Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

नववर्षात कोणती वाहनं होणार स्वस्त आणि महाग? खिश्याला कात्री लागण्याअगोदर जाणून घ्या

जानेवारी 2025 मध्ये कार आणि बाईकच्या किंमतीत मोठा बदल दिसू शकतो. नवीन वर्षात कोणत्या बाईक आणि कार महागणार आहेत, त्याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेऊया.

  • By मयुर नवले
Updated On: Dec 06, 2024 | 07:08 PM
फोटो सौजन्य: iStock

फोटो सौजन्य: iStock

Follow Us
Follow Us:

2024 चं वर्ष पाहता पाहता संपायला आहे. अनेकांनी तर 31st चा प्लॅन सुद्धा बनवला असेल. नववर्षात अनेक जण नवनवीन गोष्टी खरेदी करत असतात. त्यातच काही जण आपली आवडती बाईक किंवा कार सुद्धा विकत घेताना दिसतात. पण जर तुम्ही सुद्धा यंदाच्या नववर्षात कार किंवा बाईक खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. याचे कारण म्हणजे अनेक ऑटो कंपन्यांनी आपल्या वाहनावरील किंमती वाढवण्याचे निर्णय घेतले आहे. यात अद्याप तरी कुठल्याही कंपनीने त्यांच्या वाहनांच्या किंमतीत घट होणार आहे असे सांगितले नाही आहे.

नवीन वर्षाच्या सुरुवातीला अनेक वस्तूंच्या किंमती कमी किंवा वाढल्या जातात. 2025 मध्ये बाईक आणि कारच्या किंमतीतही बदल केले जाऊ शकते. नवीन वर्षाच्या आगमनापूर्वीच अनेक वाहन निर्मात्यांनी अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे. चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊया.

अशा ऑफर्स देणार तर चर्चा होणार! Volkswagen कडून या कार्सवर लाखो रुपयांचे डिस्काउंट

1 जानेवारी 2025 पासून बाईक्सच्या किंमतीत वाढ

भारतात बीएमडब्ल्यू बाईक्सची खूप क्रेझ आहे. या कंपनीच्या बाईक्सशिवाय आता स्कूटरही बाजारात दाखल झाल्या आहेत. BMW ची उपकंपनी BMW Motorrad ने जाहीर केले आहे की कंपनी 1 जानेवारीपासून आपल्या सर्व दुचाकींच्या किंमती वाढवणार आहे. बाईक आणि स्कूटरच्या किंमतीत ही वाढ महागाईचा दबाव आणि इनपुट कॉस्टमध्ये वाढ झाल्यामुळे करण्यात आली आहे.

BMW Motorrad India ने सांगितले की कंपनीच्या सर्व दुचाकींच्या किंमती 2.5 टक्क्यांनी वाढणार आहेत. बाईक आणि स्कूटरच्या नवीन किंमती 1 जानेवारीपासून लागू होणार आहेत. BMW Motorrad ने 2017 मध्ये भारतात आपल्या दुचाकींची विक्री सुरू केली. भारतातील लोकांनाही या ब्रँडची उत्पादने आवडतात.

डिसेंबर 2024 मध्ये Renault च्या ‘या’ कार्सवर मिळत आहे भरघोस सूट

कार पण होणार महाग?

ह्युंदाई मोटर इंडियानेही वाहनांच्या किंमती वाढवल्याची माहिती दिली आहे. कंपनीने गुरुवारी, ५ डिसेंबर रोजी जारी केलेल्या प्रेस रिलीजमध्ये, इनपुट कॉस्टमध्ये वाढ झाल्यामुळे कारच्या किंमतीत वाढ करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. त्याचवेळी, भारतीय रुपयाच्या तुलनेत डॉलर मजबूत झाल्यामुळे वाहन उत्पादकांना वाहनांचे स्पेअर पार्टस खरेदी करणेही महाग होत असून, त्याचा परिणाम वाहनांच्या किंमतीवर होणार आहे. नवीन वर्षात ह्युंदाई कारच्या किमतीत २५ हजार रुपयांपर्यंत वाढ होऊ शकते.

मारुती सुझुकीने सुद्धा आज शुक्रवार 6 डिसेंबर रोजी आपल्या वाहनांच्या किंमती वाढवण्याची घोषणा केली आहे. इनपुट कॉस्ट आणि ऑपरेशनल खर्चात वाढ झाल्यामुळे वाहनांच्या किंमतीत वाढ होत आहे. वाहन उत्पादक वाहनांच्या किंमती चार टक्क्यांपर्यंत वाढवू शकतात. कारच्या किंमतीती हा बदल वेगवेगळ्या मॉडेल्सनुसार होऊ शकतो.

Web Title: Which vehicles will be cheap and expensive in the new year

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 06, 2024 | 07:08 PM

Topics:  

  • auto news

संबंधित बातम्या

Top 5 SUV: बजेट फक्त 10 लाख, 5 ढाँसू कार्स; आताच तपशील पाहून घ्या
1

Top 5 SUV: बजेट फक्त 10 लाख, 5 ढाँसू कार्स; आताच तपशील पाहून घ्या

Maruti Suzuki: सुझुकीच्या नव्या टेक्निकने मारुतीच्या कार्समध्ये होणार मोठा बदल! उत्तम मायलेज आणि परफॉर्मन्स
2

Maruti Suzuki: सुझुकीच्या नव्या टेक्निकने मारुतीच्या कार्समध्ये होणार मोठा बदल! उत्तम मायलेज आणि परफॉर्मन्स

JSW GreenTech ची इलेक्ट्रिक कमर्शियल मोबिलिटीमध्ये दमदार एन्ट्री; ‘AMPSTAR’ ब्रँड लाँच
3

JSW GreenTech ची इलेक्ट्रिक कमर्शियल मोबिलिटीमध्ये दमदार एन्ट्री; ‘AMPSTAR’ ब्रँड लाँच

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.