1 लाखाचे झाले 84 लाख रुपये; चित्रपट क्षेत्रातील या कंपनीने गुंतवणूकदारांना दिलाय मजबूत परतावा!
ह्युंदाई मोटर इंडिया लिमिटेड या दक्षिण कोरियाच्या वाहन उत्पादक कंपनीचे भारतीय युनिट म्हणजे ह्युंदाई मोटर्स इंडियाच्या शेअर्सने मंगळवारी बाजारात सूचिबद्ध झाले. कंपनीच्या आयपीओची किंमत 1960 रुपये होती तर शेअर्स 1,931 वर सूचिबद्ध झाले. त्यानंतर शेअर्समध्ये आणखी घट झाली. मंगळवारी शेअर्स 1819 रुपयांवर बंद झाले होते. आज बुधवारी हे शेअर्स 6 टक्क्यांनी वाढले आणि 1928.15 रुपयांच्या इंट्राडे उच्चांकावर पोहोचले. त्यामुळे देशांतर्गत ब्रोकरेज फर्मने या शेअरला खरेदीचे रेटिंग दिले आहे. मोटिलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेसने ह्युंदाई मोटर इंडियावर खरेदीसाठी 2345.0 रुपयांच्या लक्ष्य किंमतीसह खरेदीची शिफारस केली आहे.
हे देखील वाचा – रेमंड लाइफस्टाइल देणार 9 हजार लोकांना नोकऱ्या; वाचा… काय आहे कंपनीची याेजना!
देशातील पाचवी सर्वात मौल्यवान ऑटोमोबाईल कंपनी
ह्युंदाई मोटर इंडिया लिमिटेड मंगळवारी शेअर बाजारात सूचिबद्ध होण्याच्या दिवशी बाजार भांडवलाच्या दृष्टीने देशातील पाचवी सर्वात मौल्यवान ऑटोमोबाईल कंपनी बनली आहे. ह्युंदाई मोटर्स इंडियाचा आयपीओ शेवटच्या दिवसापर्यंत 2.37 पट सबस्क्राइब झाला होता. यामध्ये 27,870 कोटी आयपीओसाठी प्रति शेअर 1,865-1,960 रुपयांचा किंमतपट्टा निश्चित करण्यात आला होता.
हे देखील वाचा – झोमॅटोवरून जेवण मागवणे महागले; प्लॅटफॉर्म फीमध्ये तब्बल 40 टक्क्यांहून अधिक वाढ!
ठरला सर्वात मोठा आयपीओ
ह्युंदाई मोटर इंडिया लिमिटेड हा भारतीय शेअर बाजारातील हा सर्वात मोठा आयपीओ ठरला असून, त्याने भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या 21,000 कोटी रुपयांच्या आयपीओला मागे टाकले. या आयपीओमध्ये पात्र संस्थात्मक खरेदीदार विभागाला 6.97 पट सबस्क्रिप्शन मिळाले, तर गैर-संस्थात्मक गुंतवणूकदार श्रेणी 60 टक्के सबस्क्राइब झाली. किरकोळ गुंतवणूकदारांसाठी असलेली श्रेणी 50 टक्के सबस्क्राइब झाली. ह्युंदाई मोटर इंडियाने आयपीओ उघडण्यापूर्वी मोठ्या (अँकर) गुंतवणूकदारांकडून 8,315 कोटी रुपयांची उभारणी केली.
(टीप : शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. वरती दिलेली माहिती माहितीस्तव देण्यात आली आहे. गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा यामागील उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)