फक्त काहीच सेकंदात Tata Nexon ची चावी असेल तुमच्या हातात, किती असेल EMI?
भारतात अनेक अशा ऑटो कंपन्या आहेत, ज्यांच्या फक्त नावानेच कार खरेदीदार कंपनीच्या वाहनांवर विश्वास ठेवत असतात.अशीच एक कंपनी म्हणजे टाटा मोटर्स, टाटाने देशात अनेक उत्तम कार ऑफर केल्या आहेत. तसेच ग्राहकांचा सुद्धा कंपनीवर खूप जास्त विश्वास आहे. इलेक्ट्रिक सेगमेंटमध्ये सुद्धा कंपनीने चांगल्या परफॉर्मन्स देणाऱ्या कार ऑफर केल्या आहेत.
भारतीय मार्केटमध्ये टाटा मोटर्सच्या अनेक कार्स लोकप्रिय आहेत. टाटा नेक्सॉन ही त्यातीलच एक कार जी कंपनी सब फोर मीटर एसयूव्ही सेगमेंटमध्ये ऑफर करते. जर तुम्ही या कारचा बेस व्हेरिएंट खरेदी करण्याचा विचार करत असाल आणि 2 लाख रुपयांचे डाउन पेमेंट केल्यानंतर वाहन घरी आणू इच्छित असाल, तर तुम्हाला दरमहा किती ईएमआय भरावा लागेल? चला याबद्दल जाणून घेऊयात.
नेक्सॉनच्या बेस व्हेरिएंटची एक्स-शोरूम किंमत 8 लाख रुपये आहे. जर ही कार दिल्लीत खरेदी केली तर RTO ला सुमारे 63 हजार रुपये आणि इंश्युरन्ससाठी सुमारे 36 हजार रुपये द्यावे लागतील. त्यानंतर Tata Nexon on road price सुमारे 9 लाख रुपये होईल.
जर तुम्ही या कारचा बेस व्हेरिएंट खरेदी केला तर बँक फक्त एक्स-शोरूम किमतीवर कारला फायनान्स कराल. अशा परिस्थितीत, 2 लाख रुपयांचे डाउन पेमेंट केल्यानंतर, तुम्हाला बँकेकडून सुमारे 7 लाख रुपयांचे फायनान्स करावे लागेल. जर बँक तुम्हाला 9 टक्के व्याजदरासह सात वर्षांसाठी 7 लाख रुपये देत असेल, तर तुम्हाला पुढील सात वर्षांसाठी दरमहा 11264 रुपयांचा ईएमआय भरावा लागेल.
जर आपण 9% व्याजदराने 7 वर्षांसाठी ₹7,00,000 चा कार लोन घेतला, तर पुढील 7 वर्षे तुम्हाला दर महिन्याला 11,264 इतका EMI भरावा लागेल. अशा परिस्थितीत, 7 वर्षांत तुम्ही Tata Nexon साठी सुमारे 2.64 लाख इतका व्याज भराल. त्यामुळे तुमच्या कारची एकूण किंमत जवळपास 11.46 लाख इतकी होईल.
टाटा नेक्सॉनला सब फोर मीटर कॉम्पॅक्ट एसयूव्ही म्हणून ऑफर करते. ही कार बाजारात Maruti Breeza, Hyundai Venue, Skoda Kylaq, Kia Syros, Kia Sonet सारख्या एसयूव्हीशी थेट स्पर्धा करते.