(फोटो सौजन्य-AI एआय)
डुकाटीची विक्री घटली, तरी कंपनी नफ्यात
2022 मध्ये फोक्सवॅगन ग्रुपच्या अंतर्गत डुकाटीने पहिल्यांदाच 60,000 मोटरसायकलींच्या विक्रीचा टप्पा ओलांडला होता. मात्र 2025 मध्ये कंपनीची जागतिक विक्री 50,895 युनिट्सवर आली. मागील वर्षाच्या तुलनेत ही सुमारे 7% घट आहे. असे असले तरी डुकाटीने 5.6% नफा नोंदवला आहे.
फोक्सवॅगनला अधिक नफा हवा
फोक्सवॅगन ग्रुप सध्या आपल्या व्यवसायातील नफा वाढवण्यावर मोठा भर देत आहे. 2026 मध्ये ग्रुपचा ऑपरेटिंग प्रॉफिट मार्जिन सुमारे 3.8% राहण्याचा अंदाज आहे, जो मागील वर्षातील 4.2% पेक्षा कमी आहे. भविष्यात ऑपरेटिंग रिटर्न ऑन सेल्स 8 ते 10% पर्यंत नेण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहे. त्यामुळे अपेक्षित परतावा न देणाऱ्या व्यवसायांचे पुनर्मूल्यांकन केले जात असल्याचे दिसते.
फोक्सवॅगन ग्रुपचे ऑडीचे सीईओ गेर्नॉट डॉल्नर यांनी यापूर्वी डुकाटीसह सुमारे 600 व्यवसायांचा आढावा घेतला जात असल्याचे सांगितले होते. ग्रुप आपल्या व्यवसायांची संख्या जवळपास एक-तृतीयांशने कमी करण्याचा विचार करत असल्याची चर्चा आहे. त्यामुळे डुकाटी या प्रक्रियेत प्रभावित होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
Skoda Auto फॉक्सवॅगन इंडियामध्ये मोठे बदल! पियूष अरोरा यांच्याकडे सोपवली ‘ही’ अतिरिक्त मोठी जबाबदारी
डुकाटीची लोकप्रियता मात्र कायम
डुकाटी मॉन्स्टर आणि पॅनिगेल V4 सारख्या दमदार मोटरसायकलींसाठी प्रसिद्ध आहे. मोटोजीपीमध्येही डुकाटीने 2020 पासून सलग 6 चॅम्पियनशिप जिंकत आपले वर्चस्व दाखवले आहे. त्यामुळे हा ब्रँड विकला किंवा वेगळा केला गेल्यास त्याची धुरा कोण सांभाळणार, हा मोठा प्रश्न आहे. सध्या फोक्सवॅगनकडून अंतिम निर्णयाची अधिकृत घोषणा झालेली नाही.






