Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 4 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

1 शेअर 10 शेअर्समध्ये विभागला जाणार, ही असेल रेकॉर्ड तारीख, शेअर्सला अप्पर सर्किट!

स्टॉक स्प्लिट म्हणजे शेअर्सचे विभाजन. स्टॉक स्प्लिट अंतर्गत कंपनी आपले शेअर्स विभाजित करते. सहसा, जेव्हा एखाद्या कंपनीचे शेअर्स खूप महाग होतात तेव्हा लहान गुंतवणूकदार त्या शेअर्समध्ये गुंतवणूक करू शकत नाहीत.

  • By गोरक्षनाथ ठाकरे
Updated On: Nov 09, 2024 | 07:50 AM
महाराष्ट्र सरकारकडून 754 कोटींच्या कामाची ऑर्डर, 'या' शेअर्सद्वारे वर्षभरात 400 टक्क्यांचा परतावा!

महाराष्ट्र सरकारकडून 754 कोटींच्या कामाची ऑर्डर, 'या' शेअर्सद्वारे वर्षभरात 400 टक्क्यांचा परतावा!

Follow Us
Follow Us:

मल्टीबॅगर परतावा देणाऱ्या शेअर्समध्ये सुदर्शन फार्मा इंडस्ट्रीजचा समावेश आहे. कंपनीच्या शेअर्समध्ये शुक्रवारी (ता.८) माेठी खरेदी झाल्याने तेजी दिसून आली. सुदर्शन फार्मा इंडस्ट्रीजच्या शेअर्सला पुन्हा अप्पर सर्किट लागले आहे. शेअर्सला अप्पर सर्किट लागण्याचे कारण म्हणजे कंपनीने केलेली एक घाेषणा आहे. सुदर्शन फार्मा इंडस्ट्रीजने स्टॉक स्प्लिटसाठी रेकॉर्ड तारखेची घोषणा केली आहे.

काय आहे रेकॉर्ड तारीख

सुदर्शन फार्मा इंडस्ट्रीजने शेअर बाजाराला दिलेल्या माहितीत म्हटले की 10 रुपये दर्शनी मूल्य असलेला एक शेअर 10 शेअर्समध्ये विभागला जाईल. या स्टॉक स्प्लिटनंतर कंपनीच्या शेअर्सचे दर्शनी मूल्य प्रति शेअर 1 रुपये कमी होईल. सुदर्शन फार्मा इंडस्ट्रीजने सोमवार, 18 नोव्हेंबर ही स्टॉक स्प्लिटची रेकॉर्ड तारीख म्हणून घोषित केली आहे. कंपनीचे शेअर्स रेकॉर्ड तारखेच्या दिवशी विभागले जातील. अशा परिस्थितीत, तुम्हाला या स्टॉक स्प्लिटचा फायदा घ्यायचा असेल, तर रेकॉर्ड तारखेच्या एक दिवस आधी शेअर्स खरेदी करावे लागतील.

90 दिवसांत पैसे दुप्पट

सुदर्शन फार्मा इंडस्ट्रीजच्या शेअर्समध्ये किंमतीत 90 दिवसांत 131 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट झाले आहेत. त्याचबरोबर कंपनीच्या शेअर्सची किंमत 6 महिन्यांत 482.52 टक्क्यांनी वाढली आहे. बीएसईवर शेअर्सची 52 आठवड्यांची उच्च पातळी 452.70 रुपये आहे आणि 52 आठवड्यांची नीचांकी पातळी 58.20 रुपये आहे. या कंपनीचे मार्केट कॅप 981.89 कोटी रुपये आहे.

हे देखील वाचा – गारमेंट कंपनीचा आयपीओ आजपासून खुला; केवळ 20-24 रुपयांमध्ये लावता येईल बोली!

स्टॉक स्प्लिट का होतो?

स्टॉक स्प्लिट म्हणजे शेअर्सचे विभाजन. स्टॉक स्प्लिट अंतर्गत कंपनी आपले शेअर्स विभाजित करते. सहसा, जेव्हा एखाद्या कंपनीचे शेअर्स खूप महाग होतात तेव्हा लहान गुंतवणूकदार त्या शेअर्समध्ये गुंतवणूक करू शकत नाहीत. अशा परिस्थितीत, कंपनी लहान गुंतवणूकदारांना आपल्या शेअर्सकडे आकर्षित करण्यासाठी आणि बाजारात मागणी वाढवण्यासाठी स्टॉक स्प्लिटचा अवलंब करते.

शेअरहोल्डरला फायदा काय?

जेव्हा एखादी कंपनी आपले शेअर्स दोन भागांमध्ये विभाजित करते, तेव्हा शेअर्सधारकाला त्याच्याकडे असलेल्या प्रत्येक शेअर्ससाठी अतिरिक्त शेअर्स दिला जातो. याचा गुंतवणुकीच्या मूल्यावर कोणताही परिणाम होत नाही. कारण प्रत्येक शेअरचे दोन शेअर्समध्ये विभाजन केल्याने प्रत्येक शेअरचे मूल्य निम्मे होते.

कंपनीवर काय परिणाम होतो

शेअर विभाजनामुळे कंपनीच्या शेअर्सची संख्या वाढते. परंतु याचा कंपनीच्या बाजार भांडवलावर परिणाम होत नाही. त्याच वेळी, स्टॉक स्प्लिटमुळे कंपनीचे शेअर्स अधिक लिक्विडेटेड होतात. बऱ्याच वेळा लोक स्टॉक स्प्लिटला बोनस शेअर्स प्रमाणेच समजतात. मात्र, या दोन भिन्न गोष्टी आहेत.

लहान गुंतवणूकदारांना गुंतवणुकीचे फायदे

स्टॉक स्प्लिटमुळे शेअर्सची किंमत कमी होते. त्यामुळे छोट्या गुंतवणूकदारांना त्या कंपनीच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करणे सोपे जाते. कमी किंमतीमुळे त्या शेअर्सची मागणी अचानक वाढते. त्यामुळे विभाजनानंतर काही काळ त्या शेअर्समध्ये वाढ दिसून येते.

(टीप : शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. वरती दिलेली माहिती माहितीस्तव देण्यात आली आहे. गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा यामागील उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)

Web Title: 1 share will be divided into 10 shares this will be the record date upper circuit to the shares

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 09, 2024 | 07:50 AM

Topics:  

  • share market
  • Share Market Today

संबंधित बातम्या

Share Market Today: घसरणीला लागला ब्रेक, शेअर बाजारात तेजी; ४०० अंकांनी बँक निफ्टी उसळले
1

Share Market Today: घसरणीला लागला ब्रेक, शेअर बाजारात तेजी; ४०० अंकांनी बँक निफ्टी उसळले

Share Market Today: गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! या शेअर्समध्ये होऊ शकते मोठी हालचाल, तज्ज्ञांनी दिले महत्त्वाचे संकेत
2

Share Market Today: गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! या शेअर्समध्ये होऊ शकते मोठी हालचाल, तज्ज्ञांनी दिले महत्त्वाचे संकेत

Share Market Today: गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! बाजारात आजही घसरणीचे संकेत; तज्ज्ञांच्या रडारवर ‘हे’ 8 शेअर्स
3

Share Market Today: गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! बाजारात आजही घसरणीचे संकेत; तज्ज्ञांच्या रडारवर ‘हे’ 8 शेअर्स

Share Market Today: आठवड्याच्या सुरुवातीलाच शेअर बाजाराला धक्का? सेन्सेक्स-निफ्टीची घसरणीने सुरुवात होण्याची शक्यता
4

Share Market Today: आठवड्याच्या सुरुवातीलाच शेअर बाजाराला धक्का? सेन्सेक्स-निफ्टीची घसरणीने सुरुवात होण्याची शक्यता

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.