IndiaFirst Life Insurance: ‘जिम्मेदारियां हमसे बांटिये, हल्का लगेगा’ जबाबदाऱ्यांचा भार हलका करणारी इंडियाफर्स्ट लाइफची नवी मोहिम (photo-social media)
IndiaFirst Life Insurance: इंडियाफर्स्ट लाइफ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड (इंडियाफर्स्ट लाइफ) ने आज नवीन ब्रँड मोहिम लाँच केली, जी जीवन विम्याच्या भूमिकेला नवीन रूप देते, तसेच जीवनातील जबाबदाऱ्यांमधून दिलासा देते. द वॉम्बची संकल्पना असलेली नवीन मोहिम विलंबित समाधानाचे उत्पादन म्हणून जीवन विम्याच्या समकालीन दृष्टिकोनाला आव्हान करते आणि जीवन विमाला उत्साहित अनुभवामध्ये बदलते, जे ‘बोझ’ म्हणजेच जबाबदाऱ्यांचा भार उंचावत त्वरित सामाधान देते. ही भावना नवीन ब्रँड वचन ‘जिम्मेदारियां हमसे बांटिये, हल्का लगेगा’मध्ये सुरेखरित्या समाविष्ट करण्यात आली आहे.
विभक्त कुटुंबांची आधुनिक जीवन वास्तविकता, वाढता आर्थिक ताण आणि अनिश्चिततेला सादर करत ही मोहिम दाखवून देते की, जीवन विमा कोणत्याही इतर मालमत्ता वर्गाच्या तुलनेत त्वरित भावनिक आधार देतो. जबाबदाऱ्यांमधून त्वरित दिलासा देत इंडियाफर्स्ट लाइफ विशिष्ट, भावनिकदृष्ट्या संलग्न पैलू निर्माण करते, जे आठवण करून देण्याऐवजी हमी पाहिजे असलेल्या ग्राहकांना आवाहन करते. ही मोहिम टेलिव्हिजन, डिजिटल व ओओएच प्लॅटफॉर्म्सवर राबवण्यात येईल.
इंडियाफर्स्ट लाइफचे चीफ मार्केटिंग ऑफिसर शुभंकर सेनगुप्ता म्हणाले, ”ब्रँड म्हणून आमची संरक्षण व नियोजनाच्या कार्यक्षम कथानकापलीकडे जाण्याची महत्त्वाकांक्षा होती. ग्राहकांसोबत केलेल्या आमच्या संवादांमधून आम्हाला निदर्शनास आले की, त्यांच्यावर जबाबदाऱ्यांचे ओझे आहे आणि ते दीर्घकाळापासून त्यामधून दिलासा मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. या मोहिमेसह आम्ही ‘तुम्हाला जबाबदार असण्याची आठवण करून देण्यापासून’ ‘तुम्हाला कोणताही भार न वाटण्यास मदत करण्यापर्यंत’, तसेच ‘डू धीस’ ते ‘फिल धीस’पर्यंत बदल घडवून आणत आहोत. हा जीवन विम्याप्रती अधिक सहानुभूतीशील, मानवी दृष्टिाकेन आहे, जो आजच्या विश्वासाशी दृढपणे संलग्न आहे.”
हेही वाचा: Karma Global News: Karma Global ची वेबिनार सिरीज यशस्वी; 2500 हून अधिक सहभागींनी घेतला सहभाग
द वॉम्बचे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर हेवल पटेल म्हणाले, ”ग्राहक व प्रमुख भागधारकांसोबत केलेल्या विविध चर्चांमधून आम्ही विशिष्ट ‘अपरिहार्य धोरणा’वर पोहोचलो. आम्हाला समजले की व्यक्तींना त्यांच्या जबाबदाऱ्या आधीच माहित आहेत, जसे त्यांच्या मुलांचे शिक्षण, निवृत्तीनंतरचे नियोजन किंवा कुटुंबासाठी आर्थिक सुरक्षितता. ते जीवन सुरक्षित असण्याची हमी आणि त्यामधून मिळणारा दिलासा शोधत आहेत. ही मोहिम उत्तम कथानकाला सादर करते, जेथे नायकाला जीवन विमा घेतल्यानंतर त्याच्यावरील जबाबदारीचा भार कमी झाल्यासारखे वाटते.”
मोहिम येथे पहा: https://www.youtube.com/watch?v=pJIJsFJJNmE
कॅम्पेन व्हिज्युअल:
मोहिमेचे श्रेय:
• क्रिएटिव्ह एजन्सी – द वॉम्ब
• सह-संस्थापक – कवल शूर व नविन तलरेजा
• सीओओ – हेवल पटेल
• सीसीओ – सुयश खाब्या
• अकाऊंट मॅनेजमेंट: स्नेहा करकेरा, शैली मेहता, सहीफ गिरीयाल
• क्रिएटिव्ह: गुंजन गाबा, विक्रांत वाडकर, दिलीप सैनी
• प्लॅनिंग: स्नेहा रैना, इपशिता खान
• प्रोडक्शन हाऊस – गुड मॉर्निंग फिल्म्स
• दिग्दर्शक: बॉब (शशांक चतुर्वेदी)
• निर्माता: कॉर्नेलिया व ओजस्विनी






