
Amazon , Flipkart अन् JioMart ला मोठा झटका! ( सौजन्य - सोशल मीडिया )
नियमांच्या उल्लंघन केल्या प्रकरणी या तिन्ही ई-कॉमर्सवर मोठी कारवाई करण्यात आल्याचं बोललं जात आहे. या प्रकरणात कारवाई करत, CCPA ने ॲमेझॉन आणि फ्लिपकार्टवर प्रत्येकी १० लाख रुपये आणि जिओमार्टवर ५ लाख रुपयांचा दंड आकारला आहे. हे प्रकरण ‘सायक्लोसिनोन हर्बिसाइड’ नावाच्या उत्पादनाच्या विक्री आणि जाहिरातीशी संबंधित आहे.
CCPA च्या मते, सायक्लोसिनोन तणनाशक तिन्ही प्लॅटफॉर्मवर विकले जात होते, परंतु त्यातील सक्रिय रसायनाचे नाव, तसेच त्यातील घटक उघड केले गेले नव्हते. तपासादरम्यान, कृषी मंत्रालयाने CCPA ला कळवले की, कीटकनाशक कायदा, १९६८ च्या अनुसूचीमध्ये सायक्लोसिनोन नावाच्या कोणत्याही रसायनाचा समावेश नाही. यामुळे सायक्लोसिनोन तणनाशकाच्या विक्री आणि विपणनासाठीच्या तपासणी आणि मंजुरीवर प्रश्नचिन्ह निर्माण होते.