
चिक्कबल्लापूर, हसन, मेरठ, रामनगर, रायपूर आणि वाराणसी येथील नवीन सॉर्ट सेंटर्समुळे वर्गीकरणाचे (सॉर्टेशन) एकूण क्षेत्रफळ २.४ दशलक्ष चौरस फुटांवरून २५ टक्क्यांनी वाढून ३ दशलक्ष चौरस फूट होईल.
Amazon Now ची भारतात प्रचंड क्रेझ! ऑर्डर झाल्या दुप्पट; १ बिलियन डॉलर विक्रीचा टप्पा ओलांडला
अॅमेझॉनने आसनसोल, भटिंडा, बिकानेर, कोईम्बतूर, डोडा, इटावा, गया, होसूर, जौनपूर, जुनागढ, मदुराई, नेल्लोर, पुरी, सिलीगुडी, सोलापूर, तिरुवन्नमलाई, तुमकूर, उधमपूर, वेस्ट गारो हिल्स यांसह ११८ शहरांमध्ये १५० नवीन लास्ट-माईल डिलिव्हरी स्टेशन्स जोडली आहेत, ज्यामुळे भारतातील छोट्या गावांमध्ये आणि शहरांमध्ये अॅमेझॉनचा विस्तार आणखी वाढला आहे. यापैकी १२ शहरे – भोजपूर, बोकाजान, जालौन, जहानाबाद, नामसाई, पुरुलिया, रिभोई, सेनापती, शिवसागर, उदालगुरी, उखरुल आणि वोखा येथे पहिल्यांदाच अॅमेझॉनचे लास्ट-माईल डिलिव्हरी स्टेशन सुरू होईल. नेटवर्क विस्तारातील अॅमेझॉनच्या सातत्यपूर्ण गुंतवणुकीमुळे गेल्या एका वर्षात एकाच दिवशी मिळणारी डिलिव्हरी (सेम-डे डिलिव्हरी) ३० टक्क्यांहून अधिक शहरांपर्यंत पोहोचणे शक्य झाले आहे, ज्यामुळे संपूर्ण भारतातील ग्राहकांना अधिक जलद आणि विश्वासार्ह डिलिव्हरीचा अनुभव मिळत आहे.
हा विस्तार अॅमेझॉनच्या संपूर्ण भारतातील ऑपरेशन्स नेटवर्कला अधिक दृढ करण्यासाठी नुकतेच जाहीर केलेल्या र२,८०० कोटी रुपयांहून अधिक गुंतवणुकीचा भाग आहे. विस्तारित नेटवर्क विक्रेत्यांची उत्पादने ग्राहकांच्या अधिक जवळ आणते आणि अधिक भागांमध्ये अॅमेझॉनची लास्ट-माईल पोहोच वाढवते, ज्यामुळे वाढलेली मागणी पूर्ण करत जलद आणि अधिक विश्वासार्ह डिलिव्हरी करणे अॅमेझॉनला शक्य होते.
अॅमेझॉनचे भारत, एपीएसी, मिडल ईस्ट, तुर्किये आणि आफ्रिका येथील ऑपरेशन्सचे उपाध्यक्ष (व्हीपी) अभिनव सिं* ग म्हणाले, “अॅमेझॉनमध्ये आमचे नेहमी ग्राहक आणि विक्रेत्यांच्या अधिक जवळ जाण्यावर लक्ष केंद्रित राहिले आहे, ज्यामुळे आम्ही त्यांना अधिक वेगाने आणि खात्रीशीर सेवा देऊ शकतो. देशभरातील ग्राहकांना सेवा पुरवत आम्ही भारतातील सर्वात मोठे, सुरक्षित, जलद आणि विश्वासार्ह लॉजिस्टिक्स नेटवर्क उभारण्यासाठी गुंतवणूक करणे सुरूच ठेवले आहे. या वर्षी, आम्ही आमच्या ऑपरेशन्स नेटवर्कला अधिक दृढ आणि अपग्रेड करण्यासाठी, तसेच आमच्या पायाभूत सुविधांना सक्षम करणाऱ्या तंत्रज्ञानात सुधारणा करण्यासाठी २,८०० कोटी रुपयांपेक्षा जास्त (जवळपास ३०० दशलक्ष अमेरिकन डॉलर्स) गुंतवणूक करत आहोत. यादरम्यान कर्मचाऱ्यांची सुरक्षा, आरोग्य आणि आर्थिक स्वास्थ्यालाही पाठबळ दिले जात आहे. आम्ही आमची विशेष फुलफिलमेंट पायाभूत सुविधा विस्तारत असताना आमच्या व्यापक नेटवर्कवर उत्पादनांची अधिक मोठी श्रेणी उपलब्ध करून देत आहोत. यामध्ये ग्राहकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी डिझाइन केलेले डिलिव्हरी पर्याय समाविष्ट आहेत, ज्यामध्ये अॅमेझॉन नाऊद्वारे काही मिनिटांत मिळणाऱ्या डिलिव्हरीपासून ते काही तासांत, सेम-डे किंवा नेक्स्ट-डे डिलिव्हरीचा समावेश आहे. सणासुदीच्या काळापूर्वी, आम्ही या नवीन सुविधा कार्यरत करण्यास आणि संपूर्ण भारतातील ग्राहकांना सेवा देण्यासाठी सज्ज असण्यास अत्यंत उत्सुक आहोत. या गुंतवणुकीमुळे आम्हाला ग्राहक आणि विक्रेत्यांच्या बदलत्या गरजा पूर्ण करण्यात मदत होईल, तसेच लाखो रोजगार संधी निर्माण होऊन देशभरातील स्थानिक घटकांच्या आर्थिक विकासाला हातभार लागेल.”