Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 16 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

यामाहा R15 V4 चे अपडेटेड व्हर्जन भारतात लाँच; आता आणखी 2 रंगांमध्ये क्विकशिफ्टरची सुविधा

यामाहा R15 V4 आता Racing Blue आणि Matte Pearl White रंगांमध्येही क्विकशिफ्टरसह उपलब्ध झाली आहे. क्लच न वापरता गियर अपशिफ्ट करण्याची ही सुविधा स्पोर्ट्स बाइकच्या रायडिंग अनुभवाला आणखी वेगळी बनवते. पण या फीचरसाठी किती जास्त किंमत द्यावी लागेल, हेही जाणून घ्या.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Sep 16, 2026 | 04:58 PM
यामाहा R15 V4 चे अपडेटेड व्हर्जन भारतात लाँच; आता आणखी 2 रंगांमध्ये क्विकशिफ्टरची सुविधा
Follow Us
Follow Us:
  • यामाहा R15 V4 च्या 2 नव्या रंगांमध्ये आता क्विकशिफ्टरची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.
  • 155cc VVA इंजिन 18.1 bhp पॉवर आणि 14.2 Nm टॉर्क तयार करते.
  • बाइकला USD फोर्क्स, ड्युअल-चॅनेल ABS आणि 11 लिटर क्षमतेचा फ्युल टँक मिळतो.
यामाहा मोटर इंडियाने लोकप्रिय स्पोर्ट्स बाइक यामाहा R15 V4 मध्ये महत्त्वाचा अपडेट केला आहे. कंपनीने आता Racing Blue आणि Matte Pearl White या 2 रंगांमध्ये क्विकशिफ्टरची सुविधा उपलब्ध केली आहे. यापूर्वी ही सुविधा फक्त Intensity White रंगात मिळत होती. Racing Blue व्हेरिएंटची किंमत क्विकशिफ्टरशिवाय ₹1,74,850, तर क्विकशिफ्टरसह ₹1,79,500 (एक्स-शोरूम) आहे. म्हणजेच या फीचरसाठी ₹4,650 जास्त मोजावे लागतील.

क्लच न वापरता गियर बदलण्याची सुविधा

R15 V4 मधील क्विकशिफ्टर हे युनिडायरेक्शनल सिस्टीम आहे. त्यामुळे बाइक वेग घेत असताना क्लच लीव्हर न दाबता वरचा गियर बदलता येतो. पण गियर डाउन करण्यासाठी नेहमीप्रमाणे क्लचचा वापर करावा लागतो. त्यामुळे स्पोर्टी रायडिंगमध्ये गियर बदलताना रायडरला वेग आणि नियंत्रण राखणे सोपे होते. पण ही सुविधा अजून सर्व रंगांमध्ये उपलब्ध करण्यात आलेली नाही.

Yamaha R2: नवीन यामाहा आर २ खरेदी करण्याचा विचार आहे? या २०० सीसी स्पोर्ट्सबाईकबद्दल जाणून घ्या ५ महत्त्वाच्या गोष्टी

155cc इंजिन आणि 6-स्पीड गिअरबॉक्स

यामाहा R15 V4 मध्ये 155cc, सिंगल-सिलिंडर, लिक्विड-कूल्ड इंजिन देण्यात आले आहे. Variable Valve Actuation म्हणजेच VVA तंत्रज्ञानासह हे इंजिन 18.1 bhp पॉवर आणि 14.2 Nm टॉर्क तयार करते. इंजिनला 6-स्पीड गिअरबॉक्स जोडण्यात आला आहे. VVA तंत्रज्ञानामुळे वेगवेगळ्या RPM वर वाल्व्ह ऑपरेशनमध्ये बदल करून पॉवर डिलिव्हरी जास्त कंट्रोलड ठेवण्याचा प्रयत्न केला जातो.

स्पोर्ट्स बाइकला मिळते प्रीमियम हार्डवेअर

R15 V4 मध्ये Deltabox फ्रेम, 37 mm USD फ्रंट फोर्क्स आणि लिंक्ड-टाइप Monocross रिअर सस्पेंशन मिळते. ब्रेकिंगसाठी पुढे 282 mm आणि मागे 220 mm डिस्क ब्रेक असून ड्युअल-चॅनेल ABS देण्यात आले आहे. बाइकला 17-इंच अलॉय व्हील्स मिळतात. सीटची उंची 815 mm, ग्राउंड क्लीअरन्स 170 mm आणि कर्ब वेट 141 kg आहे. फ्युल टँकची क्षमता 11 लिटर आहे.

सुपरकारचा लुक आता स्कुटरमध्ये! ‘Mansory’ ने मॉडिफाय केली Yamaha TMAX 560; पाहा काय आहे खास

फीचर्समध्ये LED लाइटिंग आणि डिजिटल कन्सोल

यामाहा R15 V4 मध्ये बाय-फंक्शनल LED हेडलॅम्प, LED पोझिशन लॅम्प, LED टेललॅम्प आणि डिजिटल इन्स्ट्रुमेंट कन्सोल मिळतो. कन्सोलवर गियर पोझिशन आणि VVA स्टेटससह विविध माहिती पाहता येते. निवडक व्हेरिएंटमध्ये स्मार्टफोन कनेक्टिव्हिटी आणि ट्रॅक्शन कंट्रोलची सुविधाही उपलब्ध आहे. आता Racing Blue आणि Matte Pearl White रंगांमध्ये क्विकशिफ्टरचा पर्याय मिळाल्याने या स्पोर्ट्स बाइकची इलेक्ट्रॉनिक फीचर लिस्ट आणखी विस्तारली आहे.

 

Web Title: Yamaha r15 v4 quickshifter new colours launched india auto news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 16, 2026 | 04:58 PM

Topics:  

  • automobile
  • Bikes
  • Yamaha

संबंधित बातम्या

ह्युंदाई BAYON चे पहिले डिझाइन स्केच जाहीर! दमदार SUV लूकसह येणार नवी कार; पाहा काय असेल खास
1

ह्युंदाई BAYON चे पहिले डिझाइन स्केच जाहीर! दमदार SUV लूकसह येणार नवी कार; पाहा काय असेल खास

एथर कोनार्क S की रिझ्टा? कोणती इलेक्ट्रिक स्कूटर ठरते बेस्ट, जाणून घ्या फरक
2

एथर कोनार्क S की रिझ्टा? कोणती इलेक्ट्रिक स्कूटर ठरते बेस्ट, जाणून घ्या फरक

होंडाच्या F1 पॉवर युनिटमध्ये मोठा फेरबदल; अॅस्टन मार्टिनच्या कामगिरीनंतर घेतला महत्त्वाचा निर्णय
3

होंडाच्या F1 पॉवर युनिटमध्ये मोठा फेरबदल; अॅस्टन मार्टिनच्या कामगिरीनंतर घेतला महत्त्वाचा निर्णय

Freelander 8 ची चीनमध्ये 19 सप्टेंबरपासून डिलिव्हरी सुरु! लॉन्चनंतर 12 तासांत मिळाले 5000 पेक्षा जास्त ऑर्डर्स
4

Freelander 8 ची चीनमध्ये 19 सप्टेंबरपासून डिलिव्हरी सुरु! लॉन्चनंतर 12 तासांत मिळाले 5000 पेक्षा जास्त ऑर्डर्स

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.