
फ्रेट कोरिडॉर (फोटो सौजन्य - iStock)
जीएसटी कपातीमुळे वाहन विक्रीला ‘अच्छे दिन’; नोव्हेंबरमध्ये झाली तब्बल 4.12 लाख वाहनांची विक्री
२०३० पर्यंत ४५% मालवाहतुकीचे लक्ष्य
नवीन कॉरिडॉर सध्याच्या १,३३७ किमी लांबीच्या ईस्टर्न आणि १,५०६ किमी लांचीच्या वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरशी जोडले जातील. वेस्टर्न कॉरिडॉरचा सुमारे १,४०४ किमीचा भाग कार्यान्वित झाला आहे, तर वैतरणा ते जेएनपीटीपर्यंतचा उर्वरित १०२ किमीचा भाग लवकरच सुरू होईल. सध्याच्या कॉरिडॉरमुळे मालवाहतुकीचा वेग वाढून प्रवासी मागाँवरील गर्दी कमी झाली आहे.
१,११५
किमी ईस्ट कोस्ट कॉरिडॉर (खडगपूर-विजयवाडा)
१,६७३
किमी ईस्ट-वेस्ट कॉरिडॉर (भुसावळ-दनकुनी)
९७५
किमी नॉर्थ-साउथ सब-कॉरिडॉर (विजयवाडा-नागपूर-इटारसी)
रेल्वे मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, एकूण मालवाहतुकीत रेल्वेचा वाटा १९९० च्या दशकात ६००% पेक्षा जास्त होता, जो २०२० मध्ये सुमारे २५% पर्यंत घसरला, परंतु कोविडनंतर डीएफसीच्या मदतीने हा वाटा २७% पर्यंत वाढला आहे. नॅशनल रेल प्लॅनचे लक्ष्य २०३० पर्यंत हा वाटा ४५% पर्यंत वाढवण्याचे आहे.
२०३० पर्यंत ५५० अब्ज डॉलर्स होणार लॉजिस्टिक्स बाजार
या तीन कॉरिडॉरपैकी किमान एका कॉरिडॉरला हिरवा कंदील मिळण्याची अपेक्षा आहे. हा निर्णय तांत्रिक बाबी, वाहतूक क्षमता आणि निधीची उपलब्धता यावर आधारित असेल. असे मानले जाते की हा प्रस्ताव येत्या केंद्रीय अर्थसंकल्पात समाविष्ट केला जाऊ शकतो, ज्यामध्ये २०२७ च्या आर्थिक वर्षासाठी निधीचे नाममात्र वाटप समाविष्ट असू शकते.
मालवाहतुकीतील वाटा वाढवण्याचे उद्दिष्ट
रेल्वे मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, १९९० च्या दशकात देशाच्या एकूण मालवाहतुकीत रेल्वेचा वाटा ६०% पेक्षा जास्त होता. २०२० मध्ये, हा वाटा सुमारे २५% पर्यंत कमी झाला होता. तथापि, समर्पित कॉरिडॉरच्या बांधकामामुळे, हा वाटा किंचित वाढून २७% झाला आहे. राष्ट्रीय रेल्वे योजनेअंतर्गत, २०३० पर्यंत हा वाटा ४५% पर्यंत वाढवण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे.