Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 28 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

New Rules From 1 April 2026 : ATM कॅश काढण्याच्या लिमिटमध्ये बदल, F&O ट्रेडिंग आता पडणार महाग, जाणून घ्या नवे नियम

नवीन आर्थिक वर्ष (२०२६-२७) अधिकृतपणे सुरू झाले असं नाही, तर शेअर बाजार आणि बँकिंगशी संबंधित अनेक नियमांमध्येही बदल झाले आहेत. या बदलांचा थेट परिणाम तुमच्यावर होणार आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Apr 01, 2026 | 02:30 PM
(फोटो सौजन्य-सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य-सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • १ एप्रिलपासून आर्थिक नवीन वर्ष सुरु
  • शेअर बाजार आणि बँकिंगशी संबंधित अनेक नियमांमध्येही बदल
  • या बदलांचा थेट परिणाम तुमच्यावर होणार
New Rules From 1 April 2026 : आजपासून म्हणजे १ एप्रिलपासून आर्थिक नवीन वर्ष सुरु झालं आहे. केवळ नवीन आर्थिक वर्ष (२०२६-२७) अधिकृतपणे सुरू झाले असं नाही, तर शेअर बाजार आणि बँकिंगशी संबंधित अनेक नियमांमध्येही बदल झाले आहेत. या बदलांचा थेट परिणाम तुमच्यावर होणार आहे. त्यामुळे या नियमांची तुम्हाला माहिती असणं अत्यंत महत्त्वाचे आहे. आजपासून अंमलात आलेल्या बदलांचा तपशील खालीलप्रमाणे आहे:

Petrol-Diesel Price Hike: महागाईचा ट्रिपल अटॅक, कमर्शियल सिलेंडर, ATF नंतर आता पेट्रोल डिझेलदेखील महागलं

शेअर बायबॅकवरील टॅक्सचे नियम

१ एप्रिलपासून, शेअर बायबॅकसाठी म्हणजे ज्यामध्ये एखादी कंपनी गुंतवणूकदारांकडून स्वतःचे शेअर्स परत खरेदी करते यामधील लागू असलेल्या कर आकारणी पद्धतीत संपूर्ण बदल होणार आहे. बायबॅकद्वारे मिळणाऱ्या उत्पन्नाचे वर्गीकरण आता ‘लाभांश उत्पन्न’ म्हणजे Dividend Income ऐवजी ‘भांडवली नफा’ Capital Gains म्हणून केलं जाईल. कंपन्यांना २२% च्या प्रभावी दराने कर भरावा लागेल. बिगर-कॉर्पोरेट प्रवर्तकांसाठी हा कराचा दर ३०% निश्चित करण्यात आला आहे.

F&O ट्रेडिंग अधिक महागणार

१ एप्रिलपासून, फ्युचर्स आणि ऑप्शन्स म्हणजे F&O ट्रेडिंग अधिक महागणार आहे. फ्युचर्स कॉन्ट्रॅक्टवरील ‘सिक्युरिटीज ट्रान्झॅक्शन टॅक्स’ म्हणजेच STT हा ०.०२% वरून वाढवून ०.०५% करण्यात आला आहे.
ऑप्शन्ससाठी, STT चा दर ०.१२५% वरून वाढवून ०.१५% करण्यात आला आहे.
या क्षेत्रात होणाऱ्या सट्टेबाजीच्या व्यवहारांवर नियंत्रण ठेवण्याच्या आणि लहान गुंतवणूकदारांना मोठ्या आर्थिक नुकसानीपासून वाचवण्याच्या उद्देशाने सरकारने हे कर वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

LRS व्यवहारांवरील TCS मध्ये कपात

परदेश प्रवासाच्या पॅकेजेसवर, तसेच वैद्यकीय उपचार किंवा शिक्षणासाठी परदेशात पाठवल्या जाणाऱ्या रकमेवर (LRS ) लागू असलेला ‘स्रोतस्थानी कर संकलन’ (TCS) कमी करण्यात आला आहे.
परदेश प्रवासाच्या पॅकेजेससाठी, TCS चा दर २०% वरून मोठ्या प्रमाणात कमी करून केवळ २% करण्यात आला आहे.
वैद्यकीय उपचार किंवा शिक्षणासाठी पाठवल्या जाणाऱ्या निधीसाठी, लागू असलेला TCS दर आता ५% वरून कमी होऊन २% इतका करण्यात आला आहे.

बँकिंग नियमांमधील बदल

भारतीय रिझर्व्ह बँकेच्या निर्देशानुसार, आता भारतात केल्या जाणाऱ्या सर्व डिजिटल पेमेंट व्यवहारांसाठी ‘टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन’ (2FA) अनिवार्य असेल. आतापर्यंत, अशा व्यवहारांसाठी प्रामुख्याने SMS-आधारित ‘वन-टाइम पासवर्ड’ (OTP) वर अवलंबून राहावे लागत होतं. पण हे नवीन नियम आजपासून अंमलात आले आहेत. याव्यतिरिक्त, १ एप्रिलपासून, RuPay Platinum डेबिट कार्डधारकांना एयरपोर्ट आणि रेल्वे स्थानकांवरील लाउंजमध्ये मिळणारी मोफत प्रवेश सुविधा उपलब्ध होणार नाही. HDFC Bank, PNB आणि Bandhan Bank यांसह अनेक बँकांनी एटीएममधून रोख रक्कम काढण्याबाबतची आपली पॉलिसी, फीस आणि लिमिट यांच्यात बदल केले आहेत.

NPS चे नियम बदलणार

राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणालीमध्ये म्हणजे NPS मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी १ एप्रिलपासून एका नव्या पर्वाची सुरुवात होत आहे. PFRDA ने शुल्क आकारणीच्या पद्धतींमध्ये आणि ‘निव्वळ मालमत्ता मूल्य’ म्हणजे NAV मोजण्याच्या प्रक्रियेत महत्त्वपूर्ण बदल लागू केले आहेत. आता, एकाच योजनेअंतर्गत सरकारी आणि खाजगी वर्गणीदारांसाठी NAV म्हणजे निव्वळ मालमत्ता मूल्य वेगवेगळे असू शकतं.

LPG Price Hike: प्रत्येक सिलेंडरवर 380 रुपयांचा तोटा, तरीही सरकारने वाढवल्या नाहीत किमती; पण का? ‘हे’ आहे कारण…

Web Title: New rules from 1 april 2026 charge on f and o trading atm withdrawal limit and other marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 01, 2026 | 02:30 PM

Topics:  

  • Business News
  • income tax
  • Internet banking
  • Marathi News
  • new rules
  • share market

संबंधित बातम्या

Middle East :बाजार उठवला जाईल ;अमेरिका मध्य पूर्वेत दिसणार नाही ;मोजताबा खामेनाई
1

Middle East :बाजार उठवला जाईल ;अमेरिका मध्य पूर्वेत दिसणार नाही ;मोजताबा खामेनाई

Pakistan Breaking : तुफान बंदोबस्त ; ३,५०० कंटेनर,१८,००० पोलीस,३ लाख डॉलर खर्च ;फक्त इमरान खान साठी
2

Pakistan Breaking : तुफान बंदोबस्त ; ३,५०० कंटेनर,१८,००० पोलीस,३ लाख डॉलर खर्च ;फक्त इमरान खान साठी

Britain News : फेअरफोर्ड हवाई तळावरील ५ अटक प्रकरणाशी संबंध नाही; इराणचा स्पष्ट इन्कार
3

Britain News : फेअरफोर्ड हवाई तळावरील ५ अटक प्रकरणाशी संबंध नाही; इराणचा स्पष्ट इन्कार

SpaceX Starship:ची ऐतिहासिक झेप! महाकाय रॉकेट पहिल्यांदाच पृथ्वीच्या कक्षेत
4

SpaceX Starship:ची ऐतिहासिक झेप! महाकाय रॉकेट पहिल्यांदाच पृथ्वीच्या कक्षेत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.