फोटो सौजन्य: iStock
देशात दर महिन्याला लाखो बाईक्स विकल्या जात असतात. यातही बजेट फ्रेंडली बाईक्सची संख्या जास्त असते. बदलत्या काळानुसार ग्राहकांची डिमांड सुद्धा बदलत आहे. अशावेळी अनेक कंपनीज या बदलत्या काळानुसार आधुनिक बाईक्स मार्केटमध्ये लाँच करत असतात. तसेच ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी कंपनी दमदार डिस्कॉउंट्स सुद्धा देत असते. यामुळेच बाईक्सच्या विक्रीत सुद्धा वाढ होताना दिसत आहे.
अनेक मोठे उत्पादक दर महिन्याला लाखो स्कूटर आणि बाईक विकतात. नोव्हेंबर 2024 मध्येही अनेक उत्पादकांनी चांगली कामगिरी केली आहे. नुकताच नोव्हेंबर 2024 मधील बाईक्सचा सेल्स रिपोर्ट हाती आला आहे. या रिपोर्टनुसार, गेल्या महिन्यात Hero, Suzuki, Royal Enfield आणि Bajaj च्या किती युनिट्सची विक्री झाली? वार्षिक आधारावर विक्रीची कामगिरी कशी आहे? या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण जाणून घेणार आहोत. तसेच या कंपनीच्या विक्रीत वाढ झाली आहे की नाही याबाबत सुद्धा जाणून घेणार आहोत.
टाटा मोटर्स आणि टाटा इंटरनॅशनलचे आधुनिक पाऊल, पुण्यात व्हेईकल स्क्रॅपिंग फॅसिलिटी Re.Wi.Re लाँच
देशातील आघाडीची वाहन उत्पादक कंपनी Hero Motocorp ने अनेक उत्कृष्ट बाईक्स बाजारात उपलब्ध करून दिले आहेत. गेल्या महिन्यात कंपनीने एकूण 459805 युनिट्सची विक्री केली आहे. विशेष बाब म्हणजे सणासुदीच्या काळात कंपनीने 15.98 लाख युनिट्सची विक्री केली. Hero च्या इलेक्ट्रिक ब्रँड Vida च्या देखील 11600 युनिट्स विकल्या गेल्या आहेत. या काळात हार्ले डेव्हिडसनच्या 2800 युनिट्सचीही खरेदी करण्यात आली आहे. नोव्हेंबर 2024 मध्ये हिरो मोटोकॉर्पच्या विक्रीत दरवर्षी काही प्रमाणात घट झाली आहे.
जपानी दुचाकी उत्पादक सुझुकीने देशभरात अनेक उत्तम दुचाकी ऑफर केल्या आहेत. नोव्हेंबर 2024 मध्ये 94370 युनिट्स विकल्या आहेत. कंपनीने वार्षिक आधारावर आठ टक्के वाढ मिळवली आहे. नोव्हेंबर 2023 मध्ये कंपनीने 87096 युनिट्सची विक्री केली होती. देशांतर्गत बाजारात सुझुकीच्या बाईक्स आणि स्कूटरने 78333 युनिट्स विकल्या आहेत.
Discount असावे तर असे! KTM च्या ‘या’ बाईकवर मिळतेय 20 हजार रुपयांपर्यंतची बंपर सूट
रॉयल एनफिल्डने गेल्या महिन्यात 82257 युनिट्सचीही विक्री केली आहे. तर 23 नोव्हेंबर दरम्यान ही संख्या 80251 युनिटवर होती. आकडेवारीनुसार, कंपनीच्या विक्रीत दोन टक्क्यांची किंचित वाढ झाली आहे. गेल्या महिन्यात कंपनीने 10021 युनिट्सची निर्यात केली आहे, तर नोव्हेंबर 2023 मध्ये ही संख्या केवळ 5114 युनिट्स होती.
बजाज ऑटोने नोव्हेंबर 2024 मध्ये दुचाकींच्या 368076 युनिट्सचीही विक्री केली आहे. त्यापैकी 203611 युनिट्स देशांतर्गत बाजारात विकल्या गेल्या आहेत. तर 164465 युनिट्सची निर्यात झाली आहे. आकडेवारीनुसार, कंपनीने देशांतर्गत बाजारात सात टक्क्यांची घसरण नोंदवली आहे. नोव्हेंबर 2023 मध्ये कंपनीची एकूण विक्री 218597 युनिट्स होती.