Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

राज्यात 1 लाख 88 हजार 750 कोटींची गुंतवणूक, 62 हजार 550 रोजगार निर्मिती होणार – फडणवीस

Devendra Fadnavis : जल विद्युत ऊर्जा निर्मितीसाठीच्या पंप स्टोरेज प्रकल्पांसाठी आज (ता.३) राज्य सरकारने सात कंपन्यांसोबत तब्बल सामंजस्य करार केले आहे. या करारांमुळे राज्यात एकूण 1 लाख 88 हजार 750 कोटी रुपयांची गुंतवणूक तर 62 हजार 550 एवढी रोजगार निर्मिती होणार आहे. अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिली आहे.

  • By गोरक्षनाथ ठाकरे
Updated On: Sep 03, 2024 | 10:41 PM
राज्यात 1 लाख 88 हजार 750 कोटींची गुंतवणूक, 62 हजार 550 रोजगार निर्मिती - फडणवीस

राज्यात 1 लाख 88 हजार 750 कोटींची गुंतवणूक, 62 हजार 550 रोजगार निर्मिती - फडणवीस

Follow Us
Close
Follow Us:

जल विद्युत ऊर्जा निर्मितीसाठीच्या पंप स्टोरेज प्रकल्पासाठी आज सह्याद्री अतिथीगृह येथे महाराष्ट्र सरकार आणि एन टी पी सी, वेलस्पन न्यू एनर्जी, एन एच पी सी, रीन्यू हायड्रो पावर, टी एच डी सी इंडिया, टोरंट पॉवर, अदानी ग्रीन एनर्जी यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला. एकूण 35 हजार 240 मे.वॉ.चे वीजनिर्मिती करार करण्यात आले. या करारामुळे राज्यात एकूण 1 लाख 88 हजार 750 कोटी रुपयांची गुंतवणूक तर 62 हजार 550 एवढी रोजगार निर्मिती होणार आहे. अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिली आहे.

राज्याची एकूण उर्जा स्थापित क्षमता 46 हजार मेगावॉट त्यातून, 40 हजार 870 मेगावॅटचे पंप स्टोरेज क्षेत्रात वीजनिर्मिती करार झाल्याने ग्रीन एनर्जी क्षेत्रात हे राज्याचे मोठे पाऊल आहे. यापूर्वीही राज्यात सौर ऊर्जा निर्मितीत लक्षणीय पुढाकार घेण्यात आला आहे. २०३० पर्यंत राज्यातील ५० टक्के वीजनिर्मिती ही नैसर्गिक साधनांतून होणार आहे. नैसर्गिक संसाधनांचा वापर करून ऊर्जा शाश्वत पद्धतीने निर्माण करू शकतो. असेही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी म्हटले आहे.
(फोटो सौजन्य – सोशल मीडीया)

राज्यात पश्चिम घाटात विशेष जैवविविधता आहे. त्या ठिकाणी अनेक ठिकाणी शीतगृहांसाठी ऊर्जेचा वापर होणार आहे. शासकीय आणि खाजगी क्षेत्राने उत्सुकतेने हे करार पूर्णत्वास नेण्यास सहकार्य केले आहे. यामुळे राज्यासाठी शाश्वत वीजनिर्मिती आणि अर्थव्यवस्था वाढीस सहकार्य लाभणार आहे. असेही फडणवीस यावेळी म्हणाले आहे.

हे देखील वाचा – IPO साठी अर्ज करणारे 70 टक्के गुंतवणूकदार असतात ‘या’ चार राज्यांतील, वाचा… महाराष्ट्राचा क्रमांक!

दरम्यान, राज्य सरकारचे अपर मुख्य सचिव दीपक कपूर यांनी या करारांबाबत माहिती दिली आहे की, नॅशनल थर्मल पॉवर कंपनीअंतर्गत ९ हजार ७८ कोटी इतकी गुंतवणूक होणार आहे. त्या माध्यमातून ही कंपनी १ हजार ४०० रोजगार निर्मिती, १ हजार ८०० मेगावॅट वीज निर्मिती करणार आहे. वेल्सपन न्यु एनर्जी कंपनी अंतर्गत ५ हजार कोटी गुंतवणूक तर १ हजार ५०० रोजगार निर्मिती आणि १ हजार २०० मेगावॅट वीज निर्मिती होणार आहे.

एनएचपीसी लिमिटेड अंतर्गत ४४ हजार १०० कोटी इतकी गुंतवणूक, तर ७ हजार ३५० रोजगार निर्मिती आणि ७ हजार ३५० मेगा वॅट वीज निर्मिती होणार आहे. रिन्यु हायड्रो पावर लिमिटेड अंतर्गत १३ हजार १०० कोटी गुंतवणूक, तर ५ हजार रोजगार निर्मिती आणि २ हजार ६०० मेगावॅट वीज निर्मिती होणार आहे.

टेहेरी हायड्रो डेव्हलपमेंट कार्पोरेशन इंडिया लिमिटेड अंतर्गत ३३ हजार ६२२ कोटी गुंतवणूक, तर ६ हजार ३०० रोजगार निर्मिती आणि ६ हजार ७९० मेगावॅट वीज निर्मिती होणार आहे. टोरन्ट पावर लिमिटेड अंतर्गत २८ हजार कोटी गुंतवणूक, तर १३ हजार ५०० रोजगार निर्मिती आणि ५ हजार ६०० मेगावॅट वीज निर्मिती होणार आहे. अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेड अंतर्गत ५४ हजार ४५० कोटी इतकी गुंतवणूक, तर ३० हजार रोजगार आणि ९ हजार ९०० मेगावॅट इतकी वीज निर्मिती केली जाणार आहे.

या करारावेळी गृह विभागाचे अपर मुख्य सचिव इकबाल सिंह चहल, जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूर, जलसंपदा विभागाचे सचिव डॉ. संजय बेलसरे, उपमुख्यमंत्री यांचे सचिव श्रीकर परदेशी यांच्यासह अधिकारी आणि खाजगी कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

Web Title: 1 lakh 88 thousand 750 crore investment in the state 62 thousand 550 employment creation devendra fadnavis

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 03, 2024 | 08:46 PM

Topics:  

  • devendra fadnavis

संबंधित बातम्या

Maharashtra Police Bharati: तरूणांनो लागा तयारीला! ‘इतक्या’ जागांसाठी पोलिस भरती होणार, शासन निर्णय जारी
1

Maharashtra Police Bharati: तरूणांनो लागा तयारीला! ‘इतक्या’ जागांसाठी पोलिस भरती होणार, शासन निर्णय जारी

Devendra Fadnavis: “… हे नवीन पिढीपर्यंत पोहोचेल”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे प्रतिपादन
2

Devendra Fadnavis: “… हे नवीन पिढीपर्यंत पोहोचेल”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे प्रतिपादन

CM Devendra Fadnavis : मुख्यमंत्र्यांचे 10 मोठे करार! महाराष्ट्रात 42,892 कोटींची गुंतवणूक, 25 हजार 892 रोजगाराची निर्मिती
3

CM Devendra Fadnavis : मुख्यमंत्र्यांचे 10 मोठे करार! महाराष्ट्रात 42,892 कोटींची गुंतवणूक, 25 हजार 892 रोजगाराची निर्मिती

Sanjay Raut News: मुंबई कुणी लुटली हे सगळ्यांना माहिती…; फडणवीसांच्या ‘त्या’ टिकेला राऊतांचा पलटवार
4

Sanjay Raut News: मुंबई कुणी लुटली हे सगळ्यांना माहिती…; फडणवीसांच्या ‘त्या’ टिकेला राऊतांचा पलटवार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.