Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘एअर इंडिया’ सुरु करणार देशातील पहिले पायलट ट्रेनिंग स्कूल; महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यात उभारणार!

देशातील अग्रगण्य विमान वाहतूक कंपनी एअर इंडिया देशातील पहिले पायलट ट्रेनिंग स्कूल सुरु करणार आहे. एअर इंडिया आपले हे फ्लाइंग स्कूल महाराष्ट्रातील अमरावतीमध्ये या ठिकाणी सुरु करणार आहे. ज्यात वर्षाला एकूण 180 वैमानिकांना प्रशिक्षण दिले जाणार आहे.

  • By गोरक्षनाथ ठाकरे
Updated On: Jun 22, 2024 | 07:10 PM
'एअर इंडिया' सुरु करणार देशातील पहिले पायलट ट्रेनिंग स्कूल

'एअर इंडिया' सुरु करणार देशातील पहिले पायलट ट्रेनिंग स्कूल

Follow Us
Close
Follow Us:

एअर इंडिया या देशातील नामांकित विमान वाहतूक कंपनीने स्वतःचे पायलट ट्रेनिंग स्कूल (फ्लाईंग स्कूलक) सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे हे देशातील अशा पद्धतीचे पहिलेच पायलट ट्रेनिंग स्कूल ठरणार आहे. ज्याची उभारणी कंपनीकडून महाराष्ट्रातील अमरावती येथे केली जाणार आहे. या फ्लाईंग स्कूलमध्ये वर्षाकाठी 180 वैमानिकांना प्रशिक्षण देण्याची क्षमता असेल. ज्या वैमानिकांना अगोदर उड्डाणाचा अनुभव नाही, त्यांना स्कूलमध्ये प्रवेश दिला जाणार आहे.

काय आहे कंपनीचा उद्देश?

एअरलाइन अर्थात विमान वाहतूक उद्योगात करिअर करणाऱ्या तरुणांना उत्कृष्ट संधी उपलब्ध करून देणे. हा पायलट ट्रेनिंग स्कूल सुरु करण्यामागील कंपनीचा मुख्य उद्देश आहे. फ्लाइंग स्कूल सुरु करण्याचा उपक्रम हा एअर इंडियाच्या देशांतर्गत प्रशिक्षण सुविधा वाढविण्याच्या आणि कुशल वैमानिकांच्या विकासासाठी योगदान देण्याच्या व्यापक धोरणाचा एक भाग असणार आहे.
(फोटो सौजन्य : istock)

कुशल वैमानिक तयार होण्यास मदत होणार

सध्याच्या घडीला भारतात तसेच तसेच जागतिक स्तरावर वैमानिकांची मागणी वाढत आहे. ही बाब लक्षात घेऊन अपेक्षित कमतरता दूर करण्यासाठी एअर इंडिया महाराष्ट्रातील अमरावती येथे या स्कूलची स्थापना करणार आहे. या ठिकाणी प्रशिक्षणाचे सर्व टप्पे पूर्ण झाल्यावर, एअर इंडियाच्या कॉकपिटपर्यंत थेट मार्ग उपलब्ध करून दिला जाणार आहे. कंपनीच्या या निर्णयामुळे या क्षेत्रात करिअर करु इच्छिणाऱ्या तरुणांना चांगली संधी आहे. या निर्णयामुळे देशाअंतर्गत प्रशिक्षण देण्यात येणार असून, कुशल वैमानिक तयार होण्यास मदत होणार आहे.

कसा असेल प्रशिक्षण प्रोग्राम?

प्रशिक्षणामध्ये प्रारंभिक, उच्च आणि व्यावसायिक वैमानिक प्रशिक्षण प्रोग्रामचा समावेश असणार आहे. तसेच, एअर इंडियाच्या फ्लाइंग स्कूलमध्ये प्रशिक्षणासाठी अत्याधुनिक आणि प्रगत विमान वाहतूक उपकरणे वापरली जाणार आहेत. यामध्ये उच्च दर्जाचे फ्लाइंग सिम्युलेटर आणि इतर विमानसेवेशी संबंधित उपकरणांचा समावेश असणार आहे. असे एअर इंडियाकडून सांगण्यात येत आहे.

कसा मिळेल विद्यार्थ्यांना प्रवेश?

सध्या देशातील 40 टक्क्यांपेक्षा जास्त विद्यार्थी पायलट क्षेत्रातील प्रशिक्षण परदेशात घेतात. या प्रशिक्षणाची किंमत जवळपास 1.5 चे 2 कोटी रुपये असू शकते. मात्र, आता विद्यार्थ्यांना भारतातच प्रशिक्षण उपलब्ध होणार आहे. दरम्यान, या पायलट ट्रेनिंग स्कूलमध्ये प्रवेश घ्यायचा असल्यास त्यासाठी निवड प्रक्रिया कठीण असणार आहे. तसेच प्रवेश घेणाऱ्या उमेदवाराची शैक्षणिक पात्रता, वैयक्तिक मुलाखत तसेच शारीरिक तंदुरुस्ती यांच्या आधारे त्यांचे मूल्यांकन करुन प्रवेश दिला जाणार आहे.

Web Title: Air india start the countrys first pilot training school in amravati

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 22, 2024 | 07:09 PM

Topics:  

  • air india
  • Business News

संबंधित बातम्या

8th Pay Commission: 18000 ची बेसिक सॅलरी होणार 69,000? इन्क्रिमेंटपेक्षाही अधिक मिळणार पगार
1

8th Pay Commission: 18000 ची बेसिक सॅलरी होणार 69,000? इन्क्रिमेंटपेक्षाही अधिक मिळणार पगार

पश्चिम आशियात शांततेच्या आशेमुळे शेअर बाजारात तेजी, सेन्सेक्स 500 अंकांनी उसळला; Eternal ला फायदा
2

पश्चिम आशियात शांततेच्या आशेमुळे शेअर बाजारात तेजी, सेन्सेक्स 500 अंकांनी उसळला; Eternal ला फायदा

Iran America War : उंबरठ्यावर आलं, भारतानं नाकारलं! 20 लाख बॅरल घेऊन आलेल्या Irani जहाजाला No Entry,नेमकं कारण काय?
3

Iran America War : उंबरठ्यावर आलं, भारतानं नाकारलं! 20 लाख बॅरल घेऊन आलेल्या Irani जहाजाला No Entry,नेमकं कारण काय?

AI असूनही ग्राहक का नाराज? ४८ टक्के ग्राहकांना जाणवतोय सहानुभूतीचा अभाव; फक्त १९ टक्के व्यावसायिक प्रमुखांचे ‘या’ समस्येकडे लक्ष
4

AI असूनही ग्राहक का नाराज? ४८ टक्के ग्राहकांना जाणवतोय सहानुभूतीचा अभाव; फक्त १९ टक्के व्यावसायिक प्रमुखांचे ‘या’ समस्येकडे लक्ष

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.