
मोठी बॅटरी आणि दमदार इलेक्ट्रिक मोटर
नवीन PHEV मॉडेल्समध्ये फ्लोअरमध्ये बसवलेली मोठी बॅटरी देण्यात आली आहे. त्यासोबत जास्त पावरफुल इलेक्ट्रिक मोटर असल्यामुळे इलेक्ट्रिक ड्रायव्हिंगची क्षमता बरीच वाढली आहे. कंपनीच्या माहितीनुसार, नवीन रेंज जुन्या PHEV मॉडेल्सपेक्षा 2.5 पटीहून जास्त आहे. बॅटरीची चार्जिंग क्षमता संपल्यानंतर पेट्रोल इंजिनचा वापर करता येतो, त्यामुळे लांब प्रवासासाठी केवळ चार्जिंगवर अवलंबून राहावे लागत नाही.
ह्युंदाई BAYON चे पहिले डिझाइन स्केच जाहीर! दमदार SUV लूकसह येणार नवी कार; पाहा काय असेल खास
XC60 च्या डिझाइनमध्ये मोठे बदल
XC60 मध्ये बाहेरील डिझाइनला मोठा अपडेट मिळाला आहे. नवीन ग्रिल, फ्रंट बंपर, बोनट, फ्रंट फेंडर्स आणि अलॉय व्हील्ससह सुधारित Thor’s Hammer Matrix LED हेडलॅम्प देण्यात आले आहेत. मागच्या बाजूला टेलगेट, LED टेललॅम्प आणि बंपरमध्ये बदल करण्यात आले आहेत. केबिनमध्ये नवीन डॅशबोर्ड, डोअर पॅनेल, वुड ट्रिम आणि Cardamom व्हेंटिलेटेड Nappa लेदरचा पर्याय मिळतो.
XC90 मध्ये प्रीमियम फीचर्स
7-सीटर XC90 मध्ये स्कॅन्डिनेव्हियन डिझाइनवर आधारित प्रीमियम केबिन कायम ठेवण्यात आली आहे. पर्याय म्हणून Bowers & Wilkins साउंड सिस्टम आणि Google Gemini AI असलेले इन्फोटेनमेंट सिस्टम मिळते. XC60 मध्ये 11.2-इंच सेंट्रल स्क्रीन असून नवीन Volvo Car UX देण्यात आले आहे.
होंडाच्या F1 पॉवर युनिटमध्ये मोठा फेरबदल; अॅस्टन मार्टिनच्या कामगिरीनंतर घेतला महत्त्वाचा निर्णय
दोन्ही SUV मध्ये 360-डिग्री 3D कॅमेरा, Lane Change Assist, ऑटोमॅटिक इमर्जन्सी ब्रेकिंग आणि इमर्जन्सी स्टीयरिंगसारखी सुरक्षा तंत्रज्ञाने आहेत. Google Gemini च्या मदतीने नेव्हिगेशन, ठिकाणांचा शोध आणि मेसेजिंगसाठी नैसर्गिक भाषेत व्हॉइस कमांड देता येतात. सॉफ्टवेअर अपडेट्स OTA पद्धतीने मिळणार आहेत. प्रत्यक्ष इलेक्ट्रिक रेंज तापमान, हवामान, वेग, रस्ता आणि ड्रायव्हिंग पद्धतीनुसार बदलू शकते.