Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 18 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Rohit Pawar : ‘अजितदादांचा पक्ष सक्षम नाही, अर्थखातं फडणवीसांनी चोरलं,’ रोहित पवारांच्या विधानाने खळबळ

Rohit Pawar : पुणे पदवीधर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदार रोहित पवार यांनी अजित पवारांच्या पक्षाची ताकद कमी केल्याचा आरोप केला. अर्थखात्यावरून देवेंद्र फडणवीसांना लक्ष्य करत त्यांनी शक्तिपीठ महामार्गातील खर्च, शेतकरी मदत आणि बारामतीतील परिस्थितीवरही प्रश्न उपस्थित केले.

  • By विवेक
Updated On: Oct 18, 2026 | 07:13 PM
Rohit Pawar

Rohit Pawar

Follow Us
Follow Us:
  • ‘पुणे पदवीधरची जागा अजितदादांच्या पक्षाला मिळायला हवी होती’ – रोहित पवार
  • शक्तिपीठ महामार्गातील 40 हजार कोटींच्या खर्चावरून सवाल
  • बारामतीतील गुंडगिरी आणि तलाठ्यांच्या कारभारावर रोहित पवारांची टीका
 

पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी राज्यातील राजकीय घडामोडींवर भाष्य करत सत्ताधाऱ्यांना लक्ष्य केलं. अजित पवार यांच्या पक्षाची ताकद कमी करण्यात आल्याचा आरोप करत त्यांनी पुणे पदवीधरची जागा अजितदादांच्या पक्षाला मिळायला हवी होती, असं मत व्यक्त केलं. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही टीका केली.

रोहित पवार म्हणाले की, अजित पवार यांच्या पक्षाची ताकद कुठेतरी कमी करण्यात आली आहे. अर्थखातं देवेंद्र फडणवीस यांनी घेतल्याची टीका करताना, आता ते खातं परत मागण्याची धमक अजितदादांच्या पक्षाकडे नसल्याचंही ते म्हणाले.

पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निमित्ताने रोहित पवार यांनी मतदारांशी संवाद साधला. त्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी राज्यातील राजकीय परिस्थितीवर आपली भूमिका मांडली.

Eknath Shinde : ‘मी धाडस केलं नसतं तर…’ शिवसेना बंडखोरीची आठवण काढत एकनाथ शिंदेंचा महाविकास आघाडीला टोला

शक्तिपीठ महामार्गावरून सरकारला सवाल

शक्तिपीठ महामार्गाच्या खर्चावरूनही रोहित पवार यांनी सरकारला धारेवर धरलं. या प्रकल्पात 40 हजार कोटी रुपयांच्या खर्चाचा मुद्दा उपस्थित करत त्यांनी हा खर्च थांबवण्याची मागणी केली. शेतकऱ्यांना केवळ पाच हजार रुपयांची मदत देण्यावरूनही त्यांनी सरकारला सवाल केला.

पेट्रोल-डिझेलचे दर आणि खतांच्या किमती वाढल्याने सामान्य नागरिकांवर आर्थिक भार पडत असल्याचं रोहित पवार म्हणाले. शेतकऱ्यांना मदत मिळावी, यासाठी आपला संघर्ष सुरू असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. महाकुंभातील कथित भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून त्यांनी मंत्री गिरीश महाजन यांच्यावरही टीका केली.

बारामतीतील परिस्थितीवरूनही निशाणा

बारामतीत गुंडगिरी वाढल्याचा आरोप करत रोहित पवार यांनी तलाठी कार्यालयांतील कथित गैरव्यवहाराबाबतही भाष्य केलं. मोठ्या प्रमाणात पैसे घेऊन कामं केली जात असल्याचं नागरिक सांगत असल्याचा दावा त्यांनी केला.

2029 च्या निवडणुकीसाठी महाराष्ट्रभर सक्रिय होणार

रोहित पवार यांनी आगामी राजकीय वाटचालीबाबतही संकेत दिले. 2029 च्या निवडणुकीत जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणण्यासाठी आपण संपूर्ण महाराष्ट्रात सक्रिय होणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

दरम्यान, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांनी उपस्थित केलेल्या शेतकऱ्यांच्या प्रश्नालाही रोहित पवार यांनी पाठिंबा दर्शवला. पाणीटंचाईमुळे ऊस जळण्याची भीती असल्याचं सांगत त्यांनी शेतकऱ्यांच्या अडचणींकडे लक्ष वेधलं. अजित पवार आज असते, तर एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना आंदोलन करण्याची वेळ आली नसती, असंही ते म्हणाले.

Sanjay Raut : सहा महिन्यांत मोदी सरकार कोसळणार? संजय राऊतांचा मोठा दावा; मोदींच्या जागी कोण येणार, राऊतांनी दिले संकेत

Web Title: Rohit pawar ajit pawar devendra fadnavis pune graduate election vg

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 18, 2026 | 07:13 PM

Topics:  

  • Ajit Pawar NCP
  • devendra fadnavis
  • NCP Sharad Pawar
  • rohit pawar
  • Sunetra Pawar

संबंधित बातम्या

कोण होणार ‘सोमेश्वर’चा चेअरमन? ‘ही’ नावे चर्चेत; सुनेत्रा पवार यांच्या निर्णयाकडे लक्ष
1

कोण होणार ‘सोमेश्वर’चा चेअरमन? ‘ही’ नावे चर्चेत; सुनेत्रा पवार यांच्या निर्णयाकडे लक्ष

Beed News : बीडमध्ये दुष्काळाचे संकट गडद; २२५ टँकर्स सुरू, सुनेत्रा पवारांनी दिले महत्त्वाचे निर्देश
2

Beed News : बीडमध्ये दुष्काळाचे संकट गडद; २२५ टँकर्स सुरू, सुनेत्रा पवारांनी दिले महत्त्वाचे निर्देश

Rohit Pawar : ‘सुनेत्रा पवारांना अर्थमंत्रिपद मिळणार नाही’, रोहित पवारांच्या विधानाने राजकारणात खळबळ
3

Rohit Pawar : ‘सुनेत्रा पवारांना अर्थमंत्रिपद मिळणार नाही’, रोहित पवारांच्या विधानाने राजकारणात खळबळ

महायुतीत बिघाडीची चिन्हे? फडणवीस म्हणाले एक अन् शिंदेंनी केले भलतेच! पुणे शिक्षक मतदारसंघात अपक्ष उमेदवाराला पाठिंबा
4

महायुतीत बिघाडीची चिन्हे? फडणवीस म्हणाले एक अन् शिंदेंनी केले भलतेच! पुणे शिक्षक मतदारसंघात अपक्ष उमेदवाराला पाठिंबा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.