फोटो सौजन्य: @volkswagenindia (X.com)
भारतात अनेक ऑटोमोबाईल कंपन्या आहेत, ज्या दीर्घकाळापासून भारतीय ग्राहकांच्या गरजांनुसार दर्जेदार कार्स सादर करत आहेत. या कंपन्या विविध सेगमेंटमध्ये कार्स उपलब्ध करून देतात. फोक्सवॅगन ही त्यापैकी एक नामांकित आणि आघाडीची कार उत्पादक कंपनी आहे. फोक्सवॅगनने भारतीय बाजारात सेडानपासून ते एसयूव्हीपर्यंत अनेक मॉडेल्स उपलब्ध करून दिली आहेत. कंपनीने गुणवत्तेवर भर देत ग्राहकांचा विश्वास जिंकला आहे. सॉलिड बिल्ट क्वालिटी, परफॉर्मन्स आणि सुरक्षा या बाबतीत फोक्सवॅगनच्या कार्स प्रसिद्ध आहेत. भारतीय ग्राहकांसाठी योग्य किंमत, फीचर्स आणि आकर्षक डिझाइन यामुळेही फोक्सवॅगनची कार्स पसंतीस उतरत आहेत.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, आता फोक्सवॅगन लवकरच त्यांच्या कॉम्पॅक्ट एसयूव्हीचा फेसलिफ्ट लाँच करण्याची तयारी करत आहे. लाँच होण्यापूर्वी या एसयूव्हीची टेस्टिंग केली जात आहे. चला जाणून घेऊयात, Volkswagen Taigun facelift एसयूव्हीबद्दल कोणती माहिती समोर आली आहे.
Honda कडून नवीन Adventure Scooter सादर, लूक असा जो भल्या भल्या बाईकला लाजवेल
मीडिया रिपोर्ट्सनुसार, टेस्टिंग दरम्यान फोक्सवॅगन टायगुन स्पॉट झाली आहे. टेस्टिंग केले जाणारे युनिट पूर्णपणे झाकलेले दिसत आहे. परंतु या कारचा पुढचा आणि मागचा भाग बदलता येऊ शकतो. यासोबतच, त्यात अनेक नवीन फीचर्स देखील जोडले जाऊ शकतात. माहितीनुसार, एसयूव्हीमध्ये बहुतेक बदल लूक आणि फीचर्ससह असतील. त्याच्या इंजिनमध्ये कोणताही बदल केला जाणार नाही.
रिपोर्ट्सनुसार, एसयूव्हीमध्ये काही नवीन फीचर्स पाहायला मिळू शकतात. ज्यामध्ये 360 डिग्री कॅमेरा, ड्युअल झोन क्लायमेट कंट्रोल, नवीन आणि सुधारित इंटिरिअर, सुधारित इन्फोटेनमेंट सिस्टम असे बदल केले जाऊ शकतात.
रिपोर्ट्सनुसार, या एसयूव्हीमध्ये फक्त विद्यमान 1 लिटर आणि 1.5 लिटर इंजिन दिले जाऊ शकतात. यासोबतच, 6 स्पीड मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशन व सात स्पीड डीएसजी ट्रान्समिशन देखील दिले जाईल.
कंपनीने या एसयूव्हीच्या लाँचिंगबद्दल कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. परंतु अशी अपेक्षा आहे की या मिड-लाइफ अपडेटसह, पुढील वर्षापर्यंत भारतीय बाजारात फोक्सवॅगन Taigun फेसलिफ्ट लाँच केली जाऊ शकते.