Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

4 वर्षात शेअरमध्ये तब्बल 1521 टक्क्यांची तुफानी तेजी; गुंतवणूकदारांना करोडपती करणारी ‘ही’ कंपनी कोणती?

सध्या शेअर बाजारात अफोर्डेबल रोबोटिक अँड ऑटोमेशन या कंपनीची सगळीकडे चर्चा आहे. ही कंपनी भविष्यात चांगले रिटर्न्स देण्याची शक्यता आहे, असा दावा केला जातो आहे.

  • By गोरक्षनाथ ठाकरे
Updated On: Nov 12, 2024 | 05:19 PM
4 वर्षात तब्बल शेअरमध्ये 1521 टक्क्यांची तुफानी तेजी, गुंतवणूकदारांना करोडपती करणारी 'ही' कंपनी कोणती?

4 वर्षात तब्बल शेअरमध्ये 1521 टक्क्यांची तुफानी तेजी, गुंतवणूकदारांना करोडपती करणारी 'ही' कंपनी कोणती?

Follow Us
Close
Follow Us:

शेअर बाजारात कधी काय होईल हे सांगता येत नाही. कधी एखादी कंपनी गुंतवणूकदारांना दमदार रिटर्न्स देते. तर एखादी कंपनी गुंतवणूकदारांना फार मोठा तोटा देऊ जाते. दरम्यान, सध्या अफोर्डेबल रोबोटिक अँड ऑटोमेशन नावाच्या या कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना दमदार रिटर्न्स दिले आहेत. ही कंपनी गेल्या चार वर्षांपासून छप्परफाड कमाई करून देत आहे.

विजय केडिया यांची कोट्यवधींची गुंतवणूक

साधारण चार वर्षांपूर्वी या कंपनीच्या शेअरचे मूल्य 42 रुपये होते. आता हाच शेअर 675 रुपयांवर जाऊन पोहोचला आहे. अफोर्डेबल रोबोटिक अँड ऑटोमेशन या कंपनीने गेल्या चार वर्षांत गुंतवणूकदारांना 1521 टक्के रिटर्न्स दिले आहेत. विशेष म्हणजे या कंपनीची स्थिती लक्षात घेता दिग्गज गुंतवणूकदार विजय केडिया यांनी देखील या कंपनीत कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक केलेली आहे. या कंपनीचे 52 आठवड्यातील सर्वोच्च मूल्य 845.80 रुपये आहे. तर 52 आठवड्यांतील निच्चांकी मूल्य 409.50 रुपये इतके आहे.
(फोटो सौजन्य – iStock)

हे देखील वाचा – ‘हे’ आहे भारतातील सर्वाधिक नोकऱ्या, पगारवाढ देणारं शहर; वाचा… मुंबईचा क्रमांक कितवा?

4 वर्षांत दिले 1521 टक्क्यांनी रिटर्न्स

अफोर्डेबल रोबोटिक अँड ऑटोमेशन या कंपनीच्या शेअरचे मुल्य 13 नोव्हेंबर 2020 रोजी 42.26 रुपये इतके होते. आता 11 नोव्हेंबर 2024 रोजी हा शेअर 677.10 रुपयांवर पोहोचला आहे. या कंपनीने गेल्या चार वर्षांत गुंतवणूकदारांना 1521 टक्के रिटर्न्स दिले आहेत. गेल्या तीन वर्षांत अफोर्डेबल रोबोटिक अँड ऑटोमेशन या कंपनीच्या शेअरमध्ये 421 टक्क्यांची बम्पर तेजी आलेली आहे. इंडस्ट्रियल प्रोडक्ट्स क्षेत्रात काम करमाऱ्या या कंपनीचा शेअर गेल्या तीन वर्षांत 131.37 रुपयांहून 675 रुपयांवर पोहोचलेला आहे.

हे देखील वाचा – नववर्षात खुशखबर मिळणार… सरकार जीवन आणि आरोग्य विम्यावरील जीएसटी हटवणार!

2 दोन वर्षांत 350 टक्क्यांनी तेजी

अफोर्डेबल रोबोटिक अँड ऑटोमेशन या कंपनीने गेल्या दोन वर्षांतही चांगली कामगिरी केलेली आहे. दोन वर्षांत या कंपनीच्या शेअरमध्ये 350 टक्क्यांनी वाढ झालेली आहे. 11 नोव्हेंबर 2022 रोजी हा शेअर 152.21 रुपयांवर होता. 11 नोव्हेंबर 2024 रोजी हा शेअर 677.10 रुपयांवर पोहोचला आहे. गेल्या आठ महिन्यांचा विचार करायचा झाल्यास, हा शेअर या काळात 65 टक्क्यांनी वाढला आहे. तर या वर्षभरात हा शेअर 33 टक्क्यांनी तेजीत आहे.

विजय केडिया यांची कंपनीत 9.93 टक्के मालकी

दिग्गज गुंतवणूकदार विजय केडिया यांच्याकडे या कंपनीचे तब्बल 11 लाखपेक्षा अधिक शेअर्स आहेत. या शेअर्सची एकूण संख्या 11,16,720 एवढी आहे. त्यांची या कंपनीत 9.93 टक्के मालकी आहे. वर नमूद केलेली माहिती ही सप्टेंबर 2024 पर्यंतची आहे.

(टीप : शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. वरती दिलेली माहिती माहितीस्तव देण्यात आली आहे. गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा यामागील उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)

Web Title: 1521 percent surge in shares in 4 years affordable robotics and automation ltd company that makes investors millionaires

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 12, 2024 | 05:19 PM

Topics:  

  • bse
  • share market

संबंधित बातम्या

पॅकेजिंग क्षेत्रातील मोठी हालचाल! ‘Bharat PET’ चा 760 कोटींचा IPO येणार; सेबीकडे कागदपत्रे दाखल
1

पॅकेजिंग क्षेत्रातील मोठी हालचाल! ‘Bharat PET’ चा 760 कोटींचा IPO येणार; सेबीकडे कागदपत्रे दाखल

Stock Market Live: गुंतवणुकदारांच्या आशेवर ट्रम्पने फिरवले पाणी! Sensex 1400 अंकांनी घसरला, NIFTY 22,225 दरम्यान उघडला
2

Stock Market Live: गुंतवणुकदारांच्या आशेवर ट्रम्पने फिरवले पाणी! Sensex 1400 अंकांनी घसरला, NIFTY 22,225 दरम्यान उघडला

Share Market : 10 लाख करोड रुपयांची लॉटरी! Iran युद्ध संपणार या आशेने Share Market मध्ये उसळी; सेन्सेक्स 1187 अंकांवर
3

Share Market : 10 लाख करोड रुपयांची लॉटरी! Iran युद्ध संपणार या आशेने Share Market मध्ये उसळी; सेन्सेक्स 1187 अंकांवर

New Rules From 1 April 2026 : ATM कॅश काढण्याच्या लिमिटमध्ये बदल, F&O ट्रेडिंग आता पडणार महाग, जाणून घ्या नवे नियम
4

New Rules From 1 April 2026 : ATM कॅश काढण्याच्या लिमिटमध्ये बदल, F&O ट्रेडिंग आता पडणार महाग, जाणून घ्या नवे नियम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.