Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Thackeray Brothers Alliance |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

नववर्ष २०२६ साठी गुंतवणूकदारांना सुवर्णसंधी! मिरे अॅसेटच्या तज्ज्ञांनी मांडला विकासाचा रोडमॅप

२०२६ मध्ये गुंतवणुकीचा श्रीगणेशा कसा करावा? मिरे अॅसेटच्या तज्ज्ञांकडून आलेला हा खास रिपोर्ट वाचा. ७% जीडीपी वाढीसह भारतीय बाजारपेठ नव्या उंचीवर जाण्यासाठी सज्ज!

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Dec 26, 2025 | 08:47 PM
नववर्ष २०२६ साठी गुंतवणूकदारांना सुवर्णसंधी! (Photo Credit - X)

नववर्ष २०२६ साठी गुंतवणूकदारांना सुवर्णसंधी! (Photo Credit - X)

Follow Us
Close
Follow Us:

 

  • नववर्ष २०२६ साठी गुंतवणूकदारांना सुवर्णसंधी!
  • मिरे अॅसेटच्या तज्ज्ञांनी मांडला विकासाचा रोडमॅप
  • जाणून घ्या…
मिरे अॅसेट इन्व्हेस्टमेंट मॅनेजर्स (इंडिया) या अग्रगण्य मालमत्ता व्यवस्थापन कंपनीच्या प्रमुख अधिकाऱ्यांनी २०२५ हे वर्ष संपत असताना आगामी २०२६ सालासाठी आपला आर्थिक दृष्टिकोन आणि बाजारातील संधींबाबत सविस्तर मते व्यक्त केली आहेत.

मजबूत अर्थव्यवस्था आणि उत्पन्नात सुधारणा: नीलेश सुराणा (CIO)

मिरे अॅसेटचे चीफ इन्व्हेस्टमेंट ऑफिसर नीलेश सुराणा यांच्या मते, भारत नववर्ष २०२६ मध्ये अत्यंत सकारात्मक स्थितीत प्रवेश करत आहे. प्रबळ मॅक्रो इकॉनॉमिक स्थिती, विकासाभिमुख आर्थिक धोरणे आणि ७ टक्क्यांहून अधिक अपेक्षित जीडीपी (GDP) वाढीमुळे बाजारपेठेत तेजी राहण्याची आशा आहे. २०२५ मधील संथ गतीनंतर, २०२६ मध्ये कॉर्पोरेट उत्पन्नामध्ये दोन-अंकी वाढ होऊ शकते. या वाढीला मागणीतील सुधारणा, कर कपात आणि आर्थिक शिथिलतेचा मोठा आधार मिळेल. बाजारपेठेतील अस्थिरता कमी होऊन मूल्यांकन (Valuation) रास्त पातळीवर आल्याने पोर्टफोलिओला विविध क्षेत्रांत चांगल्या संधी मिळतील. विशेषतः मिड-कॅप व स्मॉल-कॅप क्षेत्रातील दर्जेदार आणि आघाडीच्या कंपन्यांमध्ये मोठी गुंतवणूक होण्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे.

महागाईवर नियंत्रण आणि बॉण्ड मार्केटमधील संधी: बसंत बाफना (सीनियर फंड मॅनेजर)

फिक्स्ड इन्कम विभागाचे सीनियर फंड मॅनेजर बसंत बाफना यांनी सांगितले की, २०२६ मध्ये भारताची वास्तविक वाढ ७ टक्क्यांच्या पुढे असेल आणि महागाई आरबीआयच्या अपेक्षेनुसार मर्यादेत राहील. २०२५ मध्ये करण्यात आलेल्या १०० बेसिस पॉईंट्सच्या व्याजदर कपातीचे अनुकूल परिणाम २०२६ मध्ये स्पष्टपणे दिसून येतील. लिक्विडिटी (तरलता) वाढवण्यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांमुळे पुढील तीन वर्षांसाठी बाजारात स्थिरता राहील. या पार्श्वभूमीवर, तीन वर्षांच्या मनी मार्केट आणि कॉर्पोरेट बॉण्ड्समध्ये गुंतवणूक करणे लक्षवेधक ठरेल. जोखीम समायोजित परतावा मिळवण्यासाठी अ‍ॅक्यूरल्स आणि उत्पन्नाशी संबंधित धोरणे फायदेशीर ठरू शकतात.

Mirae Asset चे दोन नवीन ETF बाजारात, एनर्जी आणि स्मॉलकॅपमध्ये गुंतवणुकीची संधी!

इक्विटी, ईटीएफ आणि आंतरराष्ट्रीय कल: सिद्धार्थ श्रीवास्तव (प्रमुख – ईटीएफ)

ईटीएफ प्रॉडक्ट्सचे प्रमुख सिद्धार्थ श्रीवास्तव यांनी देशांतर्गत इक्विटीजबाबत सकारात्मकता व्यक्त केली आहे. त्यांनी व्यापक बाजारासाठी मल्टी-कॅप वितरणाचा सल्ला दिला आहे. त्यांच्या मते, २०२५ च्या तुलनेत २०२६ मध्ये बाजारपेठेतील अस्थिरता कमी असेल. सोन्याबाबत ते आशावादी आहेत, परंतु चांदीमध्ये वाढ होण्याची शक्यता अधिक असल्याचे त्यांनी नमूद केले. आंतरराष्ट्रीय स्तरावर, भारत चिनी बाजारपेठेत गुंतवणूक सुरू ठेवण्यावर आणि अमेरिकन बाजारपेठेतील एआय (AI) व संबंधित पायाभूत सुविधा क्षेत्रातील संधींवर लक्ष केंद्रित करेल. अमेरिकन टेक क्षेत्रातील उच्च मूल्यांकनाबाबत त्यांनी सावधगिरीचा इशाराही दिला आहे.

नावीन्यपूर्ण उत्पादने आणि जागतिक विस्तार: वैभव शाह (प्रमुख – बिझनेस स्ट्रॅटेजी)

बिझनेस स्ट्रॅटेजी आणि इंटरनॅशनल बिझनेस प्रमुख वैभव शाह यांच्या मते, २०२६ हे वर्ष गुंतवणूकदारांसाठी उत्साहाचे असेल. कंपनी मल्टी-फॅक्टर आणि क्वॉन्ट धोरणांवर आधारित नावीन्यपूर्ण उत्पादने, तसेच हायब्रिड एसआयएफ (SIF) फंड लाँच करणार आहे. ‘गिफ्ट सिटी’मधील संधींबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले. या क्षेत्रातील इनबाऊंड आणि आऊटबाऊंड फंडांना जगभरातील गुंतवणूकदारांकडून ६० दशलक्ष डॉलर्सच्या गुंतवणुकीसह उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. २०२६ मध्ये कंपनी आपला उत्पादन पोर्टफोलिओ अधिक विस्तारित करून नवीन संकल्पना आणण्यासाठी प्रयत्नशील असेल.

Mirae Asset Infrastructure Fund launched! पायाभूत सुविधांच्या महाचक्रात गुंतवणूक करण्याची संधी

Web Title: A golden opportunity for investors in the new year 2026 mirae assets experts have presented a roadmap for growth

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 26, 2025 | 08:47 PM

Topics:  

  • Business
  • Business News
  • Mirae Asset MF

संबंधित बातम्या

Condom बनवणाऱ्या कंपनीने एका वर्षात दिला ५००% परतावा; प्रमोटरने उचललं मोठं पाऊल, काय होणार परिणाम?
1

Condom बनवणाऱ्या कंपनीने एका वर्षात दिला ५००% परतावा; प्रमोटरने उचललं मोठं पाऊल, काय होणार परिणाम?

Nagpur News: ईबीजी ग्रुप Adhira and Appa Cafe चे 100 आउटलेट्स भारतात उभारणार
2

Nagpur News: ईबीजी ग्रुप Adhira and Appa Cafe चे 100 आउटलेट्स भारतात उभारणार

CobraPost investigation: ५ वर्षांत २५ हजार कोटी रोख व्यवहार; १४ बँकांचा उल्लेख, कोबरापोस्टचा खळबळजनक अहवाल
3

CobraPost investigation: ५ वर्षांत २५ हजार कोटी रोख व्यवहार; १४ बँकांचा उल्लेख, कोबरापोस्टचा खळबळजनक अहवाल

फॅशनविश्वात चंद्रमुखीची एन्ट्री!  अमृता खानविलकरची ‘बिझनेसवुमन’ म्हणून नवी इनिंग, सुरू केला साड्यांचा व्यवसाय, ब्रँडचं नाव चर्चेत
4

फॅशनविश्वात चंद्रमुखीची एन्ट्री! अमृता खानविलकरची ‘बिझनेसवुमन’ म्हणून नवी इनिंग, सुरू केला साड्यांचा व्यवसाय, ब्रँडचं नाव चर्चेत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.