फोटो सौजन्य: iStock
पाहता पाहता आपण सगळेच 2024 च्या अंतिम महिन्यात पोहोचलो आहोत. जरी हे 2024 चं वर्ष संपायला आले असले तरी नवीन कार्स लाँच होण्याचे प्रमाण काही कमी झालेले नाही. अशातच अनेक ऑटो कंपनी आपल्या कार्सवर इअर एन्ड ऑफर सुद्धा देताना दिसत आहे.
फॉक्सवॅगन कंपनी देशात अनेक उत्तम कार्स ऑफर करत आहे. त्यातही कंपनीच्या कार्स आपल्या वेगळ्या डिझाईनमुळे जास्त ओळखल्या जातात. अनेकदा ग्राहकांना या कंपनीच्या कार्स खरेदी करण्यासाठी विचार करावा लागतो. पण आता कंपनीने ग्राहकांसाठी एक उत्तम संधी आणली आहे. आता फॉक्सवॅगन आपल्या कार्सवर लाख रुपये वाचवण्याची सोनेरी संधी ग्राहकांना देत आहे.
जर तुम्ही डिसेंबर 2024 मध्ये वर्षाच्या शेवटच्या महिन्यात फॉक्सवॅगन कंपनीची कार खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर कोणत्या कारवर किती बचत करता येईल, हे आपण या बातमीत जाणून घेणार आहोत.
टिगुआन भारतीय मार्केटमध्ये फोक्सवॅगनने फ्लॅगशिप एसयूव्ही म्हणून ऑफर केली आहे. जर तुम्ही Tiguan खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर कंपनी डिसेंबर 2024 मध्ये या SUV वर 4.9 लाख रुपयांपर्यंत सूट देत आहे. ज्यामध्ये 2 लाख रुपयांपर्यंत कॅश डिस्काउंट आणि 50 हजार रुपयांपर्यंतचा एक्सचेंज बोनस समाविष्ट आहे. याशिवाय, जर तुम्ही 2023 मध्ये बनवलेले SUV मॉडेल खरेदी केले तर तुम्ही आणखी बचत करू शकता.
माहितीनुसार, 2023 च्या मॉडेलवर, कंपनी 90 हजार रुपयांचे चार वर्षांचे सेवा मूल्य पॅकेज आणि 1.50 लाख रुपयांच्या एक्सचेंजसह 20 हजार रुपयांच्या स्क्रॅपेज पॅकेजची ऑफर देखील देत आहे. या एसयूव्हीची एक्स-शोरूम किंमत 35.17 लाख रुपयांपासून सुरू होते.
Taigun ही कंपनीची सर्वात स्वस्त SUV म्हणून ऑफर करण्यात आली आहे. डिसेंबर महिन्यात ही SUV खरेदी केल्यास जास्तीत जास्त 2 लाख रुपयांची बचत होऊ शकते. ही बचत त्याच्या एक लिटर क्षमतेच्या व्हेरियंटवर होईल. 1.5 लिटर क्षमतेच्या व्हेरियंटवर 50 हजार रुपयांचा फायदा होईल. त्याचे 2023 मॉडेल्स खरेदी केल्यावर तुम्हाला 50 हजार रुपयांचा अतिरिक्त फायदा मिळेल.
फोक्सवॅगनने व्हरटस ही तिची एकमेव सेडान म्हणून भारतात आणली आहे. या महिन्यातही या सेडानवर दीड लाख रुपयांपर्यंतची बचत होऊ शकते. ही ऑफर त्याच्या एक लिटर व्हर्जनवर उपलब्ध आहे. त्याचबरोबर कंपनीकडून 1.5 लिटर व्हर्जनवर 50 हजार रुपयांच्या डिस्काउंट ऑफर दिल्या जात आहेत. 2023 च्या मॉडेल्सवर 50 हजार रुपयांची अतिरिक्त बचत होणार आहे. दोन एअरबॅगसह सेडान कारच्या व्हेरियंटवर 40 हजार रुपयांची अतिरिक्त बचत केली जाऊ शकते.