Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 8 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Hindustan Coca-Cola IPO 2026: गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! कोका-कोला आणणार मेगा IPO

Hindustan Coca-Cola IPO 2026: भारतीय शेअर बाजारात आणखी एका मोठ्या IPO ची चर्चा सुरू झाली आहे. हिंदुस्तान कोका-कोला होल्डिंग्सने IPO आणण्यासाठी SEBI कडे ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस (DRHP) दाखल केला आहे. या IPO अंतर्गत कंपनीचे प्रवर्तक 99,74,61,456 शेअर्स ऑफर फॉर सेल (OFS) पद्धतीने विकणार आहेत.

  • By Riddhi Vanne
Updated On: Nov 08, 2026 | 01:00 PM
Hindustan Coca-Cola IPO 2026: ( फोटो सौजन्य-सोशलमीडिया)

Hindustan Coca-Cola IPO 2026: ( फोटो सौजन्य-सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • हिंदुस्तान कोका-कोला IPO साठी SEBI कडे अर्ज.
  • 99.75 कोटी शेअर्सची OFS द्वारे विक्री.
  • IPO ची किंमत आणि तारीख अद्याप जाहीर नाही.

Hindustan Coca-Cola IPO: शेअर बाजारात सध्या IPO चा एकदम जोर आहे. एकामागून एक मोठे IPO येतायत. जिओ प्लॅटफॉर्म्सचा IPO नुकताच जोरात लिस्ट झाला. त्यानंतर आता पेय क्षेत्रातली सगळ्यात मोठी कंपनी बाजारात उतरायला निघालीय. ती कंपनी म्हणजे ‘हिंदुस्तान कोका-कोला होल्डिंग्स’. Hindustan Coca-Cola IPO 2026:

ह्या कंपनीने आपला IPO आणण्यासाठी SEBI कडे कागदपत्रं दिलीत. त्याला ‘ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस’ म्हणतात. सोप्या भाषेत सांगायचं तर, कंपनीने बाजारात येण्यासाठी पहिलं पाऊल टाकलंय. ह्या IPO मधून कंपनी जवळपास 99.75 कोटी शेअर्स विक्रीसाठी आणणार आहे.

हा IPO कसा असणार?

हा IPO थोडा वेगळा असणार आहे. यात कंपनी नवीन शेअर्स काढून पैसे गोळा करणार नाही. तर कंपनीचे मालक असलेली ‘हिंदुस्तान कोका-कोला ओव्हरसीज होल्डिंग्स’ आपल्याकडचे शेअर्स विकणार आहे. याला ‘ऑफर फॉर सेल’ म्हणतात.

99,74,61,456 शेअर्स विकले जाणार आहेत. प्रत्येक शेअरची दर्शनी किंमत 10 रुपये ठेवलीय. हा इश्यू ‘बुक-बिल्डिंग’ पद्धतीने होणार आहे. हे सगळे शेअर्स BSE आणि NSE या दोन्ही बाजारात लिस्ट होतील.

Diwali Muhurat Trading 2026: लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर बाजारात तेजीची आशा! कधी सुरू होणार मुहूर्त ट्रेडिंग?

कोणाला किती वाटा मिळणार?

या IPO ची रचना अशी ठेवलीय.मोठे संस्थात्मक गुंतवणूकदार म्हणजे QIB यांच्यासाठी 50 टक्क्यांपेक्षा जास्त वाटा राखीव ठेवलाय. मोठे गुंतवणूकदार म्हणजे NII यांच्यासाठी किमान 15 टक्के वाटा ठेवलाय. आपल्यासारख्या सामान्य माणसांसाठी म्हणजे रिटेल गुंतवणूकदारांसाठी किमान 35 टक्के वाटा ठेवलाय.म्हणजे सामान्य लोकांना पण यात चांगली संधी मिळणार आहे.

कंपनी किती मोठी आहे?

वार्षिक महसूल बघितला तर हिंदुस्तान कोका-कोला होल्डिंग्स ही भारतातली सगळ्यात मोठी पेय कंपनी आहे. दारू सोडून बाकी सगळी रेडी-टू-ड्रिंक पेयं बनवण्यात ही कंपनी नंबर वन आहे.

जून 2026 ला संपलेल्या तिमाहीत कंपनीने 4,310.17 कोटींचा महसूल कमावलाय. गेल्या वर्षाच्या तुलनेत यात 20.46% वाढ झालीय. ही आकडेवारीच सांगते की कंपनीची परिस्थिती किती मजबूत आहे.कंपनीचं नेटवर्क पण एकदम अफाट आहे. देशाच्या कानाकोपऱ्यात 17 लाखांपेक्षा जास्त किरकोळ विक्री केंद्रं आहेत. आणि 2,273 पेक्षा जास्त वितरक आहेत. म्हणजे गावातल्या छोट्या टपरीपासून ते मोठ्या मॉलपर्यंत कोका-कोलाचं प्रोडक्ट मिळतं.

जिओच्या यशामुळे आत्मविश्वास वाढलाय

कोका-कोलाचा IPO येण्याची वेळ एकदम योग्य मानली जातेय. कारण नुकताच जिओ प्लॅटफॉर्म्सचा 30,200 कोटींचा IPO आला होता. तो देशातला आतापर्यंतचा सगळ्यात मोठा IPO होता. जिओने 21.36% प्रीमियमसह 1,358 वर तुफान लिस्टिंग केलं होतं.

जिओच्या IPO ला जगभरातून 1.38 कोटींपेक्षा जास्त किरकोळ अर्ज आले होते. आणि तो इश्यू 22.2 पट सबस्क्राईब झाला होता. जिओच्या या यशामुळे हे कळलंय की भारतीय गुंतवणूकदार मोठ्या आणि विश्वासू कंपन्यांच्या IPO साठी पूर्णपणे तयार आहेत. याच चांगल्या वातावरणाचा फायदा कोका-कोलाला पण मिळेल, असं वाटतंय.

हा IPO का आणतायत?

हा IPO म्हणजे कोका-कोला कंपनीच्या जागतिक स्ट्रॅटेजीचाच एक भाग आहे. त्यांची स्ट्रॅटेजी आहे ‘अॅसेट-लाईट’. म्हणजे मूळ कंपनी आपल्या बॉटलिंग आणि मॅन्युफॅक्चरिंगचं काम फ्रँचायझी पार्टनरकडे देत असते. स्वतःकडे जास्त मालमत्ता ठेवायची नाही, हेच त्यांचं धोरण आहे.कोका-कोलासाठी भारत ही जगातली पाचवी सगळ्यात मोठी बाजारपेठ आहे. त्यामुळे भारतातला हा IPO त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे.

Todays Gold-Silver Price: दिवाळीच्या शुभ मूहूर्तावर काय आहेत सोन्याचे दर? एका क्लिकवर जाणून घ्या

कोण सांभाळतंय हा IPO?या मोठ्या IPO चं काम सांभाळण्यासाठी कोटक महिंद्रा, सिटीग्रुप, जे.पी. मॉर्गन, मॉर्गन स्टॅनली आणि अॅक्सिस कॅपिटल यांसारख्या मोठ्या मर्चंट बँका घेतल्यात. ह्या सगळ्या मोठी नावं आहेत.या IPO मुळे भारतीय शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात पैसा येण्याचा अंदाज आहे. आता सगळ्यांचं लक्ष लागलंय ते म्हणजे हा IPO कधी उघडणार आणि त्याची किंमत काय असणार

💡

Frequently Asked Questions

  • Que: हिंदुस्तान कोका-कोला IPO कोणता आहे?

    Ans: हिंदुस्तान कोका-कोला होल्डिंग्स कंपनीचा शेअर बाजारात प्रवेश करण्यासाठी येणारा IPO आहे.

  • Que: हिंदुस्तान कोका-कोला IPO मध्ये किती शेअर्स विकले जाणार आहेत?

    Ans: या IPO मध्ये 99,74,61,456 म्हणजेच जवळपास 99.75 कोटी शेअर्स विक्रीसाठी आणले जाणार आहेत.

  • Que: हिंदुस्तान कोका-कोला IPO कोणत्या पद्धतीने येणार आहे?

    Ans: हा IPO ऑफर फॉर सेल (OFS) पद्धतीने येणार आहे. यात कंपनीचे विद्यमान प्रवर्तक आपले शेअर्स विकणार आहेत.

Web Title: Hindustan coca cola ipo 2026 99 75 crore shares issue details rv

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 08, 2026 | 01:00 PM

Topics:  

  • Business News
  • IPO News
  • Marathi News

संबंधित बातम्या

Board Exam Topper Habits: दहावी-बारावीच्या परीक्षा जवळ आल्यात? पारंपरिक सल्ल्यांना फाटा देऊन ‘असा’ करा स्मार्ट स्टडी
1

Board Exam Topper Habits: दहावी-बारावीच्या परीक्षा जवळ आल्यात? पारंपरिक सल्ल्यांना फाटा देऊन ‘असा’ करा स्मार्ट स्टडी

Siddharth Chandekar and Mitali New House: सिद्धार्थ-मितालीच्या ‘द टेराकोटा हाऊस’ची पहिली झलक
2

Siddharth Chandekar and Mitali New House: सिद्धार्थ-मितालीच्या ‘द टेराकोटा हाऊस’ची पहिली झलक

Diwali Muhurat Trading 2026: लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर बाजारात तेजीची आशा! कधी सुरू होणार मुहूर्त ट्रेडिंग?
3

Diwali Muhurat Trading 2026: लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर बाजारात तेजीची आशा! कधी सुरू होणार मुहूर्त ट्रेडिंग?

World Breaking : ट्रम्प काही शांत बसेना; हल्ल्याचा इशारा केला जारी, इराणमध्ये आयोडीनच्या गोळ्यांचे वाटप
4

World Breaking : ट्रम्प काही शांत बसेना; हल्ल्याचा इशारा केला जारी, इराणमध्ये आयोडीनच्या गोळ्यांचे वाटप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.