
सॅमसंगच्या ३० वर्षांच्या प्रवासाला नवा आयाम (Photo Credit- X)
१९९५ मध्ये भारतात प्रवेश केल्यापासून, सॅमसंगने मनोरंजनाला नवीन उंचीवर नेणाऱ्या टेलिव्हिजन्सच्या निर्मितीपासून ते नोएडामध्ये जगातील सर्वात मोठा मोबाइल उत्पादन प्लांट स्थापित करण्यापर्यंत विस्तार केला आहे. आता भारतात डिझाइन केलेल्या नावीन्यतेला चालना दिली जात आहे, जे त्यांच्या जागतिक परिसंस्थेलाही पाठिंबा देतात.
१.११ लाख कोटींचा महसूल आणि AI परिसंस्था
१.११ लाख कोटी रुपयांच्या महसुलासह, सॅमसंग हा एंड-टू-एंड AI (कृत्रिम बुद्धिमत्ता) परिसंस्था असलेला भारतातील एकमेव ब्रँड आहे. त्यांनी स्मार्टथिंग्स (SmartThings) च्या माध्यमातून गॅलेक्सी AI (स्मार्टफोन्स, टॅब्लेट्स, वेअरेबल्स), बीस्पोक AI (रेफ्रिजरेटर्स, वॉशिंग मशीन्स व एसी) आणि व्हिजन AI (टेलिव्हिजन्स व स्मार्ट मॉनिटर्स) यांना एकत्र आणले आहे.
“भारतात आमच्या पहिल्या टीव्हीची विक्री करण्यापासून ते आज सर्वात विश्वसनीय तंत्रज्ञान सहयोगी बनण्यापर्यंत सॅमसंगच्या प्रवासाला भारतीयांचा आत्मविश्वास, सर्जनशीलता व अमर्यादित महत्त्वाकांक्षांनी आकार दिला आहे. आम्ही भारतातील लाखो कुटुंबांचे दैनंदिन जीवन सुलभ करण्याचा अभिमान बाळगतो. भारत जगभरातील अर्थपूर्ण नावीन्यतेच्या भावी युगाचे नेतृत्व करेल. आम्ही विकसित भारतासाठी सरकारसोबत सहयोगाने काम करत राहू. येथे प्रगत तंत्रज्ञान निर्माण करण्याचा आमचा स्पष्ट दृष्टिकोन आहे,” असे सॅमसंग साउथवेस्ट एशियाचे अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी जेबी पार्क म्हणाले.
भारतात डिझाइन केलेले, जगासाठी
गेल्या ३० वर्षांपासून, सॅमसंगचा विश्वास आहे की भारत नावीन्यतेला समर्थन देतो. आज, ब्रँडचे चेन्नई व नोएडा येथे दोन उत्पादन प्लांट्स, दिल्ली, नोएडा व बेंगळुरू येथे तीन संशोधन आणि विकास (R&D) केंद्रे आणि दिल्ली NCR मध्ये अत्याधुनिक डिझाइन केंद्र आहेत.
भावी नवप्रवर्तकांमध्ये गुंतवणूक
सॅमसंगचा दृष्टिकोन #PoweringInnovationForIndia हा केवळ उत्पादनांपुरता मर्यादित नाही. कंपनी भारतातील स्टार्टअप्ससोबत युनिव्हर्सिटी सहयोग आणि ओपन इनोव्हेशन उपक्रमांचा विस्तार करत आहे.
सॅमसंग सॉल्व्ह फॉर टुमॉरो (Solve for Tomorrow), सॅमसंग इनोव्हेशन कॅम्पस आणि सॅमसंग दोस्त यांसारख्या उपक्रमांमधून सॅमसंग भारतातील युवकांना इंडस्ट्री ४.० च्या गरजांशी संलग्न कौशल्ये देत आहे. कंपनी AI, IoT, डिजिटल तंत्रज्ञान आणि रोजगार संधींमध्ये देशभरातील विद्यार्थ्यांना अनुदान आणि इनक्यूबेशन सपोर्ट देत आहे. सॅमसंगच्या CSR उपक्रमांचा फायदा भारतभरातील जवळपास १.५ दशलक्ष व्यक्तींना झाला आहे.
१९९५ मध्ये भारतात सुरू झालेली सॅमसंग आज देशातील सर्वात मोठी मोबाइल फोन व ग्राहक इलेक्ट्रॉनिक्स ब्रँड आहे. त्यांचे ३,००० हून अधिक अधिकृत सर्विस पॉइंट्स आणि १२,००० सर्विस इंजीनिअर्स देशभर ग्राहकांना सेवा देत आहेत. त्यांनी बेंगळुरूमध्ये सॅमसंग ऑपेरा हाऊस आणि मुंबईमध्ये पहिले प्रमुख लाइफस्टाइल स्टोअर ‘सॅमसंग बीकेसी’ लाँच करून आपली रिटेल उपस्थिती वाढवली आहे.