Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 12 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

CNG भरताना आपल्याला ड्रायव्हर कारमधून का उतरवतो? फक्त सेफ्टी नव्हे तर ‘ही’ देखील आहेत कारणं

सीएनजी भरताना आपल्याला नेहमीच कारमधून उतरावे लागते. मात्र, तुम्ही कधी विचार केला आहे की यामागील नेमकी कारणं काय? चला याबद्दल अधिक जाणून घेऊयात.

  • By मयुर नवले
Updated On: Nov 06, 2025 | 06:15 AM
मुंबई सीएनजी दरात २ रुपयांची वाढ

मुंबई सीएनजी दरात २ रुपयांची वाढ

Follow Us
Follow Us:
  • सीएनजी वाहनांना भारतात मागणी
  • सीएनजी भरताना कारमधून बाहेर का उतरावे लागते?
  • चला यामागची कारणे जाणून घेऊयात
भारतीय ऑटो बाजारात अनेक उत्तम ऑटो कंपन्या आहेत, ज्या बेस्ट कार ऑफर करत असतात. सध्या इलेक्ट्रिक वाहनांच्या मागणीत झपाट्याने जरी वाढ होत असली तरी CNG वाहनांची मागणी कमी झालेली नाही. जास्त मायलेज मिळवू इच्छिणारे बहुतेक लोक सीएनजी कार खरेदी करतात. पेट्रोल आणि डिझेलपेक्षा या कार जास्त मायलेज देतात. मात्र, जेव्हा कधी आपण कारमध्ये सीएनजी भरत असतो तेव्हा ड्रायव्हर आपल्याला कारमधून उतरायला सांगतो. असे का? चला याबद्दल जाणून घेऊयात.

म्हणूनच ड्रायव्हर CNG भरताना आपल्याला कारमधून उतरवतो?

CNG (कंप्रेस्ड नॅचरल गॅस) ही अत्यंत जास्त दाबाखाली म्हणजेच सुमारे 200 ते 250 PSI (पाउंड प्रति वर्ग इंच) – भरली जाते. या उच्च दाबामुळे अगदी किरकोळ गळती झाली तरी मोठा अपघात होऊ शकतो.

CNG भरण्याच्या वेळी जर कुठल्याही कारणाने गॅस लीक झाली, तर वाहनाच्या आत बसलेले प्रवासी धोक्यात येऊ शकतात. मात्र बाहेर उभे राहिल्यास जीव वाचवण्याची शक्यता अधिक असते.

कारच्या आत कधीकधी घर्षणामुळे स्थिर वीज तयार होते. गॅस लीक झाल्यास या स्थिर विजेची लहानशी ठिणगीदेखील आगीचा धोका निर्माण करू शकते.

CNG ला एक वेगळा वास असतो, जो काही लोकांमध्ये डोकेदुखी, चक्कर येणे किंवा मळमळ निर्माण करू शकतो. वाहनाबाहेर राहिल्यास या त्रासांपासून बचाव होऊ शकतो.

गॅस भरण्याच्या वेळी टाकी ओव्हरफिल होणार नाही, याची खात्री करणे अत्यावश्यक आहे. टाकीत जास्त दाब निर्माण झाल्यास स्फोट किंवा अपघाताचा धोका वाढतो. वाहनाबाहेर उभे राहिल्यास आपण हे अधिक नीट निरीक्षण करू शकतो.

अनेक वेळा CNG किट बाहेरील मेकॅनिककडून बसवली जाते, आणि गॅस भरणाऱ्या व्यक्तीला त्या किटची फिटिंग किंवा गळतीची योग्य माहिती नसते, ज्यामुळे धोका आणखी वाढतो.

CNG कार्सचा 15 वर्षांचा इतिहास

भारतात CNG कार्सची सुरुवात सुमारे 15 वर्षांपूर्वी झाली. मारुती सुझुकी ही पहिली कंपनी होती जिने फॅक्टरी-फिटेड CNG कार्स बाजारात आणल्या. 2010 साली मारुतीने Alto, WagonR आणि Eeco या मॉडेल्समध्ये प्रथमच CNG किट देण्यास सुरुवात केली.

त्याआधी कोणतीही कंपनी फॅक्टरीतून थेट CNG कार विकत नसे; ग्राहकांना कार खरेदी केल्यानंतर मार्केटमध्ये जाऊन किट बसवावी लागत होती. आजच्या काळात मात्र CNG कार्स अधिक प्रगत, सुरक्षित आणि कार्यक्षम बनल्या आहेत.

 

Web Title: Why we get out of car while filling cng

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 06, 2025 | 06:15 AM

Topics:  

  • automobile
  • cars
  • CNG Price

संबंधित बातम्या

SUV ची क्रेझ असतानाही भारतात MPV मार्केटची मोठी झेप! 4 वर्षांत विक्री जवळपास दुप्पट
1

SUV ची क्रेझ असतानाही भारतात MPV मार्केटची मोठी झेप! 4 वर्षांत विक्री जवळपास दुप्पट

टीव्हीएस Apache RTR 125 LC vs हिरो Xtreme 125R vs बजाज पल्सर 125 vs होंडा CB125 Hornet; कोणती बाईक ठरतेय बेस्ट?
2

टीव्हीएस Apache RTR 125 LC vs हिरो Xtreme 125R vs बजाज पल्सर 125 vs होंडा CB125 Hornet; कोणती बाईक ठरतेय बेस्ट?

यावर्षीच्या भारतातील टॉप 10 EV Brands!  टाटा पहिल्या क्रमांकावर, महिंद्राची मोठी झेप; MGला टाकले मागे!
3

यावर्षीच्या भारतातील टॉप 10 EV Brands!  टाटा पहिल्या क्रमांकावर, महिंद्राची मोठी झेप; MGला टाकले मागे!

टीव्हीएस अपाचे RR 310 ची इटलीत ऐतिहासिक एन्ट्री! मिसानो रेसिंग ट्रॅकवर भारतीय रायडर्सचा जलवा
4

टीव्हीएस अपाचे RR 310 ची इटलीत ऐतिहासिक एन्ट्री! मिसानो रेसिंग ट्रॅकवर भारतीय रायडर्सचा जलवा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.