फोटो सौजन्य: iStock
भारतात सणांचा हंगाम नवरात्रीपासून सुरू होतो जो दिवाळीपर्यंत चालतो. या काळात देशभरात मोठ्या प्रमाणात विविध वाहनांची खरेदी केली जाते. कोणी बाईक घेत तर कोणी आपली ड्रीम कर विकत घेताना दिसतं. परंतु जसे आपण नवीन कार घेताना अनेक गोष्टींकडे लक्ष देताना दिसतो. अगदी तसेच अन्य महत्वाच्या गोष्टींकडे सुद्धा लक्ष देणे गरजेचे आहे. यापैकी एक गोष्ट म्हणजे PDI. PDI म्हणजे काय आणि वाहनाच्या डिलिव्हरीपूर्वी ते का आवश्यक असते, याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.
पीडीआयचा फुल्ल फॉर्म हा प्री डिलिव्हरी इन्स्पेक्शन असा आहे. कारची डिलिव्हरी घेण्याअगोदर पीडीआय हे खूप महत्वाचे असते.. सोप्या शब्दात समजून घ्याहूचे झाले तर, जेव्हाही आपण नवीन कार खरेदी करतो, तेव्हा डिलिव्हरीपूर्वी त्याची नीट तपासणी करणे अत्यंत आवश्यक असते.
जेव्हा कारला शोरूममध्ये आणले जाते, तेव्हा शोरूममध्ये पोहोचण्यापूर्वीच कारला स्टॉक यार्डमध्ये ठेवले जाते. या काळात अनेकवेळा कारला ओरखडे पडतात. कारची तपासणी करताना अनेक वेळा टायर फुटले किंवा इतर कोणताही दोष दिसून येतो.
हे देखील वाचा: Maruti Suzuki च्या कार्सचा विक्रीमध्ये दबदबा! ‘ही’ कार ठरतेय ग्राहकांची पहिली पंसत
PDI दरम्यान कारची उत्तमप्रकारे तपासणी केली पाहिजे. पीडीआय करताना कारचे बंपर, साइड प्रोफाइल, टायर आणि छत तपासले जाते. यानंतर, कारचा इंटिरिअर देखील नीट तपासले पाहिजे. आधुनिक कारमध्ये सनरूफ, लाईट, इंडिकेटर, पॉवर विंडो, ब्रेक, एसी, इन्फोटेनमेंट सिस्टीम यासह सर्व फीचर्स ड्रायव्हिंगद्वारे तपासली जातात. यासोबतच स्पेअर व्हील, जॅक आदींचीही तपासणी करावी. कारचे बोनेट उघडून इंजिन सुरू करूनही हे तपासता येते. या चेकिंग दरम्यान कोणत्याही प्रकारची अडचण असल्यास शोरूमच्या सेल्स एक्झिक्युटिव्हला त्याची माहिती द्या. याशिवाय कारचे व्हीआयएन क्रमांकही तपासावा.
हे देखील वाचा: पेट्रोल कारला पूर्णतः सीएनजी कार बनवायचे आहे का? मग फॉलो करा ‘या’ स्टेप्स
शोरूममध्ये सेल्स एक्झिक्युटिव्हच्या उपस्थितीत पीडीआय केल्यानंतर कोणतीही अडचण न आल्यास पीडीआय फॉर्मवर सही करावी.
जर एखाद्या व्यक्तीने पीडीआय न करता कारची डिलिव्हरी घेतली आणि नंतर त्याला काही समस्या आल्या, तर ती दुरुस्त करण्यात खूप अडचणी येतात. म्हणून, डिलिव्हरीपूर्वी पीडीआय नक्कीच केले पाहिजे.