वंदे भारत ट्रेन
भारतीय रेल्वे वंदे भारत गाड्या अधिकाधिक लवकर चालू होण्यासाठी वेगाने काम करत आहे. एक दिवसापूर्वीच बातमी आली होती की 30,000 कोटी रुपयांच्या करारासह रेल्वेकडून तयार करण्यात येणाऱ्या 100 वंदे भारत गाड्यांचा करार रद्द करण्यात आला आहे.
वंदे भारत ट्रेनमध्ये स्लीपर कोच बसवण्याच्या योजनेवर रेल्वे पुनर्विचार करत असल्याचे सांगण्यात येत आहे. वास्तविक, याचे कारण म्हणजे या गाड्या बनवण्यासाठी जास्त खर्च येतो आणि अशा गाड्या बनवण्यासाठी योग्य माहिती किंवा तंत्रज्ञान अद्याप देशात उपलब्ध नाही. काय आहे नक्की प्रकरण हे या लेखातून जाणून घ्या. नक्की कुठे येत आहे अडचण आणि यावर निघेल का काही तोडगा? (फोटो सौजन्य – iStock)
टेंडर रद्द
भारतीय रेल्वेला ॲल्युमिनियमच्या 100 वंदे भारत गाड्या खरेदी करण्यासाठी 30,000 कोटी रुपयांची निविदा रद्द करावी लागली. Alstom India ने एका ट्रेनची किंमत 150.9 कोटी रुपये सांगितली होती, जी सर्वात कमी होती. ही ट्रेन हलकी असल्याने जास्त वेगाने धावता यावी यासाठी ॲल्युमिनियमपासून डबे बनवण्याची कल्पना याआधी देण्यात आली होती.
ॲल्युमिनियमचा वापर का?
वंदेभारत ट्रेनमध्ये अॅल्युमिनियमचा वापर
ॲल्युमिनियमपासून बनवलेल्या गाड्या स्टीलच्या गाड्यांपेक्षा हलक्या असतात आणि कमी वीज वापरतात. सध्या, रेल्वेने 102 चेअर कार असलेली वंदे भारत ट्रेन आणि 200 स्लीपर असलेली वंदे भारत ट्रेन खरेदी करण्यासाठी निविदा अंतिम केली आहे. त्यामुळे सध्या यावर विचार चालू आहे.
परदेशी तंत्रज्ञानाची गरज
टाईम्स ऑफ इंडियामध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार, ॲल्युमिनियम बॉडी ट्रेन बनवण्यासाठी परदेशातून तंत्रज्ञान आणावे लागते, ज्याची किंमत खूप जास्त आहे. त्यामुळे भारतीय रेल्वे आता अन्य पर्यायांच्या शोधात आहे. आता अधिक वेगाने धावणारी 24 डब्यांची स्लीपर वंदे भारत ट्रेन बनविण्यावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. याशिवाय, खर्च कमी करण्यावर आणि देशाच्या तंत्रज्ञानाचा वापर करण्यावरही भर दिला जात आहे.
पूर्वी बांधकाम प्रति रॅक 120 कोटी रुपये
का झाले डील रद्द
रेल्वेच्या निविदा समितीने कमाल किंमत 140 कोटी रुपये निश्चित केली होती. पण अल्स्टॉम इंडियाने प्रत्येक ट्रेन सेट सुमारे 145 कोटी रुपयांमध्ये हा करार करण्याची तयारी दर्शवली. तरीही करार होऊ न शकल्याने निविदा रद्द करण्यात आली. यापूर्वी, रेल्वेने प्रति रेक 120 कोटी रुपयांच्या दराने 200 वंदे भारत स्लीपर ट्रेनसेट तयार करण्याचे कंत्राट दिले होते. अल्स्टॉम इंडियाच्या प्रवक्त्याने सांगितले की त्यांनी दिलेली किंमत सर्वात कमी होती आणि बाजारात उपलब्ध असलेल्या इतर तत्सम ट्रेनपेक्षा स्वस्त होती.