
पीएम किसान योजनेबद्दल महत्त्वपूर्ण अपडेट, तीन हप्ते मिळाले नसतील तर असा करा अर्ज, मिळेल पूर्ण परतावा
याचदरम्यान, राज्यसभेत लेखी उत्तरात कृषी आणि शेतकरी कल्याण राज्यमंत्री रामनाथ ठाकूर यांनी सांगितले की, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत (पीएम किसान) पूर्ण पारदर्शकता राखली जात आहे. आतापर्यंत, सरकारने २१ हप्त्यांमध्ये शेतकऱ्यांना ४.०९ लाख कोटी रुपयांहून अधिक रक्कम वितरित केली आहे. त्यांनी पुढे सांगितले की, सरकारने कोणत्याही मध्यस्थाशिवाय थेट शेतकऱ्यांपर्यंत निधी पोहोचावा यासाठी शेतकरी-केंद्रित डिजिटल प्रणाली विकसित केली आहे. मंत्री रामनाथ ठाकूर यांनी सांगितले की, पीएम-किसान योजनेवर अनेक परिणाम मूल्यांकन अभ्यास करण्यात आले आहेत, ज्यावरून असे दिसून येते की या योजनेचा शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेवर सकारात्मक परिणाम होत आहे.
आंतरराष्ट्रीय अन्न धोरण संशोधन संस्थेने (IFPRI) २०१९ मध्ये केलेल्या अभ्यासात असे आढळून आले की शेतकऱ्यांनी PM-KISAN मधून मिळालेल्या निधीचा वापर केवळ शेतीसाठीच केला नाही तर ग्रामीण अर्थव्यवस्थेलाही बळकटी दिली.
९२ टक्क्यांहून अधिक शेतकरी या योजनेवर समाधानी आहेत. कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाने किसान कॉल सेंटरद्वारे केलेल्या सर्वेक्षणात असे दिसून आले की ९२ टक्क्यांहून अधिक शेतकरी या योजनेवर समाधानी आहेत आणि ९३ टक्क्यांहून अधिक शेतकरी ही रक्कम शेतीशी संबंधित कामांसाठी वापरत आहेत. केंद्रीय मंत्र्यांच्या मते, NITI आयोगाच्या विकास देखरेख आणि मूल्यांकन कार्यालयाने (DMEO) PM-KISAN योजनेवर केलेल्या अभ्यासात असे आढळून आले की ही योजना शेतकऱ्यांना थेट आर्थिक मदत देण्याचे प्राथमिक उद्दिष्ट यशस्वीरित्या साध्य करत आहे. यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक स्थिरता वाढली आहे आणि त्यांची कृषी उत्पादकता सुधारली आहे. या अभ्यासातून असे दिसून आले आहे की ९२ टक्क्यांहून अधिक शेतकऱ्यांनी या मदतीचा वापर बियाणे, खते आणि कीटकनाशके यासारख्या आवश्यक शेती निविष्ठांसाठी केला, जो वाढत्या खर्च आणि हवामान अनिश्चिततेमुळे अत्यंत महत्त्वाचा आहे.
कृषी आणि शेतकरी कल्याण राज्यमंत्री रामनाथ ठाकूर यांनी सांगितले की सुमारे ८५ टक्के शेतकऱ्यांनी त्यांच्या शेती उत्पन्नात वाढ नोंदवली आहे आणि आता पीक अपयश किंवा रोग यासारख्या आपत्कालीन परिस्थितीत अनौपचारिक कर्जांवर अवलंबून नाहीत. या अभ्यासात असेही म्हटले आहे की पीएम-किसान योजनेने गरिबी कमी करण्यात, अन्न सुरक्षा वाढविण्यात, महिलांचा सहभाग मजबूत करण्यात आणि सरकारी यंत्रणेत पारदर्शकता आणण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. आधार-आधारित पेमेंट सिस्टम आणि सुधारित तंत्रज्ञानामुळे पेमेंट अपयशांमध्ये लक्षणीय घट झाली आहे.
सर्वप्रथम तुम्हाला PM किसान वेबसाइटवर जाऊन लॉग इन करा (https://pmkisan.gov.in/)
त्यानंतर रजिस्टर कंप्लेंट पर्यायावर क्लिक करा
त्यानंतर तुमची तक्रार लिहा
तक्रारीसोबत तुमच्या कागदपत्रांच्या प्रती जोडा
तुमच्या तक्रारीत तुमचे नाव, पत्ता, बँक खाते क्रमांक आणि मोबाईल क्रमांक समाविष्ट करा
शेवटी शेतकरी बांधवांनी सबमिट बटणावर क्लिक करावे.
दरम्यान, ज्या शेतकऱ्यांनी अद्याप ईकेवायसी केलेले नाही. तसेच अर्ज भरताना तुमचे नाव, वडिलांचे नाव, बँक खाते तपशील किंवा इतर कोणतीही चूक झाली असल्यास, तुम्ही या योजनेच्या लाभापासून वंचित राहाल. त्यामुळं तुम्ही लवकरात लवकर ईकेवायसी करुन घ्यावी. तसेच काही अपूर्ण माहिती असल्यास ती माहिती पूर्ण करावी. म्हणजे तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येईल.