10 हजारांचे झाले तब्बल 53 लाख रुपये; 'या' शेअरने वर्षभरात गुंतवणूकदारांना केले मालमाल!
मागील संपुर्ण आठवडा शेअर बाजारात मोठी घसरण पाहायला मिळाली आहे. अशातच गुंतवणूकदारांमध्ये काहीसे चिंतेचे वातावरण पाहायला मिळत आहे. असे असले तरी एका शेअरने मागील काही दिवसांत शेअर बाजारातील गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. श्री अधिकारी ब्रदर्स ही कंपनी असे या कंपनीचे नाव असून, या कंपनीने गेल्या काही महिन्यांत आपल्या गुंतवणूकदारांना चांगला परतावा मिळवून दिला आहे. या कंपनीचा शेअर एका महिन्यात तब्बल 53000 टक्क्यांनी वाढला आहे. याच कारणामुळे या शेअरने बाजारातील सर्वच गुंतवणूकदारांचे लक्ष वेधून घेतले आहे.
922.25 रुपयांपर्यंत पोहोचले शेअरचे मूल्य
सध्याच्या घडीला या कंपनीच्या शेअरचे मूल्य 1000 रुपयांपेक्षा कमी आहे. श्री अधिकारी ब्रदर्स टेलिव्हिजन नेटवर्क या शेअरचे मूल्य 5 ऑक्टोबर 2023 रोजी 1.73 रुपये इतके होते. तर शुक्रवारी म्हणजेच 4 ऑक्टोबर 2024 रोजी या शेअरला थेट अपर सर्किट लागले आहे. शुक्रवारी या शेअरचे मूल्य 922.25 रुपयांपर्यंत पोहोचले होते. या शेअरमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना अवघ्या एका वर्षात 53000 टक्के परतावा मिळवून दिला आहे.
(फोटो सौजन्य – istock)
10000 रुपयांचे झाले 53 लाख रुपये
श्री अधिकारी ब्रदर्स या कंपनीच्या शेअरने अवघ्या एका वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना मोठा परतावा मिळवून दिला आहे. एखाद्या गुंतवणूकदाराने 5 ऑक्टोबर 2023 रोजी या कंपनीच्या शेअरचे 10 हजार रुपयांचे शेअर्स घेतले असतील तर तेव्हा त्या व्यक्तीला एकूण 5780 शेअर्स मिळाले असते. आज श्री अधिकारी ब्रदर्स या शेअरचे मूल्य 922.25 रुपये आहे. म्हणजेच आजच्या हिशोबाने 5780 शेअर्सचे मूल्य आज 53 लाख 30 हजार 605 रुपये झाले असते. म्हणजेच अवघ्या 10 हजाराचे आज थेट 53 लाख रुपये झाले असते.
स्ती, दबंग, धमाल गुजरात चॅनेल्सची मालकी
श्री अधिकारी ब्रदर्स या कंपनीची सब टीव्हीमध्ये हिस्सेदारी आहे. मस्ती, दबंग, धमाल गुजरात अशा चॅनल्सची मालकी श्री अधिकारी ब्रदर्स या कंपनीकडे आहे. Trendlyne या शेअर बाजारविषयक संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या माहितीनुसार या कंपनीत प्रमोटर्सची हिस्सेदारी 59.10 टक्के आहे. तर सार्वजनिक गुंतवणूकदारांची हिस्सेदारी 40.25 टक्के आहे.
(टीप : शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. वरती दिलेली माहिती माहितीस्तव देण्यात आली आहे. गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा यामागील उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)