
जावा येझदी मोटरसायकल्सने आपली नवी ‘येझडी रोडस्टर रेड वूल्फ’ ही बाईक ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म्स ॲमेझॉन आणि फ्लिपकार्टवर लाँच केली आहे. डिजिटल-फर्स्ट दृष्टिकोन अधिक मजबूत करत कंपनीने आपली ही लोकप्रिय रोडस्टर बाईक देशातील जास्तीत जास्त ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हे पाऊल उचलले आहे.
७० च्या दशकातील क्लासिक लुक आणि पॉवरफुल इंजिन १९७० च्या दशकातील येझडीच्या ऐतिहासिक डिझाइनने प्रेरित असलेल्या ‘रेड वूल्फ’ला गहिरा लाल रंग, क्रोम डिटेलिंग आणि दमदार रोडस्टर लुक देण्यात आला आहे. यामध्ये ३५० ‘अल्फा२’ लिक्विड-कुल्ड इंजिन असून ते ६-स्पीड गिअरबॉक्स आणि असिस्ट अँड स्लिपर क्लचसह येते. लांबच्या प्रवासासाठी आरामदायी सिटिंग, ड्युअल-चॅनेल ABS आणि १२.५ लिटरची इंधन टाकी देण्यात आली आहे, जी एका रिफिलमध्ये ३५० किमीपेक्षा जास्त मायलेज देते.
डिजिटल विक्रीवर भर जावा येझदी मोटरसायकल्सचे सह-संस्थापक अनुपम थरेजा यांनी सांगितले की, “येझदी रोडस्टरला तिच्या वेगळ्या स्टाईल आणि इंजिनिअरिंगमुळे रायडर्सकडून नेहमीच पसंती मिळाली आहे. रेड वूल्फच्या आगमनाने ही उत्सुकता आणखी वाढली आहे. ॲमेझॉन आणि फ्लिपकार्टसारख्या प्रमुख ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर उपलब्ध झाल्यामुळे ही बाईक आता भारतातील विविध शहरांमधील ग्राहकांना सहज खरेदी करता येईल.” किंमत आणि ऑनलाईन खरेदीची सोपी प्रक्रिया येझडी रोडस्टर रेड वूल्फची दिल्लीतील एक्स-शोरूम किंमत ₹२,०९,९५० निश्चित करण्यात आली आहे.