फोटो सौजन्य: iStock
2024 हे वर्ष संपायला आता फक्त काही आठवडेच शिल्लक आहेत. परंतु नवीन कार्सचे लाँचिंग काही थांबायचे नाव घेत नाही आहे. ज्याप्रमाणे नवीन कार्स लाँच होत आहे, त्याचप्रमाणे अनेक ऑटो कंपनीज आपल्या कार्सवर ईयर एन्ड ऑफर सुद्धा देत आहे. या ऑफर्समुळे अनेक ग्राहक वेगवेळ्या कंपनीच्या कार्सकडे आकर्षित होताना दिसत आहे.
अनेक कंपनीज वर्षाच्या शेवटच्या महिन्यात त्यांच्या कार्सवर सूट देतात. रेनॉल्ट कंपनी देशात अनेक उत्तम कार्स ऑफर करत आहे. परंतु आता वर्षाच्या अखेरीस कंपनी आपल्या कार्सवर दमदार ऑफर देताना दिसत आहे. Renault Kwid, Kiger आणि Triber वर डिसेंबर 2024 मध्ये 75,000 रुपयांपर्यंत सूट मिळत आहे. ही ऑफर 2024 च्या शेवटपर्यंत केलेल्या बुकिंग आणि डिलिव्हरीसाठी लागू असणार आहे. या तिन्ही रेनॉल्ट वाहनांवर किती रुपयांची सवलत आहे त्याबद्दल जाणून घेऊया.
कार खरेदीदारांचे खिस्से होणार रिकामे, Nissan नंतर आता ‘ही’ ऑटो कंपनी वाढवणार कार्सची किंमत
निवडक कॉर्पोरेट संस्था आणि सार्वजनिक क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी 8,000 रुपयांपर्यंत कॉर्पोरेट सूट उपलब्ध आहे. शेतकरी, सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांना 4,000 रुपयांपर्यंत ग्रामीण सवलत मिळत आहे. कंपनी वाहन स्क्रॅपेजसाठी ‘रिलिव्ह’ सूट आणि सर्व कारसह अतिरिक्त लॉयल्टी बोनस देखील देत आहे.
महत्वाची सूचना: वर नमूद केलेल्या ऑफर्स किंवा डिस्कॉउंट्स प्रत्येक शहर आणि राज्यानुसार वेगवेगळ्या असू शकतात.