Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 6 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

हिरो विडा VX2 इलेक्ट्रिक स्कूटरची जयपूरमध्ये एका दिवसात 600+ डिलिव्हरी! Asia Book of Records मध्ये नोंद

विडा VX2 इलेक्ट्रिक स्कूटरची जयपूरमध्ये एका दिवसात 600 पेक्षा जास्त डिलिव्हरी झाली असून Asia Book of Records मध्ये नोंद झाली आहे. 92 ते 187 km रेंज, 5 व्हेरिएंट्स आणि 6,000+ फास्ट चार्जिंग स्टेशनच्या नेटवर्कसह विडा इलेक्ट्रिक दुचाकी मार्केटमध्ये विस्तार करत आहे.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Nov 06, 2026 | 07:37 PM
electric scooters, hero scooters, hero motocorp, automobile

electric scooters, hero scooters, hero motocorp, automobile

Follow Us
Follow Us:
  • हिरो विडा VX2 ने जयपूरमध्ये धनतेरसच्या दिवशी एकाच सेंटरवर 600 पेक्षा जास्त स्कूटर्सची डिलिव्हरी केली.
  • Asia Book of Records मध्ये नोंद झालेल्या या विक्रमासोबत विडाच्या ऑक्टोबर रिटेल रजिस्ट्रेशनमध्ये 80% वाढ झाली.
  • विडा VX2 च्या 5 व्हेरिएंट्समध्ये 92 ते 187 km IDC रेंज आणि रिमूव्हेबल बॅटरीचे ऑप्शन मिळतात.

हिरो मोटोकॉर्पच्या इलेक्ट्रिक मोबिलिटी ब्रँड विडा VX2 ने जयपूरमध्ये एका दिवसात 600 पेक्षा जास्त इलेक्ट्रिक स्कूटर्सची डिलिव्हरी करून नवा विक्रम नोंदवला आहे. धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर एकाच विडा सेंटरमध्ये झालेल्या या डिलिव्हरीची Asia Book of Records मध्ये नोंद झाली आहे. एका शहरात, एकाच केंद्रातून एका दिवसात सर्वाधिक इलेक्ट्रिक स्कूटर्स ग्राहकांना सुपूर्द केल्याचा हा विक्रम असल्याचे सांगण्यात आले आहे. विडाच्या इलेक्ट्रिक दुचाकींच्या विक्रीत वाढ होत असताना ही नोंद कंपनीसाठी खास ठरली आहे.

ऑक्टोबरमध्ये विडाच्या विक्रीत 80% वाढ

विडाने ऑक्टोबर 2026 मध्ये VAHAN रिटेल रजिस्ट्रेशनमध्ये मागच्या वर्षाच्या तुलनेत 80% वाढ नोंदवली. कंपनीचा इलेक्ट्रिक दुचाकी मार्केटमधील हिस्सा ऑक्टोबर 2025 मधील 11.1% वरून 13.6% झाला आहे. म्हणजेच 2.5 टक्के पॉइंट्सची वाढ झाली. हिरो मोटोकॉर्पने ऑक्टोबरमध्ये विडाच्या 30,143 स्कूटर्स डिस्पॅच केल्याची माहिती दिली आहे. पण डिस्पॅच आणि कस्टमर रिटेल रजिस्ट्रेशन हे वेगवेगळे आकडे आहेत.

बाईक छोटी, स्वप्नं मोठी! Hero Xpulse 150 ची धमाकेदार एंट्री! 150 cc इंजिनसह कमी किमतीत मिळणार Adventure Bike?

विडा VX2 ची बॅटरी आणि रेंज

विडा VX2 मध्ये Go 2.2 kWh, Go 3.1 FB, Go 3.4 kWh, Plus 3.4 kWh आणि Plus 4.4 kWh असे 5 व्हेरिएंट्स मिळतात. बॅटरी कॅपसिटीनुसार IDC प्रमाणित रेंज 92 km ते 187 km आहे. Go 3.1 FB मध्ये फिक्स्ड बॅटरी आणि थेट प्लग-इन चार्जिंगची सुविधा आहे. इतर व्हेरिएंट्समध्ये रिमूव्हेबल बॅटरीची व्यवस्था मिळते.

मोटर, फीचर्स आणि चार्जिंग नेटवर्क

VX2 मध्ये इलेक्ट्रिक मोटर असून ती सुमारे 8 hp पॉवर आणि 26 Nm टॉर्क देते. Plus 4.4 kWh व्हेरिएंटचा टॉप स्पीड 90 kmph, Plus 3.4 kWh चा 80 kmph, तर Go 2.2 kWh चा 70 kmph आहे. Go व्हेरिएंट्समध्ये Eco आणि Ride मोड्स, तर Plus मध्ये Sports मोड मिळतो.

Hero Classic Concept EICMA 2026 मध्ये सादर! Royal Enfield Classic 350 ला मिळणार नवा प्रतिस्पर्धी?

Plus मॉडेल्समध्ये 4.3-इंच TFT डिस्प्ले आणि Go मॉडेल्समध्ये LCD स्क्रीन आहे. स्मार्टफोन कनेक्टिव्हिटी, नेव्हिगेशन, OTA अपडेट्स आणि Combined Braking System मिळते. Go 2.2 kWh मध्ये सीटखाली 33.2 लिटर स्टोरेज आहे. विडाचे भारतात 6,000 पेक्षा जास्त फास्ट चार्जिंग स्टेशन आणि 700 पेक्षा जास्त सर्व्हिस टचपॉइंट्सचे नेटवर्क आहे. त्यामुळे VX2 कस्टमर्सना चार्जिंग आणि देखभालीसाठी मदत मिळते.

💡

Frequently Asked Questions

  • Que: विडा VX2 ने जयपूरमध्ये एका दिवसात किती स्कूटर्सची डिलिव्हरी केली?

    Ans: विडा VX2 ने जयपूरमध्ये धनतेरसच्या दिवशी 600 पेक्षा जास्त इलेक्ट्रिक स्कूटर्सची डिलिव्हरी केली.

  • Que: विडा VX2 इलेक्ट्रिक स्कूटरची रेंज किती आहे?

    Ans: विडा VX2 ची IDC प्रमाणित रेंज बॅटरी व्हेरिएंटनुसार 92 km ते 187 km पर्यंत आहे.

  • Que: विडाच्या भारतातील चार्जिंग नेटवर्कमध्ये किती स्टेशन आहेत?

    Ans: विडाच्या माहितीनुसार, भारतात 6,000 पेक्षा जास्त फास्ट चार्जिंग स्टेशन आणि 700 पेक्षा जास्त सर्व्हिस टचपॉइंट्स आहेत.

Web Title: Vida vx2 electric scooter jaipur 600 deliveries record auto news marathi ar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 06, 2026 | 07:26 PM

Topics:  

  • automobile
  • electric scooters

संबंधित बातम्या

महिंद्रा XUV 3XO ZNG ला Bharat NCAP क्रॅश टेस्टमध्ये 5 स्टार सेफ्टी रेटिंग! पाहा सविस्तरपणे
1

महिंद्रा XUV 3XO ZNG ला Bharat NCAP क्रॅश टेस्टमध्ये 5 स्टार सेफ्टी रेटिंग! पाहा सविस्तरपणे

रॉयल एनफिल्ड फ्लाइंग फ्ली C6 चे चेन्नईत आगमन! 14 आउटलेट्स, भारतात 40 ठिकाणी नेटवर्क
2

रॉयल एनफिल्ड फ्लाइंग फ्ली C6 चे चेन्नईत आगमन! 14 आउटलेट्स, भारतात 40 ठिकाणी नेटवर्क

मारुती सुझुकी अरेना कार्सवर दिवाळी डिस्काउंटचा धमाका! Victoris वर ₹1.21 लाखांपर्यंत सवलत
3

मारुती सुझुकी अरेना कार्सवर दिवाळी डिस्काउंटचा धमाका! Victoris वर ₹1.21 लाखांपर्यंत सवलत

महिंद्रा SUV वर दिवाळी ऑफर्सचा धमाका! Scorpio N वर ₹1.50 लाखांपर्यंत डिस्काउंट, Thar आणि XUV 3XO वरही बचत
4

महिंद्रा SUV वर दिवाळी ऑफर्सचा धमाका! Scorpio N वर ₹1.50 लाखांपर्यंत डिस्काउंट, Thar आणि XUV 3XO वरही बचत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.