फोटो सौजन्य: Social Media
भारतात दुचाकी वापरणाऱ्यांची संख्या खूप जास्त आहे. त्यातही अनेक दुचाकी उत्पादक कंपनीज आपल्या ग्राहकांनुसार नवनवीन बाईक्स मार्केटमध्ये आणत असतात. भारतात सगळेच ग्राहक दुचाकी खरेदी करताना एक गोष्टीचा विचार करताना दिसतात. ती गोष्ट म्हणजे किंमत. म्हणूनच तर अनेक दुचाकी उत्पादक कंपनी बजेट फ्रेंडली बाईक्स ऑफर करत असतात.
स्वस्त किंमतीव्यतिरिक्त, अशा अनेक कंपनीज आहेत, ज्या हाय परफॉर्मन्स आणि स्पोर्टी लूक असणाऱ्या बाईक्स ऑफर करत असतात. यातीलच एक कंपनी म्हणजे केटीएम. केटीएमच्या बाईक्सची क्रेझ ही तरुणामध्ये जास्त आहे. परंतु, महाग किंमतीमुळे अनेकांना या बाईक्स परवडत नाही. पण आता कंपनी आपल्या एका क्लासी बाईकवर दमदार डिस्काउंट देत आहे. या डिस्काउंटमुळे नक्कीच कंपनीच्या विक्रीत वाढ होण्याची संभावना आहे. चला याबद्दल अधिक जाणून घेऊया.
Skoda Kylaq ची बुकिंग सुरु, नववर्षात ‘या’ तारखेपासून मिळणार डिलिव्हरी
केटीएम कंपनी आपल्या 250 DUKE 20 हजार रुपयांचे डिस्काउंट देत आहे. म्हणजेच आता या बाईकची किंमत जी आधी 2.45 लाख रुपये होती. तीच आता तुम्हाला 2.25 लाख रुपयात मिळणार आहे. या किंमती तुमच्या जवळील शोरुमनुसार बदलू शकतात. केटीएमने सांगितले की ही विशेष ऑफर केवळ मर्यादित काळासाठीच असणार आहे. डिसेंबर अखेरपर्यंत किंवा स्टॉक टिकेपर्यंत ही ऑफर असणार आहे.
KTM 250 DUKE मध्ये राइड मोड स्ट्रीट आणि ट्रॅक मोड देण्यात आला आहे. यात नवीन एलईडी हेडलॅम्प सेटअप, नेव्हिगेशन आणि ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीने सुसज्ज असलेला नवीन 5-इंचाचा कलर टीएफटी डिस्प्ले देखील आहे.
2024 KTM 250 DUKE ही एक नवीन LED हेडलॅम्पसह एका नवीन स्पोर्टी लूकमध्ये येते, ज्यात इंटिग्रेटेड पायलट लाइट्स आहे. हे केवळ या बाईकची आक्रमक स्ट्रीट फायटर स्टाइल वाढवत नाही तर कमी प्रकाशाच्या परिस्थितीत व्हिसिबिलीटी देखील सुधारते.
फक्त 500 रुपयात बुक करू शकता OLA ची नवीन स्कूटर, किंमत आयफोन पेक्षाही कमी
KTM 390 DUKE कडून घेतलेला नवीन 5-इंचाचा TFT डिस्प्ले, रायडर कनेक्टिव्हिटीला नेक्स्ट लॅव्हेलवर घेऊन जाते. ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी आणि टर्न-बाय-टर्न नेव्हिगेशन रायडर्सना प्रत्येक राइडसाठी तयार करू शकतात.
KTM 250 DUKE आता मानक म्हणून बाय डायरेक्शनल क्विकशिफ्टर+ सह येते. या प्रगत तंत्रज्ञानामुळे क्लचशिवाय वर आणि खाली अशा दोन्ही बाजूंनी गियर शिफ्ट करता येते.
यात सर्व-नवीन एलईडी हेडलॅम्प, ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी आणि नेव्हिगेशनसह 5-इंच कलर TFT डिस्प्ले, 2 राइड मोड: स्ट्रीट, ट्रॅक (स्क्रीनसह लॅप टाइमर), ड्युअल-डायमेंशनल क्विकशिफ्टर +, पॉवर 250cc इंजिन मिळते.