फोटो सौजन्य: Social Media
हल्ली मार्केटमध्ये इलेक्ट्रिक कार्स खूप मोठ्या प्रमाणात लाँच होताना दिसत आहे. या इलेक्ट्रिक कार्स दिसण्यासोबतच परफॉर्मन्समध्ये सुद्धा दमदार आहे. त्यामुळेच अनेक ग्राहक या ईव्ही खरेदी करण्यासाठी आपले बजेट तयार करत असतात. त्यात आता कार लोनची सुविधा असल्याने अनेक जणांना आपली आवडती कार घेणे शक्य झाले आहे.
भारतात अनेक कंपनीज आहेत ज्या इलेक्ट्रिक कार्स ऑफर करत आहे. त्यातीलच एक कंपनी म्हणजे एमजी मोटर्स. MG Comet EV आणि MG Windsor EV या इलेक्ट्रिक कार्ससाठी लोकप्रिय आहेत. कंपनीने अलीकडेच CUV सेगमेंटमध्ये MG Windsor ही नवीन EV म्हणून सादर केली आहे. जर तुम्ही देखील ही कार खरेदी करण्याचा विचार करत असाल आणि त्याचे बेस व्हेरियंट खरेदी करू इच्छित असाल, तर 2 लाख रुपयांच्या डाउन पेमेंटनंतर, दरमहा किती रुपयांची ईएमआय तुम्हाला भरावा लागेल याबाबत आज आपण जाणून घेऊया. पण त्याआधी या कारची किंमत जाणून घेऊया.
Hero, Suzuki, Royal Enfield साठी कसा होता नोव्हेंबर 2024, किती झाली विक्री? जाणून घ्या
JSW MG ने CUV सेगमेंटमध्ये Windsor EV आली आहे. या कारचा बेस व्हेरियंट Excite कंपनीने भारतीय मार्केटमध्ये 13.49 लाख रुपये (MG Windsor EV किंमत) च्या एक्स-शोरूम किंमतीत ऑफर केले आहे. जर ही कार राजधानी दिल्लीत खरेदी केली तर रजिस्ट्रेशन टॅक्स भरावा लागणार नाही. मात्र 59 हजार रुपयांच्या विम्याशिवाय 13498 रुपयांचा टीसीएस चार्ज भरावा लागणार आहे. त्यानंतर MG Windsor EV Excite ची रोड किंमत सुमारे 14 लाखाच्या वर जाऊ शकते.
तुम्ही या कारचा एक्साइट व्हेरियंट खरेदी केल्यास, बँकेकडून फक्त एक्स-शोरूम किंमतीवर फायनान्स केला जाईल. अशा परिस्थितीत, 2 लाखांचे डाउन पेमेंट केल्यानंतर, तुम्हाला बँकेकडून सुमारे 12.22 लाख रुपये फायनान्स करावा लागेल. जर बँकेने तुम्हाला 9 टक्के व्याजासह सात वर्षांसाठी 12.22 लाख रुपये दिले, तर तुम्हाला पुढील सात वर्षांसाठी प्रत्येक महिन्याला तुम्हाला 19668 रुपयांचा ईएमआय भरावा लागेल. हे व्याजदर प्रत्येक बँकेनुसार बदलू शकते.
Discount असावे तर असे! KTM च्या ‘या’ बाईकवर मिळतेय 20 हजार रुपयांपर्यंतची बंपर सूट
जर तुम्ही बँकेकडून 12.22 लाख रुपयांचे कार लोन सात वर्षांसाठी 9 टक्के व्याजदराने घेतले तर तुम्हाला सात वर्षांसाठी प्रत्येक महिन्याला 19668 रुपयांचा ईएमआय भरावा लागेल. अशा स्थितीत, सात वर्षांत तुम्हाला एमजी विंडसर ईव्हीच्या बेस व्हेरियंट एक्साइटसाठी सुमारे 4.29 लाख रुपये व्याज द्यावा लागेल. त्यानंतर तुमच्या वाहनाची एक्स-शोरूम, ऑन-रोड आणि व्याजासह एकूण किंमत सुमारे 18.52 लाख रुपये असेल.