India Logistics Sector: भारताची लॉजिस्टिक्समध्ये मोठी झेप! लॉजिस्टिक्स सुधारणा कशा बदलत आहेत भारताची जागतिक व्यापारातील भूमिका? (फोटो-सोशल मीडिया)
लॉजिस्टिक्स क्षेत्रात गती शक्ती
रेल्वे कार्गो टर्मिनल्समुळे कार्यक्षमता सुधारली
India Logistics Sector: अलिकडच्या वर्षांत भारताच्या लॉजिस्टिक्स क्षेत्राने उल्लेखनीय प्रगती केली असून, देशाचा लॉजिस्टिक्स खर्च जीडीपीच्या ७.९७% पर्यंत कमी झाला आहे. ही कामगिरी पायाभूत सुविधा विकास, डिजिटल एकात्मता आणि एकात्मिक नियोजनामुळे शक्य झाली आहे. या सुधारणा व्यवसायासाठी सुलभता वाढवतात आणि भारताच्या जागतिक व्यापारात स्थान मजबूत करतात. या परिवर्तनाच्या केंद्रस्थानी पंतप्रधान गती शक्ती राष्ट्रीय मास्टर प्लॅन आहे. जो रेल्वे, महामार्ग, बंदरे आणि विमानतळांना एका एकसंध चौकटीत एकत्र करतो. या योजनेचे उद्दिष्ट बहु-मॉडल कनेक्टिव्हिटी वाढवणे, व्यवसाय सुलभता सुधारणा, मेक इन इंडिया (Make in India) सारख्या उपक्रमांना समर्थन देणे आणि संतुलित प्रादेशिक विकास सुनिश्चित करणे आहे.
गती शक्ती कार्गो टर्मिनल्स या दृष्टिकोनाचे मुख्य आधारस्तंभ आहेत. हे आधुनिक रेल्वे कार्गो टर्मिनल्स माल वाहतुकीसाठी रस्ते, बंदरे आणि इतर वाहतुकीच्या साधनांशी थेट जोडतात. पूर्वी भारतात मल्टी-मॉडल हब नसल्यामुळे समन्वयाचा अभाव होता, ज्यामुळे विलंब, जास्त खर्च आणि गर्दी निर्माण होत होती. रेल्वे मंत्रालयाच्या जीसीटी धोरण, २०२१ अंतर्गत विकसित केलेल्या टर्मिनल्समुळे हे अडथळे दूर होत आहेत. या टर्मिनल्समध्ये इंजिन ऑन-लोड सिस्टम, आधुनिक यंत्रसामग्री, यांत्रिक लोडिंग सिस्टम आणि सायलो आहेत, ज्यामुळे माल हाताळणीचा वेळ लक्षणीयरीत्या कमी होतो. रेल्वे वाहतूक अधिक ऊर्जा कार्यक्षम, कमी खर्चिक आणि पर्यावरणपूरक असल्यामुळे कार्बन उत्सर्जन अंदाजे ९०% कमी होते.
प्रमुख तरतुदीत समाविष्ट केलेल मुद्दे खालीलप्रमाणे:






