Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Top Marathi News today Live : DCM एकनाथ शिंदे यापुढे VSR कंपनीचा विमानप्रवास करणार नाहीत

Marathi breaking live marathi headlines update 26 February : महाराष्ट्रासह देशभरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी वाचत रहा. राजकारण, मनोरंजन, स्पोर्ट्स अशा सर्वच क्षेत्रातील लाईव्ह अपडेट जाणून घ्या.

  • By प्रीति माने
Updated On: Feb 26, 2026 | 06:46 PM
Top Marathi News Today Live : दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे विलीनीकरणावर रोहित पवार आज बोलणार

Top Marathi News Today Live : दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे विलीनीकरणावर रोहित पवार आज बोलणार

Follow Us
Close
Follow Us:

Marathi Breaking news live updates : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे 28 फेब्रुवारी रोजी अपघाती निधन झाले. VSR कंपनीच्या विमानाचा भीषण अपघात झाल्यामुळे विमानातील पाच जणांचा मृत्यू झाला. यानंतर नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) अत्यंत कठोर पाऊल उचलले आहे. DGCA ने ‘VSR वेंचर्स’च्या चार विमानांच्या उड्डाणावर तात्काळ बंदी घालत त्यांना ‘ग्राऊंड’ करण्याचे आदेश दिले आहेत. विशेष सुरक्षा ऑडिटमध्ये गंभीर त्रुटी आढळल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील मोठा निर्णय घेतला आहे.  एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने यापुढे VSR कंपनीचं विमान न वापरण्याचं ठरवलं आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार, नेते, मंत्री आणि स्वत: एकनाथ शिंदे यापुढे VSR कंपनीच्या विमानातून प्रवास करणार नाहीत.

The liveblog has ended.
  • 26 Feb 2026 06:42 PM (IST)

    26 Feb 2026 06:42 PM (IST)

    IND vs ZIM Live: आज नाही तर कधीच नाही! ‘सूर्या’ला तळपावेच लागणार; ‘या’ टीमचा बॉलिंगचा निर्णय

    चेन्नई/Team India: आज चेन्नईमध्ये भारत विरुद्ध झिम्बाब्वे यांच्यात सुपर 8 चा सामना रंगणार आहे. आजच्या सामन्यात दोन्ही संघासाठी करो या मरो ची स्थिती असणार आहे. दोन्ही संघ चेन्नईतील चेपॉक स्टेडियमवर आमनेसामने येणार आहेत. भारत आणि झिम्बाब्वे उपांत्य फेरीत आपले स्थान निश्चित करण्यासाठी प्रयत्नशील  असणार आहेत. दरम्यान टॉस झिम्बाब्वे संघाने जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

     

  • 26 Feb 2026 06:35 PM (IST)

    26 Feb 2026 06:35 PM (IST)

    PM Narendra Modi : भारत आणि इस्रायलमध्ये होणार मोठा करार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची परदेशातून मोठी घोषणा

    पंतप्रधान नरेंद्र मोदी इस्रायलच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी मोदी यांनी दोन्ही देशांमधील संबंध आणखी मजबूत करण्यासाठी एक मोठी घोषणा केली. इस्रायलला संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, इस्रायल आणि भारत यांच्यातील मुक्त व्यापार करार (FTA) वरील वाटाघाटी सुरू झाल्या आहेत. तसेच दोन्ही देश लवकरच तो अंतिम करू शकतात.

  • 26 Feb 2026 06:19 PM (IST)

    26 Feb 2026 06:19 PM (IST)

    Eknath Shinde : “आता नवी औद्योगिक क्रांती, महाराष्ट्राची विकास यात्रा थांबणार नाही…”, उपमुख्यमंत्र्यांची ग्वाही

    मुंबई : राज्यात गेल्या सुमारे चार वर्षांपासून स्थगितीचे राजकारण संपून प्रगतीची घौडदौड सुरू झाली आहे. महाराष्ट्रात एक नवी औद्योगिक क्रांती होत असून महाराष्ट्राच्या विकासाची गती आता कुणीही थांबवू शकणार नाही. औद्योगिक गुंतवणुकीत महाराष्ट्र आजही देशात क्रमांक एकचे राज्य आहे. राज्यात सुरू असलेल्या विकासयात्रेचे प्रतिबिंब राज्यपालांच्या अभिभाषणात उमटले असून प्रगत, समृद्ध आणि सुरक्षित महाराष्ट्र घडवणे हेच राज्य शासनाचे प्रमुख ध्येय आहे. विकास आणि लोककल्याणाची महाराष्ट्राची ही विकासयात्रा कधीही थांबणार नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानपरिषदेत दिली.

  • 26 Feb 2026 06:09 PM (IST)

    26 Feb 2026 06:09 PM (IST)

    Maharashtra Politics: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आता 'सुनेत्रापर्व'; NCP च्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड

    Ncp Party: आज राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाची (NCP) राष्ट्रीय कार्यकरणीची बैठक पार पडली. यामध्ये अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाची कमान आता पूर्णपणे सुनेत्रा पवार यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. सुनेत्रा पवार यांची पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. प्रफुल्ल पटेल यांनी ही घोषणा केली आहे.

    राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 'राष्ट्रीय अधिवेशन २०२६' चे थेट प्रक्षेपण.

    📍वरळी, मुंबई https://t.co/12ikRmcVmM

    — MahaNCPspeaks (@mahancpspeaks) February 26, 2026

  • 26 Feb 2026 05:55 PM (IST)

    26 Feb 2026 05:55 PM (IST)

    Samsung Galaxy S26 सिरीज लाँच

    मुंबई : सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्सने आज (26 फेब्रुवारी) गॅलेक्‍सी एस २६ सिरीज सादर केली. या सिरीजमध्ये उत्कृष्ट कार्यक्षमता, उद्योगातील आघाडीची कॅमेरा प्रणाली आणि दैनंदिन कामे अधिक सुलभ करणारे गॅलेक्‍सी एआय अनुभव दिले आहेत. सॅमसंगच्या तिसऱ्या पिढीतील एआय स्मार्टफोन म्हणून गॅलेक्‍सी एस२६, एस२६+ आणि एस२६ अल्ट्रा पार्श्वभूमीत जटिल कामे हाताळतात, ज्यामुळे वापरकर्ते केवळ परिणामांवर लक्ष केंद्रित करू शकतात.

     

  • 26 Feb 2026 05:26 PM (IST)

    26 Feb 2026 05:26 PM (IST)

    ‘भूत बंगला’च्या पहिल्या गाण्याने पेटवली कॉमेडीची आग

    अभिनेता अक्षय कुमार आणि दिग्दर्शक प्रियदर्शन यांची सुपरहिट जोडी तब्बल 14 वर्षांनंतर पुन्हा एकत्र येत असल्याने ‘भूत बंगला’ या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. कॉमेडी आणि एंटरटेनमेंटचा जबरदस्त मेळ घालणाऱ्या या जोडीने याआधी अनेक आयकॉनिक चित्रपट दिले असून, त्यामुळे या नव्या चित्रपटाकडूनही चाहत्यांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत.

     

  • 26 Feb 2026 05:11 PM (IST)

    26 Feb 2026 05:11 PM (IST)

    टिपू सुलतानवरून CM फडणवीस आक्रमक

    सध्या महाराष्ट्राचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात टिपू सुलतान वरून वाद सुरू आहे. कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी टिपू सुलतानची तुलना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी केली. त्यानंतर भाजपने आक्रमक पवित्रा घेतला. आज या सर्व विषयावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात प्रत्युत्तर दिले.

    सविस्तर माहितीसाठी येथे क्लिक करा

  • 26 Feb 2026 05:10 PM (IST)

    26 Feb 2026 05:10 PM (IST)

    डोंबिवलीत विद्यार्थिनीच्या खात्यात 2.60 कोटी रुपये

    डोंबिवलीतील एका विद्यार्थिनीच्या बँक खात्यात अचानक 2 कोटी 60 लाख रुपये जमा झाल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी तपासाची मागणी करत विद्यार्थिनीने पोलिस ठाण्यात धाव घेतली असून मनसेनेही या प्रकरणात उडी घेतली आहे.

  • 26 Feb 2026 05:06 PM (IST)

    26 Feb 2026 05:06 PM (IST)

    खोपोली नगरपरिषदेचा अर्थसंकल्प मंजूर, विकासकामे आणि योजनांसाठी प्रशासन सज्ज

    खोपोली नगरपरिषदेचा 237.50 कोटींचा अर्थासंकल्प मंजूर असून  अनेक विकास कामासाठी व योजनानसाठी प्रशासन सज्ज असून नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन नगराध्यक्ष कुलदीपक शेंडे व उपनगराध्यक्ष विक्रम साबळे यांनी केले आहे.

  • 26 Feb 2026 05:04 PM (IST)

    26 Feb 2026 05:04 PM (IST)

    स्कीमवर्कच्या नावाखाली कामगारांचे शोषण होत असल्याचा शासनावर गंभीरआरोप

    महागाई भत्ता नाही की कामगारांना पेन्शन नाही, कंत्राटी कर्मचाऱ्यांनी जगावं तरी कसं हा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे. 25 कंत्राटी आणि स्कीमवर्कच्या नावाखाली कामगारांचे शासन शोषण करत आहे. वाढत्या महागाई कामगारांना पेन्शन नाही कामगारांच्यासाठी कायदा करूनही कंत्राटी कामगार घरेलू बांधकाम कामगार यांचे शोषण होत आहे. याकडे केंद्र राज्य सरकार लक्षात येत नाही, यासाठी राज्यभर केंद्र आणि राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी भारतीय मजदूर संघ च्या वतीने कामगारांचा लक्षवेधी मोर्चा धरणे आंदोलन सिंधुदुर्ग नगरी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर छेडण्यात आले. कामगारांच्या हक्काचेपैसे योजना कागदावरच आहेत कामगार कायद्याची योग्य अंमलबजावणी होत नाही. शासनाने याबाबत लक्ष न दिल्यास देशभर राज्यभर तीव्र आंदोलने छेडले जाईल असा इशारा कामगार संघटनांच्या वतीने देण्यात आला आहे.

  • 26 Feb 2026 04:00 PM (IST)

    26 Feb 2026 04:00 PM (IST)

    बेंबळी जल जीवन मिशनमध्ये दोन कोटींचा अपहार?

    शीतलकुमार शिंदे, धाराशिव : केंद्र व राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी जल जीवन मिशन अंतर्गत राबविण्यात आलेल्या बेंबळी (ता. धाराशिव) येथील ग्रामीण पाणीपुरवठा योजनेत गंभीर अनियमितता झाल्याचा आरोप पुढे आला आहे. तब्बल १ कोटी ९३ लाख रुपयांचा निधी खर्च करूनही गावकऱ्यांना नियमित पाणीपुरवठा होत नसल्याने सुमारे २५ हजार लोकसंख्येचे बेंबळी गाव आजही पाण्यासाठी वणवण भटकत असल्याचे चित्र आहे. बेंबळी गावापासून सुमारे ९ ते १० किमी अंतरावर असलेल्या रुईभर मध्यम प्रकल्पातून या गावाला पाणीपुरवठा करण्यात येतो. पूर्वीची योजना दुरुस्त करून “हर घर जल” उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी जल जीवन मिशनअंतर्गत नव्याने कामे करण्यात आली. केंद्र व राज्य शासनाने प्रत्येकी ९६.५० लाख रुपये असा एकूण १.९३ कोटींचा निधी मंजूर करून खर्चही दर्शविण्यात आला. मात्र, प्रत्यक्षात जुन्याच पाईपलाईनला रंगरंगोटी करून नवीन पाईपलाईन टाकल्याचे कागदोपत्री दाखविण्यात आल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. परिणामी, वारंवार पाईपलाईन फुटणे, गळती होणे आणि दुरुस्ती करणे हे रोजचेच झाले असून नियमित व पुरेसा पाणीपुरवठा होत नाही.

    वाचा सविस्तर 

  • 26 Feb 2026 03:45 PM (IST)

    26 Feb 2026 03:45 PM (IST)

    पुण्यात खळबळ! दोन लाखांसाठी तरुणानेच रचला स्वतःच्या अपहरणाचा बनाव

    पुणे: आपण आता पर्यंत अनेक घटना पाहिल्या आहेत. ज्यामधे अपहरण करून पैसे मागितले जातात. घरातील लहान मुलांच किवा पैसे थकीत असतील तर घरातील कोणाच तरी अपहरण झाल्याच्या आपण तक्रारी पाहिल्या आहेत. मात्र पुण्यात अशी घटना वाढली आहे. ज्याने तुम्ही सुद्धा चक्रावून जाल कारण त्याने दोन लाख रुपयांसाठी चक्क स्वतःच अपहरण झाल्याच सांगितल आणि थेट भावाला आणि बापाला मेल केला आणि अपहरण केल्याची तक्रार केली. तुमचा मुलगा जर तुम्हाला जिवंत हवा असेल तर तुम्हाला दोन लाख रुपय द्यावे लागतील. असा धमकीचा मेल त्याने केला आणि त्या नंतर तो उत्तर प्रदेशला निघून गेला. बापाला आलेला मेल पाहता त्यांनी थेट बाणेर पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि तक्रार दिली मात्र जे बाहेर सत्य आल ते मात्र धक्कादायक होत.

    वाचा सविस्तर 

  • 26 Feb 2026 03:30 PM (IST)

    26 Feb 2026 03:30 PM (IST)

    पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी काँग्रेसचा मोठा निर्णय

    मुंबई : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने चिपळूणमध्ये तीन दिवसीय निवासी शिबिर आयोजित केले आहे. उद्या शुक्रवार दिनांक २७ फेब्रुवारीला या शिबिराची सुरुवात होणार असून १ मार्चला शिबिराची सांगता होणार आहे. नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिका व नगर पंचायत निवडणुकांमधील काँग्रेस पक्षाच्या कोकण विभागातील सर्व उमेदवारांसाठी हे निवासी प्रशिक्षण शिबिर आहे. चिपळूणमधील या शिबिराला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यासह पक्षाचे प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत. सामाजिक कार्यकर्ते व संबंधित विषयातील तज्ज्ञही यावेळी मार्गदर्शन करणार आहेत. लहान शहरे व निमशहरी भागातील नागरी समस्या, नागरिकांना भेडसावणाऱ्या अडचणी, त्यावरील उपाययोजना, विकास कामांची गुणवत्ता, तसेच नागरी प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी प्रशासनाकडे प्रभावी पाठपुरावा कसा करावा याबाबत यावेळी सविस्तर मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

  • 26 Feb 2026 03:22 PM (IST)

    26 Feb 2026 03:22 PM (IST)

    China Military Purge: चीनमध्ये हाहाकार! 100 जनरल आणि कमांडर बेपत्ता

    100 Chinese generals missing report : जगातील सर्वात मोठे सैन्य दल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चीनच्या ‘पीपल्स लिबरेशन आर्मी’मध्ये (PLA) सध्या कमालीची अस्वस्थता आहे. राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग (Xi Jinping) यांनी आपल्याच सैन्याची ‘सफाई’ करण्यास सुरुवात केली असून, गेल्या काही महिन्यांत चक्क १०० हून अधिक दिग्गज जनरल आणि कमांडर बेपत्ता झाले आहेत. लंडनस्थित ‘इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट फॉर स्ट्रॅटेजिक स्टडीज’ (IISS) ने प्रसिद्ध केलेल्या ‘मिलिटरी बॅलन्स २०२६’ अहवालानुसार, या कारवाईमुळे चिनी सैन्याची कमांड स्ट्रक्चर (Command Structure) पूर्णपणे कोलमडली आहे.

    वाचा सविस्तर 

  • 26 Feb 2026 02:50 PM (IST)

    26 Feb 2026 02:50 PM (IST)

    Vijay Rashmika Wedding: VIROSH च्या हळदी समारंभाचे फोटो व्हायरल; रश्मिकाचे टोपण नाव देखील उघड

    उदयपूरमध्ये रश्मिका मंदान्ना आणि विजय देवरकोंडा यांच्या लग्नाच्या विधी सुरू झाल्या आहेत. हे जोडपे लवकरच पती-पत्नी होणार आहे. त्यांच्या हळदी समारंभाचे फोटो व्हायरल होत आहेत. लग्नापूर्वी वर आणि वधूच्या कुटुंबियांनी व्हायरल प्रीमियर लीग सामना खेळला. याव्यतिरिक्त, बुधवारी संध्याकाळी त्यांचा संगीत समारंभ आयोजित करण्यात आला होता. विजयच्या मैत्रिणींनी या समारंभात एक अद्भुत सादरीकरण केले. विजयच्या आईने तिच्या भावी सुनेला वडिलोपार्जित बांगड्याही दिल्या.

  • 26 Feb 2026 02:40 PM (IST)

    26 Feb 2026 02:40 PM (IST)

    नागपूरमध्ये नात्याला काळिमा! मामीला घरात एकटी पाहून फिरली नियत आणि…; भाचा अटकेत

    नागपूर: नागपूरमधून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. मामीला घरात एकटी पाहून भाच्याची नियत फिरली आणि त्याने मामीसोबत अश्लील वर्तन केले. याप्रकरणी पोलिसात तक्रार दाखल केली असून भाच्याला अटक करण्यात आले आहे. ही घटना नागपूरच्या यशोधरानगर येथे घडली.

  • 26 Feb 2026 02:35 PM (IST)

    26 Feb 2026 02:35 PM (IST)

    योगींचा जपानमध्ये ‘धमाका’! उत्तर प्रदेश आणि यामानाशी यांच्यात ऐतिहासिक करार; ऊर्जा क्षेत्रात होणार क्रांती

    पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांच्या ‘नेट झिरो’ उत्सर्जनाच्या स्वप्नाला बळ देण्यासाठी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (CM Yogi Adityanath) यांनी जपानमध्ये एक ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. उत्तर प्रदेश आणि जपानमधील यामानाशी (Yamanashi) प्रीफेक्चर यांच्यात ‘ग्रीन हायड्रोजन’ (Green Hydrogen) तंत्रज्ञानाबाबत एक महत्त्वपूर्ण सामंजस्य करार करण्यात आला आहे. या करारामुळे उत्तर प्रदेश केवळ ऊर्जा क्षेत्रात स्वावलंबी होणार नाही, तर राज्यातील विद्यार्थ्यांना जागतिक स्तरावरील तंत्रज्ञान शिकण्याची सुवर्णसंधीही मिळणार आहे.

  • 26 Feb 2026 02:29 PM (IST)

    26 Feb 2026 02:29 PM (IST)

    चला गावाक! होळीनिमित कोकणवासीयांचा प्रवास सुखकर होणार; Kokan Railway चा मोठा निर्णय

    खेड: होळी सणानिमित्त प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन भारतीय रेल्वेने कोकण  मार्गावर विशेष माझ्या चालवण्याची घोषणा केली आहे. या निर्णयामुळे मुंबई-कोकण दरम्यान प्रवास करणान्या हजारो प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. गाडी क्रमांक ०१००४ मडगाव जंक्शन लोकमान्य टिळक (टी) विशेष ही दि. १ मार्च आणि ८ मार्च रोजी दुपारी ४.३० वाजता मडगानहुन सुटून दुसन्या दिवशी सकाळी ६.२० वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहोचेल.  परतीची ०१००३ लोकमान्य टिळक (टी) मडगाव विशेष २ मार्च आणि ९ मार्च रोजी सकाळी ८.२० वाजता सुटून त्याच दिवशी रात्री १२.४० वाजता मडगाव येथे दाखल होईल.

  • 26 Feb 2026 02:25 PM (IST)

    26 Feb 2026 02:25 PM (IST)

    ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ मध्ये जीवा-नंदिनीचा रेट्रो लूक, पार्थ-काव्याचा काऊबॉय अंदाज

    स्टार प्रवाहवरील लोकप्रिय मालिका लग्नानंतर होईलच प्रेम सध्या उत्कंठावर्धक वळणावर आली असून मालिकेत जीवा-नंदिनी आणि पार्थ-काव्याच्या लग्नाची तयारी जल्लोषात सुरू झाली आहे. ही मालिका आता प्रेक्षकांना चांगलीच आवडताना दिसत आहे. अशातच आता या मालिकेचे प्री-वेडिंग शूट चर्चेत आले आहे. ज्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यांच्या फोटोला चाहत्यांचा भरभरून प्रतिसाद देखील मिळत आहे.

  • 26 Feb 2026 02:20 PM (IST)

    26 Feb 2026 02:20 PM (IST)

    अजित पवारांसारख्या नेत्यांच्या मृत्यूवर FIR का घेतला जात नाही? पोलीस दबावाखाली; रोहित पवारांचा संशय

    दिवंगत नेते अजित पवार यांच्या अपघाती निधनाला (Ajit Pawar Plane Crash) एक महिना पूर्ण होत आला आहे. मात्र हा अपघात एक घातपात असल्याची शक्यता आमदार रोहित पवार व्यक्त करत आहेत. यासाठी त्यांनी अनेक पत्रकार परिषद घेत संपूर्ण तपासाची मागणी केली आहे. यानंतर रोहित पवार यांनी व्हीएसआर कंपनीवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. मात्र फक्त एफआयआर दाखल करुन घेत असून यावर कारवाई केली जात नसल्याचा आरोप रोहित पवारांनी (Rohit Pawar) केला आहे. कंपनीला वाचवण्याचा प्रयत्न सुरु असल्याचे देखील रोहित पवार म्हणाले आहेत.

  • 26 Feb 2026 02:15 PM (IST)

    26 Feb 2026 02:15 PM (IST)

    ड्युरंड रेषेवर रक्तपात! पाकिस्तानच्या ‘लज्जास्पद’ कृत्यावर तालिबानचा थेट युद्धाचा कॉल

    गेल्या अनेक दशकांपासून अशांत असलेल्या ड्युरंड रेषेवर (Durand Line) आता युद्धाचे ढग गडद झाले आहेत. पाकिस्तानी (Pakistan) हवाई दलाने अफगाणिस्तानच्या (Afghanistan) हद्दीत घुसून केलेल्या भीषण हवाई हल्ल्यांनंतर तालिबान प्रचंड संतापले आहे. “पाकिस्तानी सैन्याने केलेले हे कृत्य लज्जास्पद असून, त्यांना याचे चोख उत्तर लष्करी भाषेतच मिळेल,” अशी गर्जना तालिबानचे मुख्य प्रवक्ते जबीउल्लाह मुजाहिद यांनी केली आहे. या इशाऱ्यामुळे दक्षिण आशियातील भू-राजकीय समीकरणे हादरली असून पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये पूर्णवेळ युद्ध सुरू होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

  • 26 Feb 2026 02:08 PM (IST)

    26 Feb 2026 02:08 PM (IST)

    प्लेटमध्ये नाही थेट गनने पाणीपुरी शॉट्स! मुंबईत Gen Z विक्रेत्याचा धुमाकूळ; VIDEO VIRAL

    सोशल मीडियायवर आजकाल काय पाहायला मिळेल सांगात येत नाही. कधी मजेशीर, तर कधी चित्र-विचित्र व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. सध्या एक मजेशीर व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. यामध्ये एक तरुणी वेगळ्याच स्टाईलमध्ये पाणीपुरी विकत आहे. या व्हिडिओने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. हा व्हिडिओ मुंबईतील पाणीपुरी विक्रेत्याचा असल्याचे सांगितले जात आहे.

  • 26 Feb 2026 01:55 PM (IST)

    26 Feb 2026 01:55 PM (IST)

    100 पेक्षा जास्त स्पोर्ट्स मोड्ससह Oppo Watch S बाजारात दाखल

    बाजारात अनेक दमदार स्मार्टवाॅच आपली कमाल दाखवत असतानाच आता ओप्पोचा आपला प्रीमियम स्मार्टवाॅच मार्केटमध्ये दाखल झाला आहे. बेस्ट बॅटरी, स्मार्ट हेल्थ फीचर्स आणि दमदार डिस्प्लेसह याला लाँच करण्यात आले आहे. स्मार्टवाॅचची किंमत सामान्यांना परवडणारी नसली तरी यातील फीचर्स प्रशंसनीय आहेत. चला याविषयी सविस्तर जाणून घेऊया.

  • 26 Feb 2026 01:50 PM (IST)

    26 Feb 2026 01:50 PM (IST)

    ‘भारताचा निर्णय अत्यंत निराशाजनक!’ चाबहार बंदरावरून इराणची नाराजी

    भारत आणि इराण (India Iran Relations) यांच्यातील धोरणात्मक संबंधांचा कणा मानल्या जाणाऱ्या चाबहार बंदर (Chabahar Port) प्रकल्पाबाबत एक मोठी आणि धक्कादायक अपडेट समोर आली आहे. भारताने या वर्षीच्या अर्थसंकल्पात चाबहार प्रकल्पासाठी कोणतीही आर्थिक तरतूद न केल्याने इराणने आपली नाराजी उघडपणे व्यक्त केली आहे. इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची (Abbas Araghchi) यांनी या निर्णयाला “दोन्ही देशांसाठी निराशाजनक” म्हटले असून, यामुळे मध्य आशियाशी जोडले जाण्याचे भारताचे स्वप्न धोक्यात आल्याचे संकेत दिले आहेत.

  • 26 Feb 2026 01:40 PM (IST)

    26 Feb 2026 01:40 PM (IST)

    ‘चला हवा येऊ द्यानंतर’ निलेश साबळेचा मोठा धमाका; ‘चला… काहीतरी नवीन करूया’ ची चाहत्यांना उत्सुकता

    ‘चला हवा येऊ द्या’ या लोकप्रिय विनोदी कार्यक्रमाने तब्बल दहा वर्षे प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. लेखन आणि सूत्रसंचालनाची जबाबदारी सांभाळणारे निलेश साबळे हे या शोचे प्रमुख आकर्षण ठरले होते. मराठी कलाकारांसोबतच अनेक बॉलीवूड सुपरस्टार्सनीही या मंचावर हजेरी लावली होती. मात्र, दशकभरानंतर या कार्यक्रमाने अचानक प्रेक्षकांचा निरोप घेतल्याने विविध चर्चांना उधाण आले.

  • 26 Feb 2026 01:35 PM (IST)

    26 Feb 2026 01:35 PM (IST)

    संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट! वाल्मिक कराडला सुप्रीम दणका

    संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट समोर येत आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे. वाल्मिक कराडच्या अडचणीत वाढ झाली असून त्याचे पाय आणखी खोलात जाण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र हादरवूण सोडणाऱ्या सरपंच संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणातील मुख्य आरोपी आणि सूत्रधार वाल्मिक कराडला यांना सर्वोच्च न्यायालयाने मोठा धक्का दिला आहे. कराडने जामिनासाठी केलेला अर्ज सर्वोच्च न्यायालयाने फेटाळला आहे, त्यामुळे त्यांची तुरुंगवासाची शिक्षा वाढणार आहे.

  • 26 Feb 2026 01:28 PM (IST)

    26 Feb 2026 01:28 PM (IST)

    बारामतीमध्ये रोहित पवारांची पोलिसांसोबत शाब्दिक चकमक

    दिवंगत नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बारामती विमान अपघातमध्ये (Ajit Pawar Plane Crash) निधन झाले. अजित पवारांच्या निधनाला एक महिना होत आला असून हा अपघात आहे की घातपात यावरुन वाद निर्माण झाला आहे. अजित पवारांच्या निधनावर आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी संशय घेतला आहे. तसेच त्यांनी विमान कंपनीवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. मात्र पोलिसांनी फक्त एफआयआर दाखल केला असून गुन्हा दाखल केलेला नाही. यावरुन रोहित पवारांचा मुंबई पोलिसांसोबत वाद झाल्यानंतर आता बारामतीमध्ये देखील रोहित पवारांची पोलिसांसोबत शाब्दिक चममक झाली आहे.

  • 26 Feb 2026 01:20 PM (IST)

    26 Feb 2026 01:20 PM (IST)

    डिएगो गार्सिया ते इस्रायल… अमेरिकेचे चक्रव्यूह तयार!

    मध्यपूर्वेत आता विनाशाचे संकेत दिसू लागले आहेत. अमेरिका आणि इराण मधील तणावात प्रचंड वाढ झाली आहे. इराणवर अमेरिकेकडून कधीही हल्ला होऊ शकतो. नुकतेच अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो आणि अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवरील हल्ल्याची सविस्तर माहिती Gang of Eight ला दिली आहे. यामुळे मध्यपर्वेत युद्ध उंबरठ्यावर असल्याचे म्हटले जात आहे.मिळालेल्या माहितीनुसार, अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी गॅंग ऑफ ८ या गुप्तचर समितीला गोपनीय ब्रिफींग दिले आहे. या ब्रिफींगमुळे इराणवर अमेरिकेच्या लष्करी हल्ल्याची शक्यता अधिक वाढली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अमेरिकेचे सर्वात घातक F-22 रॅप्टर स्टेल्थ फायटर जेट्स इस्रायलमधील ओवाडा एअरबेसवर दाखल झाले आहे.

  • 26 Feb 2026 01:11 PM (IST)

    26 Feb 2026 01:11 PM (IST)

    पिंपरी- चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीवर बारणेंचा ‘अभिषेक’

    पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या स्थायी समिती अध्यक्षपदासाठी सत्ताधारी भारतीय जनता पक्षाचे अभिषेक बारणे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. विरोधी पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने या पदासाठी उमेदवार न दिल्याने बारणे यांची निवड आता केवळ औपचारिकता उरली असून, शनिवारी त्यांच्या निवडीवर अधिकृत शिक्कामोर्तब होणार आहे.

  • 26 Feb 2026 12:50 PM (IST)

    26 Feb 2026 12:50 PM (IST)

    एसटी चालकाला आली चक्कर; वाहकाने स्टेअरिंग हाती घेत 26 जणांचा जीव वाचवला!

    कर्जत एसटी आगाराची एसटी पनवेल कर्जत अशी सेवा देत होती. पनवेल येथून कर्जत कडे येणाऱ्या गाडीचे चालक यांना अस्वस्थ वाटू लागले आणि चक्कर आली. मात्र प्रसंगावधान दाखवून या एसटी गाडीचे वाहक यांनी स्वतःच्या हातात स्टिअरिंग घेतले आणि एसटी गाडी कर्जतकडे आणली.दरम्यान साधारण २६ प्रवासी यांना घेऊन ही एसटी गाडी कर्जतकडे येत असल्याने प्रवाशांचे यांचे प्राण वाचवण्यात वाहक नितीन राजाराम मोरे यशस्वी ठरले असल्याचे बोलले जात आहे.

  • 26 Feb 2026 12:40 PM (IST)

    26 Feb 2026 12:40 PM (IST)

    HbA1c चाचणी म्हणजे काय? दैनंदिन रक्तातील साखरेशी काय आहे संबंध, जाणून घ्या सविस्तर

    HbA1c हे ऑक्सिजन वाहून नेणाऱ्या लाल रक्तपेशींमधील प्रथिन असलेल्या हिमोग्लोबिनशी ग्लुकोज किती प्रमाणात जोडलेले आहे हे मोजते. तुमच्या रक्तातील साखर जितकी जास्त असेल तितकी तुमची HbA1c टक्केवारी जास्त असते. ५.७ टक्क्यांपेक्षा कमी HbA1c सामान्य मानली जाते तर “५.७ टक्के ते ६.४ टक्क्यांमधील मूल्य हे प्रीडायबिटीज दर्शवते. दोन वेगवेगळ्या चाचण्यांद्वारे पुष्टी झालेले ६.५ टक्के किंवा त्याहून अधिक HbA1c हे मधुमेहाचे निदान आहे, असे मानले जाते.

  • 26 Feb 2026 12:30 PM (IST)

    26 Feb 2026 12:30 PM (IST)

    अनिल अंबानींना मोठा धक्का! ED ने जप्त केले तब्बल ‘इतक्या’ कोटींचे घर

    अनिल अंबानी यांच्या अडचणीत वाढ झाली असून उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर अंमलबजावणी संचालनालयाने अनिल अंबानी यांचे अबोड येथील घर जप्त केले आहे. जप्त केलेल्या घराची किंमत ३,७१६ कोटी असल्याचा अंदाज आहे.

  • 26 Feb 2026 12:25 PM (IST)

    26 Feb 2026 12:25 PM (IST)

    Karjat News : एसटी चालकाला आली चक्कर; वाहकाने स्टेअरिंग हाती घेत वाचवला प्रवाशांचा जीव

    कर्जत एसटी आगाराची एसटी पनवेल कर्जत अशी सेवा देत होती. पनवेल येथून कर्जत कडे येणाऱ्या गाडीचे चालक यांना अस्वस्थ वाटू लागले आणि चक्कर आली. मात्र प्रसंगावधान दाखवून या एसटी गाडीचे वाहक यांनी स्वतःच्या हातात स्टिअरिंग घेतले आणि एसटी गाडी कर्जतकडे आणली.दरम्यान साधारण २६ प्रवासी यांना घेऊन ही एसटी गाडी कर्जतकडे येत असल्याने प्रवाशांचे यांचे प्राण वाचवण्यात वाहक नितीन राजाराम मोरे यशस्वी ठरले असल्याचे बोलले जात आहे. वाचा प्रकरण

  • 26 Feb 2026 12:20 PM (IST)

    26 Feb 2026 12:20 PM (IST)

    गर्भवती पत्नीसह तीन मुलींची गळा चिरून निर्घृण हत्या; पती फरार

    दिल्लीतील समयपूर बदली परिसरात गरोदर महिलेसह तिच्या तीन अल्पवयीन मुलींची धारदार शस्त्राने हत्या झाल्याची घटना उघडकीस आली. पतीवर संशय असून तो फरार आहे. पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

  • 26 Feb 2026 12:20 PM (IST)

    26 Feb 2026 12:20 PM (IST)

    या अपघाताचे काही गांभीर्य आहे का नाही? खासदार संजय राऊतांची टीका

    खासदार संजय राऊत म्हणाले की," प्रश्न इतकाच आहे की सरकार याला अपघात म्हणत आहे, आम्ही त्याला सदोष मनुष्यवध म्हणतो. या घटनेला महाराष्ट्र सराकर, राज्याचे मुख्यमंत्री हलक्यात घेत आहेत. त्यादिवशी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, केंद्रीय गृहमंत्र्यांना जो आक्रोश फुटला होता, तो खरा की खोटा असा प्रश्न पडला आहे. इतके ही गांभीर्य नाही की एक सहकारी आपण या संशयास्पद अपघातात गमावला आहे.” असे संजय राऊत म्हणाले आहेत.

  • 26 Feb 2026 12:10 PM (IST)

    26 Feb 2026 12:10 PM (IST)

    ‘देवालाही मान्य नसलेली क्रूरता!’ हिटलरने चोरले होते हिंदूंचे पवित्र चिन्ह?

    एका छोट्याशा चिन्हामुळे संपूर्ण अमेरिकन (America) लष्करी यंत्रणा हादरून जाईल, असे कोणालाही वाटले नव्हते. न्यू जर्सीमधील केप मे येथील ‘यूएस कोस्ट गार्ड’ प्रशिक्षण केंद्रात एका बाथरूमच्या भिंतीवर स्वस्तिकसारखे चिन्ह आढळले आणि एकच खळबळ उडाली. ही घटना केवळ एका चिन्हापुरती मर्यादित राहिली नाही, तर तिने इतिहास, धर्म आणि वंशद्वेषाच्या जुन्या जखमा पुन्हा ताज्या केल्या आहेत. अमेरिकेसाठी हे चिन्ह ‘हिटलरच्या’ (Hitler) क्रूरतेची आठवण करून देणारे आहे, तर भारतीयांसाठी ते ‘कल्याणाचे’ प्रतीक आहे.

  • 26 Feb 2026 12:10 PM (IST)

    26 Feb 2026 12:10 PM (IST)

    ब्रिटन सरकारने ट्रम्प पुढे टेकले गुडघे

    हिंद महासागरात मोठी खळबळ उडाली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्या सततच्या दबावामुळे ब्रिटनने मोठा निर्णय स्थगित केला आहे. ब्रिटनच्या केयर स्टारमर सरकारने गेल्या वर्षी २०२५ मध्ये चागोस द्वीपसमूह मॉरिशला देण्याचे मान्य केले होते. परंतु आता हा निर्णय मागे घेण्यात आला आहे. वाचा संपूर्ण प्रकरण

  • 26 Feb 2026 12:00 PM (IST)

    26 Feb 2026 12:00 PM (IST)

    अमेरिकेन हवाई दलाच्या माजी पायवटला अटक

    अमेरिकेने हवाई दलाच्या माजी पालटला अटक केली आहे. चिनी वैमानिकांना गुप्तपण कॉम्बॅट ट्रेनिंग दिल्याचा या वैमानिकावर आरोप आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जेराल्ड एडी ब्राऊन ज्युनियर असे या पायलटचे नाव असून त्याला रनर या टोपन नावाने देखील ओखळले जाते. मीडिया रिपोर्रटनुसार, जेराल्ड ब्राउनवर अमेरिकेच्या अत्याधुनिक लढाऊ विमानांचे चिनी वैमानिकांना प्रशिक्षण दिल्याचा आरोप आहे. वाचा सविस्तर

  • 26 Feb 2026 11:55 AM (IST)

    26 Feb 2026 11:55 AM (IST)

    राजेंद्र पवार बारामती पोलीस ठाण्यात दाखल

    अजित पवार यांच्या विमान अपघातावर संशय घेतला जात आहे. यामुळे रोहित पवार आज बारामती पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करणार आहेत. आज सकाळी रोहित पवार, युगेंद्र पवार तसेच अजित पवार यांचे चुलत बंधू, राजेंद्र पवार हे बारामती पोलीस ठाण्याजवळ पोहोचले. तेव्हा त्यांच्यासोबत अजित पवार यांचे हजारो समर्थक, कार्यकर्तेही मोठ्या संख्येने जमले होते.

  • 26 Feb 2026 11:52 AM (IST)

    26 Feb 2026 11:52 AM (IST)

    इस्रायल पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या भारतीय पोषाखाने वेधले लक्ष

    Benjamin Netanyahu यांनी भारतीय पोशाख परिधान करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. पारंपरिक भारतीय वेशभूषेत त्यांची झलक पाहून उपस्थितांमध्ये उत्सुकता निर्माण झाली. भारत-इस्त्राईल मैत्रीचे प्रतीक म्हणून त्यांनी हा पोशाख परिधान केल्याचे मानले जाते.

  • 26 Feb 2026 11:49 AM (IST)

    26 Feb 2026 11:49 AM (IST)

    PM मोदी ठरले 10 कोटी फॉलोवर्स असणारे जगातील एकमेव नेते

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंस्टाग्रामवर 10 कोटी फॉलोअर्सचा टप्पा ओलांडून एक नवा विक्रम रचला आहे. एवढी फॉलोवर्सची संख्या असणारे जगातील पहिले राजकीय नेते बनले आहेत. इंस्टाग्रामवर फॉलोअर्सच्या बाबतीत पंतप्रधान मोदी इतर जागतिक नेत्यांपेक्षा खूप पुढे आहेत.

Web Title: Marathi breaking news today live updates maharashtra budget session live 26 february

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 26, 2026 | 11:48 AM

Topics:  

  • budget 2026
  • maharashtra news
  • marathi latest news

संबंधित बातम्या

Smart Meterवरून करवडी ग्रामस्थ आक्रमक; वीज कार्यालयात चार तास ठिय्या
1

Smart Meterवरून करवडी ग्रामस्थ आक्रमक; वीज कार्यालयात चार तास ठिय्या

अथणी-रयत शुगर्सचा वाढीव क्षमतेने हंगाम यशस्वी; ‘इतके’ कोटी शेतकऱ्यांची खात्यात जमा
2

अथणी-रयत शुगर्सचा वाढीव क्षमतेने हंगाम यशस्वी; ‘इतके’ कोटी शेतकऱ्यांची खात्यात जमा

साताऱ्यामध्ये बाबासाहेब आंबेडकर जयंतीचा उत्साह; “संविधान हाच सर्वात मोठा ग्रंथ”, प्रा. कांगणेंचे प्रतिपादन
3

साताऱ्यामध्ये बाबासाहेब आंबेडकर जयंतीचा उत्साह; “संविधान हाच सर्वात मोठा ग्रंथ”, प्रा. कांगणेंचे प्रतिपादन

Maharashtra Breaking News LIVE Updates Today: सूरसम्राज्ञी आशा भोसले यांना अखेरचा निरोप
4

Maharashtra Breaking News LIVE Updates Today: सूरसम्राज्ञी आशा भोसले यांना अखेरचा निरोप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.