 
        
        Mirae Asset चे दोन नवीन ETF बाजारात (Photo Credit - X)
मुंबई, ऑक्टोबर ३१, २०२५: मिरे अॅसेट इन्वेस्टमेंट मॅनेजर्स (इंडिया) प्रा. लि.ने (Mirae Asset) आज दोन नवीन फंड ऑफर्स (NFOs) लाँच करण्याची घोषणा केली आहे. मिरे अॅसेट निफ्टी एनर्जी ईटीएफ (निफ्टी एनर्जी टोटल रिटर्न इंडेक्सचा मागोवा घेणारी) २. मिरे अॅसेट निफ्टी स्मॉलकॅप २५० ईटीएफ (निफ्टी स्मॉलकॅप २५० टोटल रिटर्न इंडेक्सचा मागोवा घेणारी) ही दोन्ही उत्पादने गुंतवणूकदारांना पारदर्शक, नियम-आधारित आणि तुलनेने कमी खर्चात (Low Cost) वैविध्यपूर्ण गुंतवणुकीचा अनुभव देण्यासाठी डिझाइन करण्यात आली आहेत.
हा ईटीएफ गुंतवणूकदारांना भारतातील संपूर्ण ऊर्जा परिसंस्था उपलब्ध करून देण्याचा उद्देश ठेवतो. यात पारंपारिक हायड्रोकार्बन्स, वीज सुविधा आणि आधुनिक अक्षय ऊर्जा यांचा समावेश आहे.
1 नोव्हेंबरपासून SBI Card धारकांसाठी बदलणार नियम! Wallet Recharge केल्यास भरावे लागेल ‘इतके’ शुल्क
या ईटीएफचा उद्देश गुंतवणूकदारांना एकाच, वैविध्यपूर्ण वेईकलच्या माध्यमातून भारतातील गतीशील स्मॉल-कॅप श्रेणीचा किफायतशीर अनुभव देण्याचा आहे.
| तपशील | मिरे अॅसेट निफ्टी एनर्जी ईटीएफ | मिरे अॅसेट निफ्टी स्मॉलकॅप २५० ईटीएफ | 
| एनएफओ सुरू होण्याची तारीख | ३१ ऑक्टोबर २०२५ | ३१ ऑक्टोबर २०२५ | 
| एनएफओ बंद होण्याची तारीख | ४ नोव्हेंबर २०२५ | ४ नोव्हेंबर २०२५ | 
| स्कीम पुन्हा सुरू होईल | १० नोव्हेंबर २०२५ | १० नोव्हेंबर २०२५ | 
| किमान गुंतवणूक | ₹५,००० (आणि ₹१ च्या पटीत) | ₹५,००० (आणि ₹१ च्या पटीत) | 
| फंड मॅनेजर | श्रीमती एकता गाला, श्री. अक्षय उदेशी | श्रीमती एकता गाला, श्री. रितेश पटेल | 
सिद्धार्थ श्रीवास्तव (मिरे अॅसेट इन्वेस्टमेंट मॅनेजर्स (इंडिया)चे ईटीएफ प्रॉडक्ट्सचे प्रमुख): “हे ईटीएफ भारतीय इक्विटी बाजारपेठेच्या दोन प्रमुख विभागांमध्ये आमची उत्पादने अधिक मजबूत करतात. दोन्ही ईटीएफ गुंतवणूकदारांना संबंधित विभागांमध्ये कार्यक्षमतेने धोरणात्मक भूमिका घेण्यास किंवा दीर्घकालीन, कमी किमतीचे आणि वैविध्यपूर्ण निष्क्रिय एक्सपोजर तयार करण्यास सक्षम करतात.”






