Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 22 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Air India चा प्रवास महागला, 899 रुपयांपर्यंत वाढला ‘फ्यूल सरचार्ज’

जागतिक स्तरावर विमान इंधनाच्या किमतीत झालेल्या प्रचंड वाढीमुळे एअर इंडियाने देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय उड्डाणांवर 'फ्यूल सरचार्ज' वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. नवीन दर देशांतर्गत उड्डाणांसाठी ८ एप्रिलपासून लागू होतील.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Apr 08, 2026 | 02:55 PM
(फोटो सौजन्य-सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य-सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • युद्धाचा थेट परिणाम आता विमान प्रवाशांच्या खिशावर
  • एअर इंडियाने उड्डाणांवर ‘फ्यूल सरचार्ज’ वाढवण्याचा निर्णय
  • नवीन दर ८ एप्रिलपासून लागू होतील
Fuel Surcharge : इराण आणि अमेरिका-इस्रायलमधील युद्धाचा थेट परिणाम आता विमान प्रवाशांच्या खिशावर होऊ लागला आहे. जागतिक स्तरावर विमान इंधनाच्या किमतीत झालेल्या प्रचंड वाढीमुळे एअर इंडियाने देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय उड्डाणांवर ‘फ्यूल सरचार्ज’ वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. नवीन दर देशांतर्गत उड्डाणांसाठी आज, ८ एप्रिलपासून लागू होतील, ज्यामुळे प्रवाशांना रुपयांपर्यंत ८९९ अतिरिक्त भुर्दंड सोसावा लागेल. तर आंतरराष्ट्रीय मार्गावर हा बदल १० एप्रिल पासून लागू होणार असून, तिथे २८० डॉलर्सपर्यंत सरचार्ज आकारला जाईल.

गेल्या काही आठवड्यांत जेट इंधनाच्या दरात मोठी वाढ

एअरलाइनच्या म्हणण्यानुसार, गेल्या काही आठवड्यांत जेट इंधनाच्या दरात मोठी वाढ झाली आहे. आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक संघटनेच्या आकडेवारीनुसार, फेब्रुवारीच्या अखेरीस सुमारे ९९ डॉलर असलेला जेट इंधनाचा सरासरी दर मार्चच्या शेवटच्या आठवड्यात प्रति बैरल १९५ डॉलरवर पोहोचला. या मोठ्या दरवाढीमुळे एअरलाइनचा खर्च लक्षणीयरीत्या वाढला असून, भाड्यांवर वाढीचा दबाव आला आहे.

देशांतर्गत उड्डाणे : अंतराच्या आधारावर नवीन शुल्क

आतापर्यंत देशांतर्गत उड्डाणांवर सरचार्ज समान होता, मात्र आता तो प्रवासाच्या अंतरावर अवलंबून असेल, म्हणजेच, प्रवास जेवढा लांब, तेवढे भाडे जास्त. हा नवीन नियम एअर इंडिया एक्सप्रेससह एअर इंडिया ग्रुपच्या सर्व विमानांना लागू होईल. सरकारने एटीएफच्या दरातील वाढ २५ टक्क्यांपर्यंत मर्यादित ठेवण्याचा प्रयत्न केला, परंतु खर्च संतुलित करण्यासाठी विमान कंपन्यांना तरीही हे पाऊल उचलावे लागले आहे.
०-५०० किमी अंतरावर २९९ रुपयांची वाढ
५०१-१००० किमी अंतरावर ३९९ रुपयांची वाढ
१००१-१५०० किमी अंतरावर ५४९ रुपयांची वाढ
१५०१-२००० किमी अंतरावर ४४९ रुपयांची वाढ
२००० किमी पेक्षा जास्त अंतरावर ८९९ रुपयांची वाढ करण्यात आली आहे.

आंतरराष्ट्रीय उड्डाणांवर मोठा परिणाम

इंधनाच्या किमतीवर नियंत्रण नसल्यामुळे तिथे सरचार्जमध्ये मोठी वाढ करण्यात आली आहे. उत्तर अमेरिका आणि ऑस्ट्रेलियासारख्या लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी सर्वाधिक शुल्क आकारले जाणार आहे.

सार्क (बांगलादेश वगळून) २४ डॉलर फ्यूल सरचार्ज
पश्चिम आशिया / मध्य पूर्व ५० डॉलर फ्यूल सरचार्ज
द.-पू. आशिया (सिंगापूर वगळून) १०० डॉलर फ्यूल सरचार्ज
सिंगापूर ६० डॉलर फ्यूल सरचार्ज
आफ्रिका १३० डॉलर फ्यूल सरचार्ज
युरोप (ब्रिटनसह) २०५ डॉलर फ्यूल सरचार्ज
उत्तर अमेरिका २८० डॉलर फ्यूल सरचार्ज
ऑस्ट्रेलिया २८० डॉलर फ्यूल सरचार्ज

Web Title: Air india fuel surcharge hike know the impact on common men walltet att price 2026 marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 08, 2026 | 02:55 PM

Topics:  

  • air india
  • Air India latest news
  • Airline
  • Business News
  • Marathi News

संबंधित बातम्या

DHL Rakhi Express 2026: राखीचा गोडवा आता सीमापार!  DHLची ‘राखी एक्सप्रेस’मध्ये ५० टक्क्यांची  सूट
1

DHL Rakhi Express 2026: राखीचा गोडवा आता सीमापार! DHLची ‘राखी एक्सप्रेस’मध्ये ५० टक्क्यांची सूट

Avadhoot Gupte: अवधूत गुप्तेंची ‘सारेगमप’मध्ये दमदार कमबॅक! नव्या पिढीच्या सुरांचा घेणार वेध
2

Avadhoot Gupte: अवधूत गुप्तेंची ‘सारेगमप’मध्ये दमदार कमबॅक! नव्या पिढीच्या सुरांचा घेणार वेध

Cheque Book Rules Change: चेकबुकबाबत मोठी बातमी! जुने चेकबुक होणार बंद? खातेदारांना करावा लागणार ‘हा’ बदल
3

Cheque Book Rules Change: चेकबुकबाबत मोठी बातमी! जुने चेकबुक होणार बंद? खातेदारांना करावा लागणार ‘हा’ बदल

Chandrapur News: चंद्रपूरमध्ये पावसाचा लपंडाव; ५०२ मिमी पावसाची नोंद, खरीप पिकांना दमदार सरींची प्रतीक्षा
4

Chandrapur News: चंद्रपूरमध्ये पावसाचा लपंडाव; ५०२ मिमी पावसाची नोंद, खरीप पिकांना दमदार सरींची प्रतीक्षा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.