• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Blogs »
  • How To Maintain Relationship Know The Tips Nrsr

नात्यांमधला जमाखर्च

  • By साधना
Updated On: Jul 23, 2023 | 06:00 AM
नात्यांमधला जमाखर्च
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

आज नातं कोणतंही असो आपण इतरांसाठी किती केलं आणि त्यांनी आपल्यासाठी किती केलं, याचा हिशोब लावला जातो. एक काळ होता जेव्हा नात्यांसाठी सर्व काही त्यागण्याची, सहन करण्याची ताकद होती. पण काळ गेला वेळ ही गेली. आज छोट्या छोट्या गोष्टींचा हिशोब ठेवला जातो. मी इतके कॉल आणि मेसेज केले पण समोरच्याने एकही नाही केला, असा ही हिशोब मांडला जातो. त्यावरून ही वाद व्हायला सुरुवात होते. सकाळची सुरुवात कोण ‘गुड मॉर्निंग’चा मेसेज पहिले करतो याची सुद्धा वाट बघितली जाते. किती क्षुल्लक गोष्टींची नोंद ठेवली जाते. पण प्रत्येक नात्यासाठी आपण किती केलंय याचा पाठपुरावा करायला हवा.

हल्ली पैसे काढायचे असतील तर आपलं बँकेत जाणं होत नाही. बँकांनी आता एटीएम कार्डची सेवा, सुविधा ग्राहकांना सहज उपलब्ध करून दिली आहे. एटीएममध्ये गेल्यावर आपण काय करतो? तर आपलं कार्ड काढतो, कार्ड मशिनमध्ये टाकतो. आपला पासवर्ड क्रमांक दाबतो, रक्कम टाकतो. मग मशिनचा खडखड असा आवाज येतो आणि पैसे बाहेर येतात. बरोबर ना? पण जर, एटीएममध्ये गेल्यावर कार्ड काढलं, कार्ड मशिनमध्ये टाकलं, आपला पासवर्ड दाबला, रक्कम टाकली, मग मशिनचा खडखड असा आवाज आला आणि पैसे आलेच नाहीत; मग पुन्हा कार्ड मशिनमध्ये टाकलं, पासवर्ड क्रमांक दाबला, रक्कम टाकली पुन्हा मशिनचा खडखड असा आवाज आला आणि पैसे आलेच नाहीत. का? का? असं का झालं?

आपण कधी हा विचार केलात का? आपण एटीएम कार्डने पैसे काढताना जर का खात्यात रक्कमच शिल्लक नसेल, तर मशिनमधून पैसे येतील का? नक्कीच नाही. मात्र मशिन खडखडाट नक्कीच करेल. याकरिता खात्यात रक्कम असणं गरजेच आहे. याचप्रकारे आपल्या स्नेहसंबंधांच्या बाबतीतही जर आपण नाती टिकविण्यासाठी किंवा दृढ करण्यासाठी कोणतीच सत्कृत्ये केली नाहीत, खात्यात शिल्लक टाकली नाही तर अडचणीच्या, दुःखाच्या वेळी आपल्या सोबत कुणीच नसेल. खात्यात रक्कमच नसेल तर मशिनमधून पैसे कसे येतील? म्हणून आपणही आपल्या नाते संबंधाचा जमाखर्च मांडला पाहिजे. त्यात आपल्या चुकांमुळे, अहंकारामुळे, स्वार्थामुळे, द्वेषबुद्धीने किंवा संपर्कात न राहिल्यामुळे दुरावलेली नाती खर्चात मोडतील, तर नातेसंबंध दृढ करण्यासाठी आपण केलेली सत्कृत्य व इतरांच्या आयुष्यात निःस्वार्थीपणे केलेलं योगदान आपल्या हीतसंबंधांची जमा दाखवतील. हा जमाखर्च आपल्या आयुष्यभर चालू राहतो. अधिक श्रीमंत होण्यासाठी जसं खात्यात जमा असणं गरजेचं आहे, तसं नाती बळकट करण्यासाठी नात्याचाही जमाखर्च पाहायलाच हवा.
जसे बँकेत पैसे जमा करण्यासाठी आपण कसे कसे पैसे जमा करतो, कमवतो. त्यातली काही रक्कम खर्च करतो तर काही पुढचा विचार करून जमा करतो. पुर्ण पगार आपण बँकेत जमा नाही करत. तसेच व्यावहारिक जीवनात नात्यातही आपण तेच करतो. जशी वेळ, जशी आवश्यकता त्याप्रमाणे आपण निर्णय घेतो. व्यवहार आणि नाती यांचा समतोल साधत कार्य करतो. फक्त भावुक झाले तर मग खर्चच खर्च होतो. पण थोडं समजुतीने विचार केला तर जमा आणि खर्च नीट सांभाळता येतो. नात्यांमध्ये जर जमा करायचं असेल तर जो शब्द आपण इतरांना देतो त्याचे पालन करणे महत्वाचे असते. कारण व्यक्ति खूप काही बोलून जातो मात्र करत काहीच नाही असं असेल तर तिथे जमा नाही तर उलट खर्चच होतो. नात्यांमध्ये आवश्यकता असते ती विश्वासाची जर तेच नसेल तर तिथे आपले बोलणे, वागणे हे वादास्पद होते. नातं म्हटलं की तिथे अपेक्षा ह्या आल्याच, आपण जर अपेक्षा करतो तर समोरची व्यक्ति आपल्याकडून अपेक्षा करते. हे सर्व स्वाभाविक असतं पण ते पुर्ण करणं तेवढंच कठीण. कारण सर्वांच्या अपेक्षा आपण पुर्ण नाही करू शकत. ज्यांच्या पूर्ण करतो तिथे थोडं जमा होतंही. मग पुढे वेळप्रसंगी ते नातं आपल्यासाठी काहीही करायला तयार  होतं.
एखाद्या व्यक्तीने काही चांगलं केलं की त्याचे कौतुक करणे, मदत करणे ही अशी गुंतवणूक असते की ती दीर्घकाळ चालते, आपल्या अडी-अडचणीला कामी येते. म्हणून अशी गुंतवणूक अधूनमधून करत राहिले पाहिजे. बाकी खर्चाचे ज्ञान तर आपल्याला आहेच. खर्च कसा करावा हे शिकवायची गरज नसते. पण कुठे करावा हे मात्र शिकणे आवश्यक असते. आयुष्यात नाती जपणे ही सुद्धा एक कला आहे. नाती कमवणं हे सर्वांनाच येत नाही. नात्यांना महत्व द्या, कारण तीच तर खरी पुंजी आहे.
– नीता बेन
bkneetaa24@gmail.com

Web Title: How to maintain relationship know the tips nrsr

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jul 23, 2023 | 06:00 AM

Topics:  

  • Marathi News
  • Relationship Tips

संबंधित बातम्या

Sambhajinagar : नासिर सिद्दीकी, आरिफ हुसैनी यांनी इम्तियाज जलीलांवर केले आरोप
1

Sambhajinagar : नासिर सिद्दीकी, आरिफ हुसैनी यांनी इम्तियाज जलीलांवर केले आरोप

Ahilyanagar : अखेर महायुतीतून शिवसेना शिंदे गट बाहेर ; काय होणार राजकीय परिणाम?
2

Ahilyanagar : अखेर महायुतीतून शिवसेना शिंदे गट बाहेर ; काय होणार राजकीय परिणाम?

‘सन मराठी’वर लवकरच सुरु होणार दोन अनोळखी व्यक्तींचा एकत्र प्रवास; ‘तू अनोळखी तरी सोबती’ नवी मालिका रिलीज
3

‘सन मराठी’वर लवकरच सुरु होणार दोन अनोळखी व्यक्तींचा एकत्र प्रवास; ‘तू अनोळखी तरी सोबती’ नवी मालिका रिलीज

Karjat News :  बाळाचं नशिब लिहिणाऱ्या सटूआईचं जागृत देवस्थान; भक्तांच्या हाकेला धावणाऱ्या देवीची ‘अशी’ आहे महती
4

Karjat News : बाळाचं नशिब लिहिणाऱ्या सटूआईचं जागृत देवस्थान; भक्तांच्या हाकेला धावणाऱ्या देवीची ‘अशी’ आहे महती

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Uttarpradesh News: देशसेवेचं स्वप्न अधुरंच! प्रेयसीच्या सततच्या धमक्यांमुळे तरुणाची आत्महत्या; व्हिडिओ कॉलवरच…

Uttarpradesh News: देशसेवेचं स्वप्न अधुरंच! प्रेयसीच्या सततच्या धमक्यांमुळे तरुणाची आत्महत्या; व्हिडिओ कॉलवरच…

Dec 31, 2025 | 10:10 AM
धुरंधरच्या FA9LA गाण्यावर पाकिस्तानच्या बलोच लोकांनी केला जबरदस्त डान्स; स्टेप्स पाहून युजर्स झाले इम्प्रेस; Video Viral

धुरंधरच्या FA9LA गाण्यावर पाकिस्तानच्या बलोच लोकांनी केला जबरदस्त डान्स; स्टेप्स पाहून युजर्स झाले इम्प्रेस; Video Viral

Dec 31, 2025 | 10:03 AM
केसांच्या बऱ्याच समस्या होतील कायमच्या दूर! ‘या’ पद्धतीने करा मेथी दाण्यांचा वापर, केसांमधील कोंडा होईल कमी

केसांच्या बऱ्याच समस्या होतील कायमच्या दूर! ‘या’ पद्धतीने करा मेथी दाण्यांचा वापर, केसांमधील कोंडा होईल कमी

Dec 31, 2025 | 10:00 AM
ट्रम्पनंतर चीन बनला पाकिस्तानचा पाठीराखा; भारत-पाक संघर्ष थांबवल्याचा केला दावा, सत्य काय?

ट्रम्पनंतर चीन बनला पाकिस्तानचा पाठीराखा; भारत-पाक संघर्ष थांबवल्याचा केला दावा, सत्य काय?

Dec 31, 2025 | 09:59 AM
Free Fire Max: प्लेयर्सना मिळणार व्हीकल स्किन आणि हॅपी न्यू इयर व्हॉईस नोट… जाणून घ्या अनलॉक करण्याची पद्धत

Free Fire Max: प्लेयर्सना मिळणार व्हीकल स्किन आणि हॅपी न्यू इयर व्हॉईस नोट… जाणून घ्या अनलॉक करण्याची पद्धत

Dec 31, 2025 | 09:53 AM
Chhatarpati Sambhaji nagar Crime News दलित अत्याचारासह गुन्हेगारीचा वाढता आलेख; संभाजीनगर गुन्हेगारांचा नवा अड्डा

Chhatarpati Sambhaji nagar Crime News दलित अत्याचारासह गुन्हेगारीचा वाढता आलेख; संभाजीनगर गुन्हेगारांचा नवा अड्डा

Dec 31, 2025 | 09:53 AM
हॉलिवूड अभिनेते Isiah Whitlock Jr यांचे वयाच्या ७१ व्या निधन, The Wire चित्रपटातून मिळाली प्रसिद्धी

हॉलिवूड अभिनेते Isiah Whitlock Jr यांचे वयाच्या ७१ व्या निधन, The Wire चित्रपटातून मिळाली प्रसिद्धी

Dec 31, 2025 | 09:53 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Thane : खासदार नरेश म्हस्केंना मोठा राजकीय धक्का; मुलाला नाकारली उमेदवारी

Thane : खासदार नरेश म्हस्केंना मोठा राजकीय धक्का; मुलाला नाकारली उमेदवारी

Dec 30, 2025 | 07:59 PM
Parbhani : भाजप आणि शिवसेनेच्या युती संदर्भात संभ्रमच Shivsena BJP Allaince

Parbhani : भाजप आणि शिवसेनेच्या युती संदर्भात संभ्रमच Shivsena BJP Allaince

Dec 30, 2025 | 07:27 PM
Sangli Mahapalika – अर्ज भरण्यासाठी गर्दी,मूलभूत सुविधांसह शिक्षणावर भर देण्याची उमेदवारांची ग्वाही

Sangli Mahapalika – अर्ज भरण्यासाठी गर्दी,मूलभूत सुविधांसह शिक्षणावर भर देण्याची उमेदवारांची ग्वाही

Dec 30, 2025 | 07:12 PM
Sambhajinagar : “भाजपने महानगरपालिका निवडणुकीत दगा दिला”; RPI गटाच्या पदाधिकाऱ्यांचा आरोप

Sambhajinagar : “भाजपने महानगरपालिका निवडणुकीत दगा दिला”; RPI गटाच्या पदाधिकाऱ्यांचा आरोप

Dec 30, 2025 | 07:00 PM
Virar : भाजपचे नाराज कार्यकर्ते प्रचारात दिसतील – खा. हेमंत सावरा

Virar : भाजपचे नाराज कार्यकर्ते प्रचारात दिसतील – खा. हेमंत सावरा

Dec 30, 2025 | 03:36 PM
THANE : मनसेकडून पवन पडवळ यांचा उमेदवारी अर्ज दाखल; शिवसेना भाजप युतीला आव्हान

THANE : मनसेकडून पवन पडवळ यांचा उमेदवारी अर्ज दाखल; शिवसेना भाजप युतीला आव्हान

Dec 30, 2025 | 03:33 PM
Navi Mumbai : “कोपरखैरणे प्रभागातील पुढऱ्यांनी फक्त टेंडर काढायची कामं केली” – शिरीष पाटील

Navi Mumbai : “कोपरखैरणे प्रभागातील पुढऱ्यांनी फक्त टेंडर काढायची कामं केली” – शिरीष पाटील

Dec 29, 2025 | 07:30 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.