Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 30 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अर्थमंत्र्यांसोबतच्या बैठकीत असं झालं तरी काय? 2 ऑक्टोबरचा No UPI Day रद्द! व्यापाऱ्यांनी घेतला मोठा निर्णय

No UPI Day Called : २ ऑक्टोबर रोजी गांधी जयंतीदिवशी देशभरात घोषित करण्यात आलेला 'No UPI Day' व्यापाऱ्यांनी मागे घेतला आहे. हा संप अधिकृतपणे रद्द करण्यात आला असल्याचं समोर येत आहे. केंद्रीय वित्तमंत्र्यांसोबत झालेल्या सकारात्मक बैठकीनंतर आणि व्यापाऱ्यांच्या मागण्यांवर तोडगा काढण्याचे आश्वासन मिळाल्यानंतर निर्णय घेण्यात आला आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Sep 30, 2026 | 05:44 PM
2 ऑक्टोबरचा No UPI Day रद्द! ( सौजन्य - सोशल मीडिया )

2 ऑक्टोबरचा No UPI Day रद्द! ( सौजन्य - सोशल मीडिया )

Follow Us
Follow Us:
  • अर्थमंत्र्यांसोबतच्या बैठकीत असं झालं तरी काय?
  • 2 ऑक्टोबरचा No UPI Day रद्द!
  • व्यापाऱ्यांनी घेतला मोठा निर्णय
No UPI Day Called : UPI ट्रान्सजेक्शनवर लागणाऱ्या MDR विरोधात व्यापारी आक्रमक होते. त्यामुळे त्यांनी 2 ऑक्टोबरला आंदोलनाचा पवित्रा वापरला होता. मात्र या आंदोलनाबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. २ ऑक्टोबर, २०२६ रोजी प्रस्तावित ‘No UPI Day’ची घोषणा मागे घेण्यात आली आहे. व्यापाऱ्यांच्या एका शिष्टमंडळाने केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची भेट घेतल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. नेमकं काय घडलं या बैठकीत? ( No UPI Day Called )

Inflation Rate : ही Diwali खिशावर भारी! पेट्रोलपासून कांद्यांपर्यंत सोन्यापासून स्मार्टफोनपर्यंत… अरे देवा सगळंच महागणार?

चांदनी चौकचे खासदार आणि कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सचे (सीएआयटी) सरचिटणीस, प्रवीण खंडेलवाल यांच्या नेतृत्वाखालील सुमारे २० वरिष्ठ व्यापारी नेत्यांच्या शिष्टमंडळाने नवी दिल्लीतील कर्तव्य भवन येथे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची भेट घेतली. या बैठकीत २,००० रुपयांवरील UPI व्यवहारांवर प्रस्तावित ०.४०% MDR संदर्भात व्यापाऱ्यांनी व्यक्त केलेल्या चिंतांवर चर्चा झाली. या बैठकीत महत्त्वापूर्ण चर्चा देखील झाली. त्यात उद्या होणाऱ्या No UPI Day मागे घेण्यात आला.

बैठकीत या अधिकाऱ्यांचा सहभाग

या प्रतिनिधी मंडळात विविध क्षेत्रांचे प्रतिनिधित्व करणारे अनेक प्रमुख व्यावसायिक नेते होते. ज्यात महत्त्वाचं म्हणजे ऑल इंडिया कंझ्युमर प्रॉडक्ट्स फेडरेशन AICPDF चे अध्यक्ष धैर्यशील पाटील, ऑल इंडिया मोबाईल रिटेलर्स असोसिएशन AIMRA चे अध्यक्ष कैलाश लखियानी आणि ऑल इंडिया ज्वेलर्स अँड गोल्डस्मिथ्स फेडरेशनचे अध्यक्ष पंकज अरोरा यांचा समावेश होता.

‘ No UPI Day’चा निर्णय मागे

प्रवीण खंडेलवाल यांनी सांगितले की, अर्थमंत्र्यांसोबत झालेल्या विधायक चर्चेनंतर आणि व्यावसायिक चिंता दूर करण्याच्या आश्वासनानंतर, AICPDF आणि AIMRA यांनी २ ऑक्टोबर रोजी प्रस्तावित ‘ No UPI Day’ विरोधातला आपला विरोध मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. या संघटनांनी यापूर्वी २ ऑक्टोबर रोजी यूपीआयचा वापर टाळण्याचे आवाहन केले होते.

MDR बद्दल व्यवसायांना कोणत्या चिंता ?

व्यापार संघटनांनी प्रस्तावित MDR च्या संभाव्य आर्थिक परिणामाचा मुद्दा उपस्थित केला. विशेषतः लहान आणि मध्यम आकाराच्या व्यवसायांवर त्यांनी विशेष भर दिला. त्यांनी सांगितले की, डिजिटल पेमेंटचा वेग कायम ठेवताना व्यवसायांवर अतिरिक्त खर्चाचा बोजा टाकला जाऊ नये. पण व्यापाऱ्यांनी स्पष्ट केले की डिजिटल पेमेंटला विरोध करण्याचा त्यांचा हेतू नाही. त्यांनी डिजिटल इंडिया मिशन आणि UPI च्या यशाला आपला पाठिंबा दाखवला आहे.

सरकारसोबत संवाद सुरू ठेवण्याचे आश्वासन

अर्थमंत्र्यांनी प्रतिनिधी मंडळाच्या चिंता ऐकून घेतल्या आणि सर्व हितधारकांच्या हिताचा विचार करून डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देण्याची सरकारची वचनबद्धता व्यक्त केली. व्यापार संघटनांनी आशा व्यक्त केली की सरकार आणि व्यापार संघटनांमध्ये पुढील संवाद सुरू राहील आणि UPI-संबंधित धोरणांसाठी एक अशी चौकट विकसित केली जाईल, जी डिजिटल अर्थव्यवस्थेला बळकट करेल आणि व्यवसाय व MSME च्या हिताचे रक्षण केलं जाईल.

काय सांगता? YouTube कडून बंपर कमाई…GDP मध्ये 18000 कोटींचं योगदान; 9.6 लाख लोकांना मिळाला रोजगार

Web Title: 2 october no upi day cancelled after traders meet finance minister marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 30, 2026 | 05:44 PM

Topics:  

  • UPI

संबंधित बातम्या

Apple युजर्ससाठी महत्त्वाची बातमी! 15 ऑक्टोबरपासून Apple Pay वरही लागणार MDR Charges? UPI पेक्षा कसा वेगळा आहे नियम?
1

Apple युजर्ससाठी महत्त्वाची बातमी! 15 ऑक्टोबरपासून Apple Pay वरही लागणार MDR Charges? UPI पेक्षा कसा वेगळा आहे नियम?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.