Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘या’ दिवशी मिळणार पीएम किसान योजनेचा 18 वा हप्ता? तत्पूर्वी ‘ही’ कामे कराच? अन्यथा…

केंद्र सरकारच्या पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचा १८ वा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केला जाणार आहे. मात्र, त्याआधी शेतकऱ्यांना आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी लिंक करावे लागणार आहे. तसेच ई-केवायसीची प्रक्रिया देखील पूर्ण करावी लागणार आहे. तरच शेतकऱ्यांना १८ व्या हप्त्याचा लाभ मिळू शकतो.

  • By गोरक्षनाथ ठाकरे
Updated On: Jul 21, 2024 | 07:05 PM
'या' दिवशी मिळणार पीएम किसान योजनेचा 18 वा हप्ता? तत्पूर्वी 'ही' कामे कराच? अन्यथा...

'या' दिवशी मिळणार पीएम किसान योजनेचा 18 वा हप्ता? तत्पूर्वी 'ही' कामे कराच? अन्यथा...

Follow Us
Close
Follow Us:

केंद्र सरकार तिसऱ्यांदा सत्तेत आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वप्रथम शेतकऱ्यांना पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचा १७ वा हप्ता देण्यासाठीच्या फाईल स्वाक्षरी केली होती. ज्यामुळे महिनाभरापूर्वी देशभरातील शेतकऱ्यांना २००० रुपयांचा १७ वा हप्ता मिळाला होता. आता देशभरातील पात्र शेतकरी योजनेचा 18 वा हप्ता मिळण्याच्या प्रतीक्षेत आहे. पात्र शेतकऱ्यांना १८ वा हप्ता कधी वितरित केला जाणार? याबाबत शेतकरी आस लावून बसले आहेत. त्यामुळे आता १८ व्या हप्त्याचे २००० रुपये शेतकऱ्यांना कधी मिळणार हे आपण जाणून घेणार आहोत…

काय आहे ‘ही’ योजना?

शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ देण्यासाठी केंद्र सरकारने पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना सुरु केली आहे. या योजनेच्या माध्यमातून दरवर्षी शेतकऱ्यांना 6000 रुपयांची आर्थिक मदत केली जाते. प्रत्येक चार महिन्यांच्या फरकाने शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार रुपयांचा हप्ता जमा होतो. आतापर्यंत 17 हप्ते जारी करण्यात आले आहेत. दरम्यान, तुम्हाला जर पुढचा 18 वा हप्ता मिळवायचा असेल तर तुम्हाला आत्ताच काही गोष्टींची पूर्तता करावी लागणार आहे.

मुकेश अंबानींच्या ड्रायव्हरचा पगार कितीये? तुम्हाला माहितीये का..? आकडा ऐकून अवाक व्हाल!

कधी मिळणार योजनेचा १८ वा हप्ता?

देशातील करोडो शेतकऱ्यांना पंतप्रधान किसान निधी योजनेचा लाभ मिळत आहे. जून महिन्याच्या मध्यावधीत योजनेचा 17 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला आहे. तर आता मिळालेल्या माहितीनुसार, पुढील १८ वा हप्ता ऑक्टोबर महिन्यात जारी केला जाऊ शकतो.

कराव्या लागणार ‘या’ गोष्टी?

मात्र, त्यापूर्वी शेतकऱ्यांना महत्त्वाची कामे पूर्ण करावी लागणार आहेत. जर तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल. तर तुमचे आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी लिंक करावे लागणार आहे. हे काम न केल्यास तुमचा पुढील हप्ता अडकू शकतो. याशिवाय, तुम्ही अद्याप ई-केवायसी केले नसेल, तर आजच करा. ही कामे पूर्ण केली तरच तुम्हाला पीएम किसान सन्मान निधीचा योजनेचा पुढील म्हणजेच 18 वा हप्ता मिळेल, अन्यथा तुम्ही या हप्त्यापासून वंचित राहू शकतात.

केंद्रीय अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना काय मिळणार? वाचा… संपूर्ण माहिती एका क्लिकवर!

योजनेसंदर्भात कुठे मिळेल माहिती?

पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेशी संबंधित अधिक माहितीसाठी शेतकरी अधिकृत संकेतस्थळ pmkisan.gov.in ला भेट देऊ शकतात. याशिवाय शेतकरी आपल्या जवळच्या सीएससी केंद्रावर जाऊन ई-केवायसी करू शकतात. काही अडचण येत असेल तर शेतकरी हेल्पलाइन क्रमांक 155261 ची मदत घेऊ शकतात. योजनेशी संबंधित तपशील जाणून घेण्यासाठी शेतकरी 1800115526 या क्रमांकावर देखील संपर्क साधू शकतात.

Web Title: 18th installment of pm kisan yojana in month of october doing these things

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 21, 2024 | 05:02 PM

Topics:  

  • Agriculture News
  • PM Kisan Scheme
  • PM Kisan Yojana

संबंधित बातम्या

PM Kisan Yojana : पीएम किसान योजनेबद्दल महत्त्वपूर्ण अपडेट, तीन हप्ते मिळाले नसतील तर असा करा अर्ज, मिळेल पूर्ण परतावा
1

PM Kisan Yojana : पीएम किसान योजनेबद्दल महत्त्वपूर्ण अपडेट, तीन हप्ते मिळाले नसतील तर असा करा अर्ज, मिळेल पूर्ण परतावा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.