स्वदेशी बनावटीची भन्नाट इलेक्ट्रिक फ्लाईंग कार तयार करून दाखवली आहे. कफलीखान गावातील रवी तात्मा या नवसंशोधकाने आपल्या ‘हपिडा स्काय’ Hapida Sky या स्टार्टअपने विकसित केलेल्या ‘HAPIDA SKYNeX Prototype’ या सिंगल सीटर व्हेइकलची यशस्वी चाचणी घेतली आहे.ही गाडी प्रगत ड्रोन तंत्रज्ञानावर आधारित असून, विशेषतः डोंगराळ भागातील कठीण वाहतूक समस्या लक्षात घेऊन तिची रचना करण्यात आली आहे.
डोंगराळ भागात वाहतुकीचा नवा पर्याय
उत्तराखंडसारख्या दुर्गम आणि उंच-सखल डोंगराळ प्रदेशात नागमोडी रस्त्यांमुळे थोड्या अंतरासाठीही प्रवाशांचा खूप वेळ वाया जातो. अशा भागात हवाई वाहतुकीचा हा पर्याय प्रवासाचा वेळ वाचवण्यासाठी क्रांतिकारी ठरू शकतो.
हा प्रोजेक्ट सध्या केवळ प्रातिनिधिक आणि चाचणीच्या टप्प्यात आहे; मात्र याच्या यशस्वी उड्डाणामुळे भारतातील भवितव्यातील ‘एअर मोबिलिटी’ आणि स्थानिक तंत्रज्ञानाला मोठी नवी दिशा मिळाली आहे.
या फ्लाईंग कारची प्रमुख वैशिष्ट्ये
ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर
प्रगत ड्रोन तंत्रज्ञानाच्या सुधारित आवृत्तीचा वापर करून हे सिंगल सीटर वाहन डिझाइन केले गेले आहे.
डोंगराळ भागासाठी उपयुक्त
कठीण आणि उंचावरील रस्ते टाळून थेट हवाई मार्गाने जलद प्रवास करणे यामुळे शक्य होईल.
भारतीय स्टार्टअपची कमाल
रवी तात्मा यांच्या ‘हपिडा स्काय’ या भारतीय स्टार्टअपने ही मोठी कामगिरी करून दाखवली आहे. या नाविन्यपूर्ण शोधाचा व्हिडिओ सध्या सोशियल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून, नेटकऱ्यांकडून रवी टम्टा आणि त्यांच्या या अनोख्या फ्लाईंग कारचे कौतुक केले जात आहे. येणाऱ्या काळात ही फ्लाईंग कार वाहतूक क्षेत्रात मोठे बदल घडवून आणू शकते.