
PM Kisan Yojana: २०२६ च्या अर्थसंकल्पापूर्वी पीएम किसान योजनेचा हप्ता येईल का? जाणून घ्या एका क्लिकवर
PM Kisan Yojana: केंद्र सरकारने शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी विशेष प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना (PM Kisan Scheme) सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत आतापर्यंत २१ हप्ते जारी करण्यात आले. आता मात्र, शेतकरी २२ व्या हप्त्याची वाट पाहत आहेत. पंतप्रधान किसान योजनेचा २२ वा हप्ता २०२६ च्या अर्थसंकल्पापूर्वी जारी होईल का असा प्रश्न समस्त शेतकरी वर्गाला पडला आहे. या योजनेच्या २२ वा हप्ताची तारीख अजूनही अस्पष्ट असून यासंबधित सरकारने कोणतीही अधिसूचना जारी केलेली नाही. पंतप्रधान किसान योजनेत शेतकऱ्यांना दरवर्षी ६,००० रुपयांचा लाभ मिळतो, जो प्रत्येकी २००० रुपयांच्या तीन समान हप्त्यांमध्ये वितरित केला जातो.
भारतातील शेतकरी पंतप्रधान किसान योजनेच्या २२ व्या हप्त्याची वाट पाहत आहेत. अर्थमंत्री दरवर्षी १ फेब्रुवारी रोजी अर्थसंकल्प सादर करतात. या योजनेअंतर्गत हप्ते दर चार महिन्यांनी दिले जातात, परंतु गेल्या वर्षी नोव्हेंबर २०२५ मध्ये २१ वा हप्ता जारी करण्यात आला होता, जो फेब्रुवारी २०२६ मध्ये चार महिने पूर्ण होईल. त्यानुसार, २२ वा हप्ता फेब्रुवारीमध्ये जारी केला जाऊ शकतो, परंतु तो बजेटनंतर जारी होण्याची शक्यता आहे. तथापि, सरकारने अद्याप योजनेअंतर्गत हप्ते जारी करण्याची अधिकृत घोषणा केलेली नाही. तसेच अधिकृत पीएम किसान योजना (PM Kisan Yojana) पोर्टलवर कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.
जर तुम्ही पीएम किसान योजनेअंतर्गत लाभार्थी असाल, तर पुढील हप्त्याची अधिकृत घोषणा होण्यापूर्वी काही महत्त्वाची कामे पूर्ण करा जेणेकरून २२ वा हप्ता अडकू नये. शेतकऱ्यांना जमीन पडताळणी आणि ई-केवायसी सारखी कामे पूर्ण करणे आवश्यक आहे. ही कामे पूर्ण करण्यात अयशस्वी झालेले शेतकरी योजनेसाठी पात्र राहणार नाहीत. जर तुम्ही ही कामे पूर्ण केली नसतील तर ती आधी पूर्ण करा. तुम्ही लाभार्थ्यांच्या यादीत तुमचे नाव देखील तपासू शकता. जर तुमचे नाव लाभार्थी यादीत आढळले नाही तर तुम्हाला योजनेची लाभ रक्कम मिळणार नाही. त्यामुळे लवकरात लवकर नोंदणीची प्रकिया पूर्ण करा.