
Maruti Suzuki Price Hike: (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)
Maruti Suzuki Price Hike: कंपनीने काल सोमवारी, 7 सप्टेंबर रोजी सांगितलं की आमच्या काही गाड्यांचे भाव वाढवत आहोत. ही वाढ 20,000 रुपयांपर्यंत असणार आहे आणि नवीन किमती याच सप्टेंबर 2026 पासून कंपनी म्हणते की गाडी तयार होणारे समान महाग झाल्याने ही वाढ करण्यात येत आहे.
मारुतीने फक्त एवढं सांगितलं की 20 हजार पर्यंत वाढ मॉडेल्स महाग होणार आहेत.नेमकी कोणती गाडी महाग होणार, कोणता व्हेरियंट महाग होणार हे काहीच सांगितलं नाही. कंपनीने अजून फिक्स तारीख सांगितली नसून फक्त सप्टेंबर महिन्यात नवीन दर लागू होतील एवढीच माहिती उपलब्ध दिली आहे. त्यामुळे जर तुम्ही पुढच्या काही दिवसात मारुतीची गाडी घ्यायचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी ही महत्वाची बातमी आहे. आताच बुक केली तर कदाचित तुम्हाला जुन्याच किमतीत गाडी मिळू शकेल. पण हे सगळं तुमच्या डीलरकडे कोणती गाडी आहे, त्यावर ऑफर आहे का यावर अवलंबून असेल. त्यामुळे लवकरात लवकर शोरूममध्ये जाऊन चौकशी केलेली तर खरी किंमत समजू शकते.
मारुतीचं म्हणणं आहे की,गेल्या काही महिन्यांपासून गाडी बनवायचा खर्च खूप वाढला आहे. लोखंड, स्टील, प्लास्टिक असे कच्चा मालाचे भाव गगनाला भिडले आहेत. त्याचबरोबर इतर खर्च पण वाढले आहेत. आम्ही खर्च कमी करण्यासाठी खूप प्रयत्न केले, पण आता परवडत नसल्याने नाईलाजाने भाव वाढवावे लागत आहेत. खरं तर ही गोष्ट फक्त मारुतीची नाही, सगळ्याच कार कंपन्यांना याच प्रॉब्लेमला तोंड द्यावं लागत आहे.
मारुतीकडे सध्या खूप गाड्या आहेत. स्वस्तातली Alto K10, WagonR, Swift, Dzire, Baleno, Fronx, Brezza, Ertiga आणि Grand Vitara सारख्या मोठ्या गाड्या पण आहेत. यातली नेमकी कोणती गाडी महाग होणार याची लिस्ट अजून कंपनीने दिली नाही. त्यामुळे सगळ्यांचं लक्ष आता सप्टेंबरकडे लागलं आहे. कंपनी कोणत्या गाडीचा भाव किती वाढवते हे बघणं महत्वाचं असेल.
एकीकडे ग्राहकांना झटका बसला असला तरी शेअर बाजारात मारुतीच्या शेअरला याचा फायदा झाला आहे. भाव वाढीची बातमी येताच मारुतीचा शेअर वाढला. काल बीएसईवर शेअर 0.84% ने वाढून 12,800 रुपयांवर गेला. यामुळे कंपनीचं एकूण मार्केट कॅप 4 लाख कोटींच्या पुढे गेलं आहे. कंपनी भाव वाढवणार म्हणजे नफा वाढणार, या आशेने गुंतवणूकदार खूश आहेत.
Suzuki Gixxer Range: सुजुकी गिक्सर रेंजला नवे ड्युअल-टोन रंग; किंमत आणि फीचर्स जाणून घ्या
जर तुम्ही मारुतीची गाडी घेणार असाल आणि तुमचं सगळं फायनल झालं असेल तर उशीर करू नका. या महिन्याच्या आत बुकिंग करून टाका. कारण सप्टेंबरमध्ये नवीन किंमत लागली की तुम्हाला 10 ते 20 हजार रुपये जास्त मोजावे लागतील. एकंदरीत काय, गाड्या बनवणं महाग झालंय आणि त्याचा भुर्दंड ग्राहकांच्या खिशावर पडतोय. मारुतीने सुरुवात केली आहे, उद्या बाकीच्या कंपन्या पण भाव वाढवतील अशी शक्यता आहे. त्यामुळे गाडी घ्यायची असेल तर आत्ताच घ्या, हाच सल्ला सगळे देत आहेत.