शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार २००० रुपये, तुम्हाला मिळणार की नाही? तुमचं नाव येथे तपासा (फोटो सौजन्य-X)
PM Kisan 19th Installment News: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दुपारी २:१५ वाजता बिहारमधील भागलपूर येथे पीएम किसान योजनेचा १९ वा हप्ता जाहीर करणार आहेत. यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रुपये जमा होतील.होळी सणाच्या आधीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांना एक मोठी भेट देणार आहे. आज (24 फेब्रुवारी) पंतप्रधान नरेंद्र मोदी बिहारमधील भागलपूर येथील देशातील ९.८० कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा १९ वा हप्ता (PM Kisan 19th Installment) म्हणून एकूण २२,००० कोटी रुपये हस्तांतरित करणार आहेत. दरम्यान पंतप्रधान मोदी दुपारी २:१५ वाजता भागलपूरमध्ये पीएम किसान योजनेचा १९ वा हप्ता जारी करतील. यामध्ये बिहारमधील ७६ लाख शेतकऱ्यांचा समावेश आहे. बिहारमधील शेतकऱ्यांच्या खात्यात १६०० कोटी रुपये पाठवले जातील.
भागलपूर किसान सन्मान निधी योजनेचा सहावा वर्धापन दिन साजरा करण्यात येणार आहेत. २०१९ मध्ये २४ फेब्रुवारी रोजीच, पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना सुरू करण्यात आली. शेतकऱ्यांच्या घरात समृद्धी आणि आनंद आला आहे. पीएम किसान योजनेमुळे प्रत्येक शेत हिरवळीने व्यापले आहे. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या ६००० रुपयांच्या रकमेचा वापर शेतकरी बंधू आणि भगिनी खते, बियाणे, कीटकनाशके इत्यादी शेतीशी संबंधित गरजा खरेदी करण्यासाठी करू शकतात. ही रक्कम दर ४ महिन्यांच्या अंतराने ३ हप्त्यांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात हस्तांतरित केली जाते. प्रत्येक हप्त्यात २००० रुपये दिले जातात.
किसान सन्मान निधीने लहान शेतकऱ्यांचे जीवन बदलले आहे. या योजनेअंतर्गत तीन हप्त्यांमध्ये थेट ६,००० रुपये दिले जातात. शेतकऱ्यांच्या खात्यात सुमारे ३.४६ लाख कोटी रुपये जमा झाले आहेत. १९ वा हप्ता जारी झाल्यानंतर, एकूण ३.६८ लाख कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात पोहोचतील. आयएफपीआरआयने पीएम-किसान योजनेचा स्वतंत्र अभ्यास केला ज्यामध्ये असे आढळून आले की योजनेअंतर्गत मिळालेल्या निधीमुळे शेतकऱ्यांना कर्जाच्या समस्यांवर मात करण्यास मदत झाली आहे आणि त्यांची जोखीम घेण्याची क्षमता वाढली आहे.
पंतप्रधान किसान योजनेच्या अधिकृत वेबसाइट pmkisan.gov.in ला भेट द्या. यानंतर होम पेजच्या उजव्या बाजूला असलेल्या ‘फार्मर्स कॉर्नर’ यावर क्लिक करा. शेतकरी कॉर्नर विभागात ‘लाभार्थी स्थिती’ पर्यायावर क्लिक करा. आता तुमचे राज्य, जिल्हा आणि गाव यासह इतर माहिती प्रविष्ट करा. तपशील भरल्यानंतर ‘रिपोर्ट मिळवा’ वर क्लिक करा. आता तुमच्या समोर एक यादी येईल, ज्यामध्ये तुम्ही तुमचे नाव तपासू शकता. जर नाव नसेल, तर तुम्ही ‘फार्मर्स कॉर्नर’ विभागात जाऊन इतर तपशील प्रविष्ट करू शकता.
पीएम किसान योजनेशी संबंधित कोणत्याही समस्येसाठी शेतकरी pmkisan-ict@gov.in या ईमेल आयडीवर संपर्क साधू शकतात. पीएम किसान योजनेच्या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधू शकता – १५५२६१ किंवा १८००११५५२६ (टोल फ्री) किंवा ०११-२३३८१०९२. इथेही तुमची प्रत्येक समस्या सोडवली जाईल.
या कार्यक्रमाव्यतिरिक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी भागलपूरमध्ये इतर काही उपक्रमांचा शुभारंभ करतील. बरौनी डेअरी बिहारमधील बरौनी येथे ११३.२७ कोटी रुपयांच्या गुंतवणुकीतून विकसित केलेला एक अत्याधुनिक दुग्धजन्य पदार्थ प्रकल्प सुरू करणार आहे, ज्याची दूध प्रक्रिया क्षमता सुमारे २ लाख लिटर आहे. हा पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय विभागाचा एक कार्यक्रम आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी राष्ट्रीय गोकुळ मिशन अंतर्गत पशुपालन आणि दुग्ध उत्पादकता वाढविण्यासाठी ३३.८० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह मोतिहारी येथे प्रादेशिक उत्कृष्टता केंद्र (सीओई) चे उद्घाटन देखील करतील.
२०२० मध्ये सुरू केलेल्या योजनेअंतर्गत १०,०००-एफपीओ लक्ष्य साध्य करण्यासाठी मोदी बिहारमध्ये १०,००० व्या शेतकरी उत्पादक संघटनेचे (एफपीओ) उद्घाटन करतील. शेतकऱ्यांची सौदेबाजी करण्याची क्षमता बळकट करण्यासाठी आणि बाजारपेठेतील उपलब्धता सुधारण्यासाठीच्या उपक्रमांचा हा यशस्वी कळस ठरेल.