Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • TCS Nashik Case |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

विमा क्षेत्रातील जागतिक कंपनी ADNIC ची भारतात एन्ट्री; शाखा स्थापन करण्यासाठी मिळवली मंजूरी

अबू धाबी नॅशनल इन्शुरन्स कंपनी कॉर्पोरेट आणि वैयक्तिक ग्राहकांसाठी अग्रगण्य प्रादेशिक मल्टी-लाइन विमा प्रदाता कंपनीने गुजरातमधील भारतातील पहिले इंटरनॅशनल फायनान्शियल सर्व्हिसेस सेंटर गिफ्ट सिटी मध्ये परवानगी मिळाली आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Apr 21, 2026 | 07:10 PM
(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us
Close
Follow Us:
  • ADNIC ला भारतातील गिफ्ट सिटीमध्ये कामकाज सुरू करण्यास परवाना
  • या टप्‍प्‍यामधून कंपनीचा सातत्यपूर्ण आंतरराष्ट्रीय विस्तार
  • यूएई-भारत यांच्यातील आर्थिक संबंध अधिक मजबूत
अबू धाबी नॅशनल इन्शुरन्स कंपनी (एडीएनआयसी) या कॉर्पोरेट आणि वैयक्तिक ग्राहकांसाठी अग्रगण्य प्रादेशिक मल्टी-लाइन विमा प्रदाता कंपनीने गुजरातमधील भारतातील पहिले इंटरनॅशनल फायनान्शियल सर्व्हिसेस सेंटर (आयएफएससी) गिफ्ट सिटी येथे पुनर्विमा व्यवसाय करण्यासाठी परवाना प्राप्‍त केला आहे. हा परवाना १ एप्रिल २०२६ पासून लागू झाला आहे.

भारतीय MutuaFund चा Apple वर मोठा डाव! 1800 कोटींची Investment; गुंतवणूकदारांना मिळाला बंपर Return

आंतरराष्ट्रीय विस्तार धोरणातील महत्त्वाचा टप्पा

ही मंजूरी एडीएनआयसीच्या आंतरराष्ट्रीय विस्तार धोरणातील महत्त्वाचा टप्पा आहे. कंपनीने नुकतेच सौदी अरेबियाच्या बाजारपेठेत प्रवेश केला आहे आणि आता भारतातील आपल्या विद्यमान सीमापार पुनर्विमा व्यवसायाला अधिक दृढता दिली आहे.

ग्राहकांसाठी सेवा क्षमता वाढवण्यास मदत

भारतातील या शाखेमुळे उत्पन्‍नाचे स्रोत वैविध्यपूर्ण होण्यास आणि वेगाने वाढणाऱ्या बाजारपेठांमधील ग्राहकांसाठी सेवा क्षमता वाढवण्यास मदत होईल, ज्यामुळे एडीएनआयसीच्या दीर्घकालीन वाढीला चालना मिळेल, अशी अपेक्षा आहे. तसेच, द्विपक्षीय व्यापार आणि गुंतवणूक वाढवण्याच्या दोन्ही देशांच्या सामायिक उद्दिष्टाला अनुसरून ही शाखा यूएई व भारत यांच्यातील आर्थिक संबंध अधिक दृढ करण्यास हातभार लावेल.

यूएईच्‍या व्यावसायिक वातावरणाची स्थिरता

या मंजुरीमधून यूएईच्‍या व्यावसायिक वातावरणाची स्थिरता दिसून येते. प्रादेशिक घडामोडी बदलत असतानाही येथील कंपन्या आपली धोरणात्मक उद्दिष्टे गाठण्यासाठी आणि जागतिक बाजारपेठेत विस्तार करण्यासाठी सातत्याने प्रयत्‍न करत आहेत. एडीएनआयसीच्‍या भारतातील प्रवेशामधून कंपनीची दीर्घकालीन वाढीप्रती कटिबद्धता दिसून येते आणि वाढत्या आंतरराष्ट्रीय उपस्थितीसह प्रादेशिक विमा कंपनी म्हणून कंपनीचे स्थान अधिक प्रबळ झाले आहे.

भारत-यूएई आर्थिक संबंध अधिक मजबूत

एडीएनआयसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी चरालामपोस मायलोनास म्हणाले: “गिफ्ट सिटीमध्ये कार्य करण्यासाठी परवाना मिळणे हा एडीएनआयसीच्या आंतरराष्ट्रीय वाढीच्या प्रवासातील महत्त्वाचा टप्पा आहे. यामुळे भारत-यूएई आर्थिक संबंध अधिक मजबूत होण्यासोबत भारतातील आमचे ग्राहक आणि भागीदारांना पाठबळ देण्याची आमची दीर्घकालीन कटिबद्धता अधिक दृढ झाली आहे. आमची जागतिक उपस्थिती वाढवत असताना वेगाने बदलणाऱ्या बाजारपेठेत विश्वासार्ह आणि वैयक्तिक गरजांनुसार विमा उपाय प्रदान करणे आणि कार्यात्मक स्थिरता राखणे, यावर आमचा भर कायम राहील.”

एडीएनआयसी ग्रुप जगभरात विमा आणि पुनर्विमा सेवा प्रदान करतो. सध्या या ग्रुपची यूएई, सौदी अरेबिया आणि युनायटेड किंगडममध्ये कार्यालये आहेत, तसेच, भारतातील शाखा त्यांच्या आंतरराष्ट्रीय नेटवर्कचा अधिक विस्तार करेल.

लग्नसराईपूर्वी ग्राहकांना मोठा दिलासा, Gold – Silver च्या दरात तब्बल ‘इतकी’ घट, पाहा नेमका दर काय?

Web Title: Adnic secures regulatory approval to establish branch in indias gift city marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 21, 2026 | 07:10 PM

Topics:  

  • international news
  • UAE

संबंधित बातम्या

Iran-US War : ‘इराणसोबतचा नवीन करार जगात शांतता प्रस्थापित करेल’; डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
1

Iran-US War : ‘इराणसोबतचा नवीन करार जगात शांतता प्रस्थापित करेल’; डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान

‘बडीबडी बाते वडापाव खाते’, पाकिस्तान पाहतेय 25 अब्ज डॉलरचे स्वप्नं; UAE चा बदला घेण्यासाठी ग्वादरची दुबईशी तुलना?
2

‘बडीबडी बाते वडापाव खाते’, पाकिस्तान पाहतेय 25 अब्ज डॉलरचे स्वप्नं; UAE चा बदला घेण्यासाठी ग्वादरची दुबईशी तुलना?

Global Economy Crisis: महाप्रलयाचे संकेत! पगार वाढणार नाही पण खर्च दुप्पट होणार; जगासमोर सर्वात मोठं आर्थिक संकट?
3

Global Economy Crisis: महाप्रलयाचे संकेत! पगार वाढणार नाही पण खर्च दुप्पट होणार; जगासमोर सर्वात मोठं आर्थिक संकट?

दुसऱ्यांचं युद्ध, चीनचा लाभ! Iran America संघर्षात China चा ‘Business’ जोरात! Dollar ची मोठी कमाई
4

दुसऱ्यांचं युद्ध, चीनचा लाभ! Iran America संघर्षात China चा ‘Business’ जोरात! Dollar ची मोठी कमाई

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.