देशात डीश टीव्हीचा काळ आता हळूहळू मागे पडत आहे आणि प्रमुख कंपन्या सेटऑप बॉक्स आणत आहेत. ज्यात एअरटेल जिओ यांचा समावेश आहे. आता स्ट्रिमबॉक्सनेही एक खास सेवा भारतीयासांठी आणली आहे. पण यात सेटऑप बॉक्सच नाहीतर एक लेटेस्ट तंत्रज्ञान असणारा टीव्हीच तुम्हाला मिळणार आहे.
स्ट्रीमबॉक्स मीडियाने मायक्रोमॅक्ससोबत भागिदारीत ‘डोर’ ही भारतातील पहिली सबस्क्रिप्शनवर आधारित टेलिव्हिजन सेवा लाँच केली आहे. डोरमुळे अनेक प्रकारचे अनुभव भारतीयांना घरी आणि प्रवासात घेता येणार आहेत. १ डिसेंबर, २०२४ पासून फ्लिपकार्टवरुन तुम्हाला हा टीव्ही विकत घेता येणार रिटेल स्टोर्समध्येही हा लवकर उपलब्ध होणार आहे.
डोरमध्ये मिळणारे अॅप्स
तर या ‘डोर’मध्ये २४हून अधिक अॅप्स आणि ३०० हून अधिक टीव्ही चॅनेल्स मिळणार आहे. ज्यामध्ये प्राइम व्हिडिओ, जिओ सिनेमा, डिस्ने हॉटस्टार या अव्वल ओटीटींसह झी5, सोनी लिव्ह, यूट्यूब, डिस्कव्हरी प्लस, सन नेक्स्ट, अहा, होईचोई, लायन्सगेट प्ले, मनोरमा मॅक्स, ट्रॅव्हल एक्सपी, शेमारू, फॅनकोड, ममाफ्लिक्स, दंगल प्ले, डॉलीवूड प्ले, हंगामा, स्टेज, व्हीआर ओटीटी, डिस्ट्रो टीव्ही, चौपाल, प्लेफ्लिक्स, ईटीव्ही विन, राज टीव्ही अशा अनेक प्लॅटफॉर्म्सचा समावेश आहे. यांची संख्या अधिकाधिक वाढणार असल्याचंही कंपनीतर्फे सांगण्यात आलं आहे.
टीव्हीची वैशिष्ट्ये आणि किंमत
तर अगदी कमी दरात ओटीटी सेवेसह मिळणारे हे टीव्ही देखील अगदी बजेटमध्ये आहेत. ज्यामध्ये 4K QLED सह Dolby फिचर देण्यात आले आहे. तसेच या टीव्ही सोबत दिलेला रिमोट हा विनासेल सोलारसह कोणत्याही लाईटवर चालणारा आहे. तसेच हे टीव्ही ४ वर्षांची वॉरंटी आणि अपडेट्ससह मिळणार आहे. यात ४३ इंच,५५ इंच आणि ६५ इंचं हे प्रकार असून यांची किंमत अनुक्रमे ९,९९९ रुपये, १६,७९९ रुपये आणि २४,९९९ रुपये इतकी असणार आहे
एका सबस्क्रिप्शनवर कमाल ५ वापरकर्ते काँटेण्ट डाउनलोड करू शकतील
डोर टीव्हीचे सबस्क्रिप्शन मॉडेल ग्राहकांना उच्च दर्जाचे मनोरंजन उपलब्ध करून घेण्यासाठी एक किफायतशीर मार्ग देते असे कंपनीने म्हणणे असून यामध्ये टीव्ही घेतल्यानंतर पहिल्या महिन्यानंतर १२ महिन्यांच्या सबस्क्रिप्शन कालावधीसाठी टीव्हीचे सबस्क्रिप्शन शुल्क मासिक ७९९ रुपये आहे. त्यानंतर ग्राहक त्यांच्या बघण्याच्या अनुभवावर आधारित कस्टमाइझ्ड पॅकेजचा पर्याय घेऊ शकतात. ज्यामध्ये २९९ रुपयांपासूनही पॅक मिळणार आहे.लेटेस्ट फीचरसह यामध्ये एआय-पॉवर्ड शोध आणि संशोधन क्षमता ही आहे. म्हणजे यामध्ये AI फीचरही देण्यात आले आहे.. तसंच एका सबस्क्रिप्शनवर कमाल ५ वापरकर्ते काँटेण्ट डाउनलोड करू शकतील, असा पर्याय यात आहे. तसंच मोबाईलमध्ये डोर अॅप ड़ाऊनलोड करुन प्रवासातही या ओटीटींची मजा घेता येणार आहे.