फोटो सौजन्य: Social Media
आपली स्वतःची कार खरेदी करणे हा आयुष्यातील अनेक सुखद क्षणांपैकी एक क्षण आहे. मात्र, अनेक जणांना कार खरेदी करताना संपूर्ण रक्कम एकाच वेळी भरणे शक्य होत नाही.अशावेळी ते कार लोनच्या साहाय्याने कार खरेदी करतात.
भारतात अनेक उत्तम कार उत्पादक कंपन्या आहेत. Tata Motors ही त्यातीलच एक कंपनी. भारतीय ग्राहकांचे टाटाच्या कार्सवर विशेष प्रेम आहे. याच कारणामुळे कंपनीच्या विक्रीत देखील सातत्याने वाढ होताना दिसते.
भारतीय मार्केटमध्ये अशा कार खूप पसंत केल्या जातात, ज्या कमी किमतीत चांगले मायलेज आणि आधुनिक फीचर्स ऑफर करतात. अशीच एक कार म्हणजे Tata Nexon, जी कंपनीच्या सर्वाधिक विक्री होणाऱ्या कार्सपैकी एक आहे. ही एसयूव्ही 8 लाख रुपयांच्या एक्स-शोरूम किमतीत उपलब्ध आहे.
Tesla Car खरेदी करण्यासाठी आनंदाची बातमी ! July 2025 मध्ये उघडू शकतं पाहिलं शोरूम
जर तुम्हाला ही कार खरेदी करायची असेल, परंतु कमी बजेटमुळे हे जर शक्य होत नसेल, तर आज आपण या कारच्या फायनान्स प्लॅनबद्दल जाणून घेणार आहोत. यासह, एकदाच पूर्ण पेमेंट करण्याऐवजी, तुम्हाला दरमहा काही रक्कम EMI रुपयांमध्ये भरावी लागेल. मात्र, त्याआधी Tata Nexon च्या किमतीबद्दल जाणून घेऊयात.
राजधानी दिल्लीमध्ये टाटा नेक्सॉनच्या स्मार्ट (पेट्रोल) व्हेरिएंटची ऑन-रोड किंमत 9.04 लाख रुपये आहे. जर तुम्ही टाटा नेक्सॉनच्या या व्हेरिएंट साठी 50,000 रुपयांचे डाउन पेमेंट केले, तर तुम्हाला 8.54 लाख रुपयांचे कार लोन घ्यावे लागेल. अशा प्रकारे, तुम्हाला 9.8 टक्के व्याजदराने दरमहा 21,580 रुपयांचा ईएमआय द्यावा लागेल. जर तुमचा लोनचा कालावधी 4 वर्षांचा असेल. या संपूर्ण कॅल्क्युलेशन नंतर, या कारची किंमत 10 लाख 35 हजार रुपयांपर्यंत जाईल.
100 Km चा मायलेज देणारी जगातील पहिली CNG बाईक झाली स्वस्त, फक्त मर्यदित कालावधीसाठी असेल ऑफर
कंपनीने टाटा नेक्सॉनमध्ये 1.2 लिटर टर्बो पेट्रोल इंजिन दिले आहे. हे इंजिन 120 बीएचपीच्या कमाल पॉवरसह 170 एनएमचा पीक टॉर्क निर्माण करते. त्याच वेळी, कारचा 1.5 लिटर डिझेल इंजिन व्हेरिएंट 110 बीएचपीच्या कमाल पॉवरसह 260 एनएमचा टॉर्क जनरेट करतो.
कंपनीने टाटा नेक्सॉनमध्ये अनेक उत्तम फीचर्स दिले आहेत. यात 10.25 इंचाचा डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले आणि 10.25 इंचाचा डिजिटल टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम आहे. याशिवाय, हाईट अॅडजेस्टेबल करण्यायोग्य सीट्स, वायरलेस चार्जिंग, फास्ट यूएसबी चार्जर, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोलसह अलॉय व्हील्स यासारख्या उत्तम फीचर्स कारमध्ये देण्यात आले आहेत.